Get it on Google Play
Download on the App Store

सकारात्मकता कोरोनासाठी

पहाटेच्या निशःब्द नीरव शांततेत पक्षांच्या मंद घंटानादात वा-याची झुळुक मोग-याचा सुंगध  पसरवत कुणाची  तरी चाहूल देत होती  .आशिर्वादांसाठी ब्राम्हमुहूर्तावार अवतरलेली  देवांची  ती परेड होती
 
कधी सरेल अंधार होईल प्रकाश कधी होतील माझ्या वाटा  मोकळ्या याचा कानोसा घेणाऱ्या मनुष्याला धीराची साद देत होती

"पाळ नियम कर संरक्षण स्वतः चे होशील मुक्त या कोरोनातून "

अस्मादिकांसाठी देवच अवतरले मनुष्याला दानवांतून पुन्हा मुक्त करण्यासाठी
जागा हो मनुष्या राख अंतर कर मुक्त कोरोनाला
कर मैत्री निसर्गाशी जप पर्यावरणाला....
आहार विहार आचार यावर ठेव नियंत्रण जाणून घे महत्व स्तोत्र पठणांचे

विज्ञानाबरोबर अध्यात्मही लक्षात घे कर नियमावली स्वतः साठीच होईल मदत समाजाला....

जप सामाजिक भान सोबत असताना या कोरोनारुपी राक्षसाला हरवशील नक्कीच संपर्कापेक्षा दे महत्व सध्या अप्रत्यक्ष संवादाला
शब्दांमधून जाणून घे इतरांच्या भावनांना
कर लाँकडाऊन स्वतः च स्वतःला कधीतरी महिन्यातून एकदा

आस्वाद घे सात्विक नैसर्गिक आहाराचा अन् सकारात्मक विचारांचा कारण  तूच हरवायचेस या कोरोनाला...

तुझ्याच नियमीत आचरणांनी दूर करुन जळमटे निराशेची ..सारे आहे तुझ्या तच सावर पुन्हा जाणून घे स्वतः लाच
हाच उपाय कोरोनाविरुद्ध लढण्याचा

"सुरुवात कर स्वतः होईल जागरुक समाज नको घाबरु होईल सारे छान कर पृथ्वीला सुरक्षित पाळून सामाजिक अंतर खास ....!"

साद देत साक्ष ठेवून गेले नकळत डोकावणा-या  त्या कोवळ्या सुर्य किरणांची..!

सकारात्मकता सात्विक आहार हाच खरा उपाय कोरोनाविरुद्ध च्या लढाईचा.!

करण्या मुक्त सकल मानवा कोरोनातूनि या  आशिर्वाद मिळो या महाशिवरात्रीला सदा सर्वदा सकला  हीच प्रार्थना!! शुभेच्छाबरोबर बळ मिळावे !!

©मधुरा धायगुडे