Get it on Google Play
Download on the App Store

ओळखीतली अनोळखी...!!

सहजच एका ठिकाणी जाण्याचा योग आला ...प्रचंड श्रीमंत व्यक्ती उंची साड्या दागिने घातलेल्यांच्या त्या भाऊगर्दीत थोडं गुदमरायला झालं मला खर तरं मला अशा भपक्याची फारशी आवड कधीच नव्हती ..नाही.. पण कधी कधी आपलेच दात आपलेच ओठ म्हणत अशा कार्यक्रमांना उपस्थिती गरजेची ...कार्यक्रम पुढे सरकत होता ...फोटो काढण्याचा आजकाल शिरस्ता गरजेचेही  काही आठवणी .....फोटोमधे यजमानांच्या घरातील सर्व जण उभे त्यात सहजच लक्ष गेले ते एक साधारण साडी नेसलेली "ती" ओढलेला चेहरा परिस्थिती ची जाणीव करुन देणारा बाकी सगळ्यांच्या मधे माझ्या नजरेला ही गोष्ट खटकली तिच्या पेहरावाकडे बघून काहीजणी नाके मुरडत होत्या बहुधा ... त्या बडेजावी यजमान मंडळीमधे त्यांच्याच मधील ही एक  व्यक्ती असावी पण   माझे लक्ष वेधून गेली ...कुणीतरी तिला ढकलले कोपराने कदाचित कुणात ती वेगळी वाटत असावी म्हणूनही असेल फोटोतील त्या आठवणींना तिचे गालबोट तिच्या जाणवण्याइतपत सगळ्या मधील साधा पेहराव नको म्हणून असेल .नकोशी झालेली ती थोडी दडपल्यासारखी ...तर कुणीतरी सतत पुढे पुढे करत होती  .सगळ्या भपक्यात ती दडपलेली  कुठेतरी हरवली ...माझे लक्ष मात्र याच छोट्या गोष्टीकडे गेले मन हेलावले पैशाच्या धुंदीत आपण काय हरवत चालालोय ..माणसांच्या पेहरावा वरुन नातेसंबध जपावेत का हा हि एक वेगळा विषय मांडता येईल...."ती" चे मला  वाईट वाटले आजही दिसताना छोटा पण मनात आजही घर करुन राहिलेला तो प्रसंग ...

अहंकार पैसा .,.कसा नाचवतो एखाद्या ला चांगल्या वाईटाचे भानही राहत नाही  आपल्या कृतीने एखाद्या  दुखावू शकतो ...ही जाणीवही नसते ..कदाचित ती त्यावेळची गरज नसते ..त्यांच्यासाठी...मग न जाणो अशाच क्षुल्लकांची कधी गरज पडेल असा विचारही आपल्या मनात येत नाही ...

खरचं तुमच्या राहणीमनावरुन श्रीमंतीवरुन एखाद्या ची ओळख ठरावी का? या सगळ्यात एखाद्या अपमानित व्यक्ती च्या मनाचा विचारही आपण करत नाही एवढी पैशाची धुंदी आपल्या डोळ्यावर येते का ?? गरजेनुसार सोयीनुसार ओळख वाढवणा-या व्यक्ती...गृहीत धरतात अन्  न जाणो आपण एखाद्या ची नाकारलेली ओळख पुढे आपलीच.....शेवटी सगळे त्या ब्रम्हांडनायकाच्या हाती ..एखाद्या ची ओळख नाकाराणारे आपण कोण ?? झाडाचे पानही त्याच्या इच्छेनुसार हलते तर मग ...एखाद्या ला कमी जास्त लेखणारा मनुष्य कोण??

एक मात्र नक्की मनावरील असे ओरखडे आयुष्यात कधीही पुसून टाकता येत नाहीत ज्याचे साक्षीदार आपण ठरु अशी कृतीच होणे अक्षम्य,.वेळ काळ बदलते जी आपल्या हातात नाही ..खूप वाईट वाटले घरी आल्यावर तो अनोळखी चेहरा स्वतः ची ओळख हरवलेला डोळ्यासमोरुन कधी हललाच नाही ...दिवस बदलतील ..पण तो क्षण विसराण्यासाठी पुन्हा नवीन ओळख च हवी का ?? असा विचार आला ...सहजच वाटले ते मांडले मनात घर करुन राहिलेला प्रसंग..सोडून दिले तरी एखाद्या चे अस्तित्व ओळख नकारणारे आपण कोण आसतो ना ,..झाडाचे पानही ज्याच्या आदेशाशिवाय हलत नाही ...मग आपण कोण ऐखाद्याला गृहित धरणारे ...बघा पटेल विचार करुन तुमच्या अवतीभोवतीही असे चेहरे आले आसतील गर्दीत ही एखाद्या ने झिडकारल्याने "ओळखीतले अनोळखी " झालेले.....मग मी काय करु शकतो अशा स्थितीत हा विचार आला तुमच्या मनात तर हेच माझ्या या लेखाचे यश....सहजच सुचलेले तुमच्या माझ्या मनातले...!!

©मधुरा धायगुडे