पद ४
अंबा येकविरा जे ।
याला जननी येक विराजे ॥धृ० ॥
कंठी पदक विराजे ।
ज्याचे वंदिती पद कविराजे ॥ १ ॥
जो म्हणवी सेंदुरवाला ।
तो राहातो सेंदुरवाला ।
ज्याला सेंदुर वाल्हा ।
त्याला वाहणेसे दुरवाला॥ २ ॥ .
धरी मस्तकी भ्रमरांसी ।
नासी समस्त की भ्रमरासी ।
मध्वनाथमुनि अमरासी ।
पाळी तारी पामरासी ॥ ३ ॥