Get it on Google Play
Download on the App Store

ताणतणाव

ओठी असू दे बासरी.
बोटे मिटू दे.
तोवरी जो सूर नाही आपुला.
ते गीत तू गाऊ नको.'

ह्या शांता शेळके यांच्या ओळी ऐकताच एक वेगळाच विषय मनात डोकावून गेला. सध्या घरोघरी कोरोनाचे वातावरण आहे परीक्षा काळातही असेच काहीसे यामुळे सगळीकडे खरं तर उगाचच "तणाव' असेल फक्त एवढ्यापुरतेच नाही तर जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत लहान बालकापासून वृद्धापर्यंत जर कोणती गोष्ट कायम साथ देत असेल तर ती "ताण' किंवा स्ट्रेस जणूकाही हा एक परवलीचाच शब्द, पण एक गोष्ट आपल्या हातून विसरते कि आयुष्याचा झगडा जर असाच तीव्र झाला तर तो अजूनच वाढेल.

आपल्या भोवती अनेक मनाविरुद्ध घटना घडत असतात जेव्हा हा ताण सहन करण्याच्या पलीकडे जातो तेव्हा "तणाव' निर्माण होतो.

जगात असंख्य लोक आहेत तरी माझा जन्म झाला म्हणजे त्या इहलोकी शक्तीच्या माझ्या कडून काही अपेक्षाआहेत ज्या इतर कुणी पूर्ण करु शकणार नाही असा विचार .स्वतः ची किंमत करा स्वतः वर प्रेम करा इतर तुमच्या विषयी काय बोलतात हे ज्याचे त्याचे कर्म पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म  असा सकारात्मक विचार ही ताण घालवण्यास मदत करती ...संवाद कौतुक  प्रोत्साहन ह्या गोष्टी ही ताण घालवण्यास उपयुक्त ठरतातच.

माणसाचे मन संघर्षमय भावस्थिती निर्माण करणाऱ्या परिस्थितीला जी प्रतिक्रिया देते यामुळे व्यक्तीच्या मनात येणारी दडपणे म्हणजे "ताणतणाव'काहींच्या स्वभावातच ताण घेण्याची प्रवृत्ती असते तर काही जण अजिबात ताण घेत नाहीत, तर जे ताणतणावांना समर्थपणे तोंड देऊ शकते ते संतुलित व्यक्तिमत्त्व म्हणता येईल.

दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीत दाखल झालेला प्रसाद स्वतःच्या तोऱ्यात वावरायचा इतरांपेक्षा तो खूपच छान होता आपण एखाद्या सिनेनटासारखे आहोत असे उगाचंच वाटायचे मग तो हवेत तरंगू लागला, अभ्यासात मागे पडला, इतरांशी तुच्छेतेने वागू लागला अखेर तो अकरावीत नापास झाला मग सगळ्यांपासून तोंड लपवू लागला असे का घडले? त्याला पुढील आयुष्यात ताणतणावाखाली का रहावे लागले कारण त्याच्या मनात स्वतःविषयी असलेली दोषपूर्ण संकल्पना प्रत्येकाने स्वत:ला नीट समजावून घ्यायला हवे आपल्याविषयी इतरांना काय वाटले हे ही महत्त्वाचे, स्वतःचे ध्येय निश्‍चित नसणे हे देखील ताणाचे मुख्य कारण आहे, तसेच आपण निश्‍चित केलेले ध्येय प्राप्त होत नसेल तर कोणत्या ध्येयाकडे वळावे हे पण आधीच ठरवता यायला हवे, तसेच एखाद्या गोष्टीचा अणि हव्यास देखील तणावाला कारणीभूत ठरतो. यश झटपट मिळत नाही, आपल्या इच्छा पूर्ण होणे गरजेचे आहे का? इच्छा म्हणजे केवळ हव्यास नाही ना? हे पण लक्षात यायला हवे.

परीक्षेचा ताण म्हणून विद्यार्थी अभ्यास करतात पोटापाण्यासाठी आपण कामाचा ताण सहन करतो पण खरेतर हा "ताण' माणसाच्या आयुष्यात नसेल तर माणूस निष्क्रिय बनेल, त्याचे प्रमाण जेवणातल्या मीठाप्रमाणे कमी अधिक मात्रा करता येईल. यासाठी रामदास स्वामींनी केलेला ""मनाला उपेदश" लक्षात येतो जेवढा झेपेल तेवढाच ताण सहन करावा, सचोटी, प्रामाणिकपणा, या जीवनमूल्यांचा अंगीकार देखील "ताण' कमी करत असतो ही जी आपण बालपणापासूनच मुलांमधे आचरणात ताण पेलण्यास ती सक्षम बनतात त्यासाठी स्वत:वर ठाम विश्‍वास हवा जसे एखाद्या डॉक्‍टरांनी
स्वतःच्या ज्ञान व अनुभवावर ठाम विश्‍वास असेल तरच तो रुग्णाचा अवघड विकार बरा करु शकतो, मला हे जमत नाही, मी हे करु शकत नाही, अशी आत्मटिका करणे टाळणे आवश्‍यक ठरते. स्वतःला कमी लेखणाऱ्या माणसाची अवस्था फार असह्य होते.

कधी कधी प्रोत्साहन पर विधानेही एखाद्या चा ताण कमी करु शकतात आपुलाकी ती शब्दातून स्पर्शाने ही दाखवून एखाद्या चे आत्मबल वाढवू शकतेआधार वाटू शकते .जसे

"मी आहे ना  घाबरू नकोस"
या शब्दात एवढी ताकद आहे कि
कमजोर व्यक्तिला कोणतेही आव्हान उचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात दिले जाणारे ग्लोकोजच आहे.
संकटाला  नेहमी दिलासा देणार हे एक प्रथमोपचार आहे.
मी तुमची प्रत्येक अडचण सोडवू शकेन का हे मला माहित नाही, पण तुमच्या प्रत्येक अड़चणीत मी तुम्हाला.....एकटे सोडणार नाही हे मात्र नक्की ....हा विश्वास देता यायला हवा

विद्यार्थी दशेपासूनच छोट्या ताणाला सुरुवात होते मग त्यातच वरील अशी वाक्ये कुणीतरी आहे असे वाटून उत्साह वाढवतात.
काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीतीच वाटत नाही त्यांच्यावर परीक्षेचा ताण नसतो ते अजिबात अभ्यास करत नाहीत परिणामी नापास होतात, तर काही परीक्षेच्या भीतीने ताणाखाली असतात त्यामुळे त्यांचे विस्मरण होते उत्तरे आठवत नाहीत नापास होतात, म्हणजे काय की मध्यम स्वरूपाचा ताण हा विद्यार्थ्यांच्या मनावर असलाच पाहिजे तरच ते अभ्यास करण्यास प्रवृत्त होतात व यश मिळवतात
प्रत्येक गोष्ट 100 टक्के आलीच पाहिजे असे नाही मला परीक्षेत 95 टक्केच मार्क मिळाले पाहिजेत ही विचारसणी ताणासाठी घातक ठरते मनोवृत्तीत लवचिकता असावी म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाते व ताण येत नाही. काटेकोरपणे वागणाऱ्या लोकांना याला सतत तोंड द्यावे लागते. संगतीचा परिणाम देखील ताण कमी करू शकतात.

प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची विनोदवृत्ती हवी. व्यक्ती मत्व दुसऱ्याला प्रफुल्लित करणारे असावे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव एवढा बोलका हसरा असतो कि ते आपल्या बरोबरच आजूबाजूचे वातावरण ही आनंदीत करतात ते असण्याने देखील वातावरण आनंदित होते व आपलाही ताण नाहीसा होतो ते संतुलित व्यक्तीमत्व. त्याने आपलाही ताण नाहीसा होतो , सकारात्मकविधाने वापरल्याने ही ताण हलका होतो .जसे मी आनंदी आहे .....मग आनंदाचाच विचार आपले मन करते अन् आनंदाच मिळतो .असे शब्दप्रयोग ताण हलका करतात .वेळ व्यायम हे देखील ताण घालवण्यासाठी नियोजनबद्धता असेल तर हलका करतात.

ज्या गोष्टींची त्यापासून आपण स्वतःला दूर ठेवतो तर ज्या गोष्टीशिवाय जगू शकतो अशा अवाजवी गोष्टींच्या मागे लागतो  कारण जे आपण बदलू शकत नाही ते स्वीकारणे क्रमप्राप्त असते मात्र ते सहन करण्याची ताकद मिळावी हे चुकीचे नाही.आपल्या आवडीच्या कामात गुंतले तरी तणावापासून दूर राहता येते .योग्य व्यवस्थापन मग त्यात वेळेचाही समावेश होईल केले तर ताणामुळे येणाऱ्या तणावाला दूर सारता येते .

आरोग्यची काळजी घेवून ज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नारा अगदीच योग्य ठरेल ..या सद्यपरिस्थीतीत येणारा आरोग्य विषयी ताण घालवता येईल सकारात्मकता असणं हाच त्यावर उत्तम उपाय.

मग मंगेश पाडगावकरांच्म शब्दांत सांगायचे तर कसे जगायचे ...कण्हत कण्हत कि गाणे म्हणत हे आपणच ठरवायचे ..आणि शेवटी आपल्याच हातात इतरांना आपल्या मुळे ताण येणार नाही आणि  त्यामुळे आपल्यालाही हे आपणच ठरवायचे.
 शेवटी सकारात्मक राहण्याचा उत्तम उपाय आपले आपणचं ..ताणामुळे येणारा तणाव घालवू शकतो .

पुन्हा नकारात्मकता दर्शवणारे  बापरे! असे फोटो टाकून तणाव च वाढेल सो आपण हसूया ताणाला ही त्यात काय एवढं म्हणून स्वतःलाच प्रश्न विचारुन उत्तर मिळवू. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेच ही सकारात्मकता ठेवूयात.

व्यक्ती सापेक्षता आहेच.

© मधुरा धायगुडे