पद ८
मोरया माहेरिया माझ्या मंगळमूर्ति ॥ध्रु० ॥
तूं येक विश्वाधार। करितोसि दीनोद्धार ।
कल्याणदायक तुझी निर्मळ कीर्ति ॥ १॥
जप- तांचि तुझें नाम । पुरती मनाचे काम ।
तत्काळ मावळते अविद्यास्फूर्ति ॥२॥
जयजयजी वक्रतुंडा । सिंदुरचर्चितशुंडा ।
श्रीमध्वनाथा देई गुरुभक्तिपूर्ति ॥ ३॥