Get it on Google Play
Download on the App Store

मलाही जगायचयं.....!!!

बेटी बचाओ बेटी पढाओ....ही योजना ही या विचारधारेतून निर्माण झालेली आपण सध्या ऐकतोच पण तरीही काही ठिकाणी मुलगा मुलगी हा भेद मानवी मनावर ठसलेला दिसतोच पण यातून आपल्या ला बोट धरुन बाहेर काढणारी ती चिमुकली .साद घालातेय ....मलाही जगायचयं...

निष्पाप जीवाचा श्वास अखेरचा ठरवू नका मुलीला मारु नका तिलाही जीवनाचा खरा आस्वाद घेण्याची गोडी अनुभवूयात " लेक वाचवा " स्त्रीभ्रुणहत्या  आता"बेटी बचाओ बेटी पढाओ अशा संदर्भात आपण रोज ऐकतो  पहातो आहोत आज अशा जनजागृतीची वेळ आपणच ओढवून घेतली याबाबत प्रबोधन होत आहेच.

21व्या शतकाच्या काळात अशा प्रकारची जनजागृती करण्याची वेळ यावी का ?हा प्रश्न विचारण्याजोगा आहे तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगती केली आपण सुशिक्षित झालो पण सुसंस्कृत होण्याचीही गरज आहेच,

स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गाताना स्त्रियांना बरोबरीने वागवले जावे हा आग्रह धरला जातो मात्र जिच्यामुळे समाज चालतो वाढतो तिचेच अस्तित्व आपण नाकारतो ही समानता विचाराधीन तसेच कृतीप्रधानही असावी.

ज्या जीवाने जगात येण्यासाठी श्वास मोजले तिचे हे श्वासच आपण अखेरचे का ठरवायचे तिलाही जगण्याचा अधिकार आहेच. स्त्री ही अनंतकालची माता असे म्हणतात पुरुषाचे अस्तित्व स्त्री शिवाय नगण्यच. त्याची उदाहरणे ज्ञातच आहेत ...

मुलगा हा जरी वंशाचा दिवा ठरला तरी त्याला सक्षम बनवणारी नेहमी आई कधी पत्नी ही स्त्री चीच रुपे ...पृथ्वी हीदेखील स्त्री चजिच्या कुशीत अखिल मानव जातीचे अस्तित्व ...अगदी आपल्या घरातील प्रत्येकाचे अस्तित्व ही आपापल्या कर्तव्य नुसार सिद्ध च पण त्यातील स्त्री चे अस्तित्व काढून टाकले तर घर या शब्दाला  काय अर्थ?घराचे घरपण केवळ स्त्री मुळेच टिकून राहते...

पुराणकाळापासून आपण स्त्रीचे महत्व पाहात आहोत पार्वती , गार्गी,मैत्रयी तर इतिहासकाळातील झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले अशी कितीतरी उदाहरणे त्यांनी त्या प्रतिकूल काळातही आपले अस्तित्व टिकवून ठेवले...आधुनिक काळातील अंतराळवीर कल्पना चावला , सुनीता विल्यमस ..एक स्त्री म्हणून त्यांचे काय अडले पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच क्षमता स्रियांमधे असते हे सिद्धच..स्रियांविना घर म्हणजे सुगंधाविना फूलच...

आईची ती वेदना "ती "ला जीवनदान द्या असे म्हणत होती कल्पना करा घरामधे दुडूदुडू धावत सर्व घराचा ताबा चटकन घेणारी मुलगी नंतर सर्व घराचे नंदनवन कधी करते ते समजतच नाही आपल्या घराबरोबर सासरचे नाव ही ती तेवढ्याच लीनतेने उंचावते एका घराबरोबर दोन घरांची धुरा समर्थपणे सावरणारी ही मुलगी जणू काही आरोळी देते...

"माझे काय चुकले ?मलाही बाहेर यायचे आहे श्वास घ्यायचाय, जग बघायचेय , मी दिवा जरी झाले नाही तरी वात मीच ...समईतील ज्योतीप्रमाणे सतत तेवत राहीन अशी गूवाही ती देतीये.....बाबा आईमुळेच तुम्ही आहात हे तुम्ही का विसरलात?मला ही बाहेर यायचेय आईच्या मायेचा स्पर्श अनुभवायचाय, ...आजी आजोबांची सोनुकली व्हायचेय जगाला सर करायचेय....मीही होईन कि तुमचा आधार...उभारेन विजयाची गुढी...जिंकेन जगाला अशी ग्वाही ती देतीये ...घेवू देत मला श्वास मला पुन्हा मारु नका अशी विनंती जणू काही ती करतीये, काय चुकले माझे ...काय गुन्हा मी केला झाले मी मुलगी...मला मारु नका अशी वेदना त्या निष्पाप जीवाच्या हृदयातून येते तेव्हा आपल्याला काय अधिकार त्या निष्पाप जीवाचा श्वास अखेरचा ठरवण्याचा.....काहीच नाही!!यावर विचार होणे गरजेचे ..नव्हे आता "बेटी बचाओ बेटी पढाओ "सारख्या योजना त्याचे ज्वलंत उदाहरणच...

मुलींना वाचवा मुलींचे भरणपोषण म्हणजे सुदृढसमाजाचे संवर्धन  ....बेटी बचाओ समाज बचाओ असा ही नारा योग्य च ठरेल....अशी साद सुदृढ सुसंस्कृत समाजाचा विकास घडवेल. अशी साद स्वतःच स्वतःला हा प्रश्न विचारुन स्वतःच्या चुकीचे समर्थन करायचे कि परिवर्तन करायचे हे ठरवणे क्रमप्राप्त....बेटी बचाओ बेटी पढाओ हे सुसंस्कृत समाजाचे खरे अंतर्मन जे स्व बरोबरच सुसमाजाच्या  विकासाला गतिमान करेल....मुलगी लक्ष्मीचे स्वरुप स्त्री सर्वत्र पूज्यते ही भावना सधन सुसंगत संघटित सजग सुसंस्कारित म्हणून सुसंस्कृत समाज निर्माण होईल हाच गाभा निकोप समाजमनाचा...

"मलाही जगायचयं ."..असा टाहो फोडत जग बघायच्या आधीच तिला स्वतः चे अस्तित्व सिद्ध कराण्यासाठी धडपड करावी लागतेय हा विचार विचाराधीन ...पण पुन्हा ती च नकळत सक्षम हे सिद्धच असाच अर्थ  .!!

व्यक्ती सापेक्षता आदर...!

© मधुरा धायगुडे