चुकीचा नकाशा
रणरणत्या उन्हात चालाता चालता सुमनला धाप लागायची फक्त बाकी होती पायाचे तुकडे मोडत होते अजून किती चालावे लागेल असा विचार मनात येत असतानाच एकदम तिला भोवळ आली मी ही तिच्या सोबत होतेच ..फार वर्षांनी भेटलेली सुमन खूप खचल्यासारखी वाटली तिला तिकडेच बाजूला सावलीत घेवून गेले थोड पाणी शिंपडलं तोंडावर अन् थोड्याच वेळात तिला जाग आली आज सगळं काम बाजूला ठेवून तिच्या सोबतच राहयचं ठरवलं आता कसे वाटतेय, बरे ! असे म्हणत ,ती उठून बसू लागली ,.तिला हात देत मी उठवले ..सहजच बाजारात भेटली थोडी विचारपूस करत असताना ती बावरल्यासारखी वाटली ...चल, आज मस्त गप्पा मारुयात म्हणत तिच्या सोबत तिच्या घरी जाण्याचा मानस मी व्यक्त करत होते ..पण ती बहुधा चाचरत होती ..अग ,नको मी जाते तू कशाला उगाच तसदी घेतेस , असे म्हणत ती पुढे सरसावली पण मी आज ठरवलेच तिच्या सोबत जायचेच! ....
थोडे अंतर चालून गेल्यावर छोट्याशा बोळात वळून ती एका बैठ्या घराजवळ थबकली , हे माझं घर ..तिला बहुधा मी आलेलं आवडलं नसावं ....ये ये म्हणत दरवाज्यातच चपला सरकावत मी तिच्या मागून आत शिरले.
समोर एक छोटेखानी बैठक दोन खुर्च्या थोडा अंधार वाटला मग आत एक खोली त्यातच एक दिवाण अन् बाजूलाच स्वयंपाक टेबल त्यावरच काही वस्तू मोजक्याच ...माझं अवलोकन चालू असतानाच ती दिवाणकडे बोट दाखवत म्हणाली बस ना ग.,...हो हो!! म्हणत मी टेकले.
एवढी जिवाभावाची मैत्रीण असूनही अनोळखी वाटली मला सुमन आज !!..काहीतरी लपवत असावी ...घरात एकटीच होती ...उगाचच चांभारचौकशा नको म्हणून मी गप्प च राहिले तिच्या बोलण्याची वाट बघत...मग पाणी चहा सोपस्कार झाले .! ऐकेकाळची .मन मोकळी सुमन आज मला खूप वेगळी वाटली ...बराच वेळ असाच गेला मग न राहवूनच मी विचारलं बाकी कुठेत गं सगळे म्हणजे तुझे मिस्टर मुले ..कुणी दिसत नाही ..नंतर माझे तिच्या कडे लक्ष गेले माझी मलाच लाज वाटली ..बहुधा एकाची साथ सुटली असावी ती एकटीच....ती ही थोडी वरमली..
माफ कर म्हणत मीच विषय बदलला ..आपल्या पूर्वी च्या आठवणीत मन रेंगाळत गेल.... त्यावेळी दोघींनी एकत्र घालवलेल्या आठवणी गप्पात घेत मी तिला बोलतं करु लागले....हळूहळू तिची कळी खुलत गेली खरी पण त्यात आनंद नव्हता एक केवळ उपचार वाटला मला....ती म्हणाली , तुझे काय चाललेय ...वयाच्या या टप्प्यावर जे सगळ्यांच होत तसचं माझं ही मला माझा फार बडेजाव इथ मारायचा नव्हताच तिच्या मनात दिसणारी खुपणारी अशी काहीतरी सल मला दिसत होती ...तुझे काय , .'."तू एकटीच राहतेस...कि...?"
ती म्हणाली हो सध्या तरी एकटीच,.ह्यांची सोबत होती पण आता ते ही गेले ....तेही या शब्दातच मला तिची वेदना जाणवली ..मुलं ..? हो एक मुलगा सून आहे पण त्यांना त्यांच जग ...!! काळाचा महिमा...मुलगा बघायचा आधी पण आता त्याचाही प्रपंच वाढता .....हेही गेले दोन वर्षापूर्वी आता माझ्या या घरात राहते ...जीव असेपर्यत जगायचे..असं म्हणतं तिन नकळत डोळ्यातील पाणी लपवलं ....अग जरा बाहेर पडून भाजीपाला वैगेरे आणते ..पूर्वी भजनीमंडळ वैगेरे जात होते पण हल्ली ते ही नको वाटते.....ती बोलत गेली मी ऐकत गेले बोलता बोलता मनाची व्यथा सांगत डोळ्यातील पाणी लपवत उसनं अवसान आणत होती..खूप वेळ निघून गेला आता मला निघायला हवं पुन्हा भेटू ,मी म्हणाले ..तेवढ्यात मगाशी मला येण्यास नको म्हणणारी सुमन माझे दोन्ही हात हातात घेत घट्ट दाबून म्हणाली आज राहतेस का ? माझ्या सोबतच...तिच्या स्पर्शात एक वेगळीच आर्जव मला वाटली...तिच्या हातावर हात ठेवत मी म्हणाले अग, आज नको पुन्हा कधीतरी येईन परत .."असे म्हणून मी बाहेरच्या खोलीत आले समोरच्या भिंतीवर तिच्या मिस्टरांचा फोटो लावला होता खूपच दिमाखदार वाटले फोटोत नक्कीच काहीतरी करत असावेत.. तिला अजून दुःख होवू नये म्हणून मी तशीच काही न विचारता पुढे दरवाजात आले...पायात चपला घातल्या पण.. मनात हूरहूर काळजी वाटत होती सुमानची.... तिचा तो स्पर्श तिची असहायता याची जाणीव करत होता चल निघते गं! म्हणत मी पुढे आले, बोळाच्या कोपऱ्यापर्यत आल्यावर मागे वळून पाहिले तर सुमन तिथेच उभी होती तिला काहीतरी सांगायचे होते का ?? एवढया वर्षानंतर जणू माझीच वाट ती बघत होती असे वाटले...मन पुढे जाण्यास धजावत नव्हते.मी तिथेच फोन केला घरी अन् आज मी माझ्या बालमैत्रिणीकडेच राहते म्हणून सांगितले., ओके म्हणत माझ्या मुलीने हो हो.... मुलीनेच कारण मी माझ्या मुलीच्या घरीच राहते ...मला मुलगा नाही याचे दुःख वाटायचे खरे पण ...आज माझे मत बदलले ....सुमनची ती उद्विग्नता खूप काही सांगून गेली...माझी लेक ओके एन्जाँय म्हणत मला माझ्या बालमैत्रिणीसोबात राहण्यास परवानगी देत शुभेच्छा देवून गेली...मी ही फार काही न बोलता ..स्मितहास्य करत फोनवर थोडीच दिसणार पण भावना पोहचतातच ..असो मी परत मागे आले तर सुमन आत गेली असावी ...पुढे परत तिच्या घरात शिरले तर ती दिवाणखान्यात एकटक बघत बसली होती...डोळे पाण्याने भरलेले मला पाहताच एखाद्या लहानमुलीसारखी बिलगली , "रडतरडतच म्हणाली आलीस तू "पुन्हा तोच हातात हात घेत आशवस्त स्पर्श जाणवला...
मी म्हणाले , हो अग, तुला एकटीला टाकून जावेसेच वाटले नाही गं...परत आले माझ्या लेकीला फोन केला आज इथेच राहते ..ती आश्चर्याने बघत म्हणाली , लेकीकडे ...तुला सून-मुलगा ...चाचपडतच बोलत ...मी म्हणाले अगं नाही मला एकुलती एक मुलगीच आहे.जावईच माझा मुलगा मी लेकीकडेच राहते ..मला माझे कौतुक सांगत बसायचेच नव्हते ,.मी विषय बदलत ..म्हणाले , बघ आता मी राहिलेय ..आज काय विशेष करशील आपल्या ला खायला ...मग मस्त गप्पा मारुयात..असे म्हणात तिची खुललेली कळी मी पाहिली...मला ही समाधान वाटले मी तिच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करु शकले...
आज खूप दिवसांनी तिच्या सोबत कुणीतरी होते बहुधा ..मलाही जरा वेगळा अनुभव..मग पुन्हा चहा गप्पा बालपणीच्या मारत मारत ती तिच्या मूळ स्वभावाकडे वळताना जाणवले मलाही खूप बरे वाटले.मग रात्री अगदी साधाच वरणफळांचा बेत केला पोटभर जेवण झाले .मग अथंरुणावर पडल्या पडल्या मी पुन्हा तिला बोलतं करत होते...
स्वभावाने कडक शिस्तप्रिय सुमन स्वतःच्या पायावर उभी असणारी त्याकाळी मोठी कौतुकाची गोष्ट खरतरं हिमंतीवर संसाराचा गाडा ओढत ओढत आपल्या माहेरचीही जबाबदारी घेणारी पुढे अनाहूत पणे एकटीच पडत गेली तिला तिचा संसार सावरता आला नाही का ? कि तिच्या सूनेने तिला हरवले हे स्पष्ट तिच्या कडे बघून कळत होते ..मग न राहून मी तिला विचारले,? मुलगा सून मी चाचपडत बोलत होते ...जगरराहटी म्हणत ती फारशी सूनेबद्दल कौतुकाने बोलत नव्हती आपण किती दिवस पुरणार म्हणतं मुलगा सूनेचेच ऐकत असावा असेच वाटले फार खोलात न जाता मी समजून गेले ..मुद्दा हा होता कि मी तिला आज कशी मदत ....सहानूभूति नव्हे करु शकेन याचा .....
सगळे शेवटी ज्याच्या त्याच्या विचारप्रकियेवरच...सून कुठे राहते हे काढून मी घेतले ..नक्की काय असेल तिच्या मनात हे मलाही जाणून घ्यावेसे वाटले. आपण एखाद्या च्यात का पडायचे? त्यांचे ते बघून घेतील ..आपण का वाईट व्हायचे असा स्वार्थी विचार आज मला करावासा वाटलाच नाही ..तिच्या डोळ्यातील पाणी तिने स्वावलंबी असूनही गमावलेला आत्मविश्वास मुलाने तिचे लाचार केलेले जगणे मला अस्थिर करत होता..... परमेश्वरीकृपेने ती आजही स्वावलंबी असली तरी मनाने खूप खचून गेली होती असे वाटले. ... आज मला मुलगी आहे याचा खूप अभिमान वाटला ...अशा विचारातच सुमनचा भूतकाळ डोळ्यासमोरुन तरळून गेला...
सकाळी उठल्याबरोबर मी चहा घेतला अन् पळते गं आता असे म्हणत मी निघाले ...तिनेही फार काही न बोलता मला सोडले....खरतर माझ्या मनात वेगळेच चालू होते...नाण्याच्या दोन बाजू बघितल्याशिवाय निष्कर्ष कसा काढणार ना ..तुम्हाला समजले असेलच...
मी तडक तिच्या सूनेकडे येवून थबकले ..दारावरची बेल वाजवत असतानाच एका महिलेने दार उघडले आत बराच पसारा दोघी तिघी बायका गप्पा मारत बसलेल्या दिसल्या ..मला बघताच तिने प्रश्न विचारला , कोण तुम्ही ? कोण हवयं? अशा सूचक प्रश्नांचा भडिमार थोड्या रागीट आवाजात आल्यावर मला तिच्या स्वभावाचा अंदाज आलाच..माझी ओळख मात्र मी एक सर्वेक्षण कर्ती म्हणून दिली..मला दारातच उभे केले पण पाणी मिळेल का ? अशा बहाण्याने मी आत शिरले .....मला बघताच त्या तिच्या शेजारी असाव्यात उठल्याच नाहीत मी तशीच उभी ...मग काही कौटुंबिक माहिती हवीये हे विचारत असताना त्यातील एकजण सुमनबद्दल नकळत नकारात्मक बोलून गेली सगळ्या हसल्या मला फारसे रुचले नाहीच ते ..पुन्हा तिच्या सूनेकडे मोर्चा वळवत मी चौकशी करायला लागले त्या बायकांनी तिथून उठावे हेच अपेक्षित होते मला ..पण बराच वेळ गेल्यावर मीच मला खाजगीत माहिती हवीये बोलले तर त्यावरही त्या कुत्सित हसल्या ...आपल्या सासरची प्रतिमा अशी तिने केली हे बघून वाईट वाटले कीवही आली..
त्या गेल्यावर मी तिला माझी ओळख सांगितली अन् ती एकदम चिडली स्वभावाने तापट असावी हे समजलेच..जरा तिच्या तंत्रात घेवूया असे समजावत मी बोलू लागले..तिला बोलते करता करता एवढेच जाणवले कि माहेरच्यांनी नको इतके घातलेले लक्ष त्यामुळे सासरच्यांबद्दल ओढ वाटणे अशक्यच मनातील चुकीच्या स्वतःच्या स्वातंत्र्य बद्दलच्या अवास्तव कल्पना कुणाचे तरी अनुकरण करण्याचा अटृहास....काहीतरी स्वार्थी उथळ विचार .. इतरांनी सुमनबद्ल सांगितलेले चुकिचे अंदाज तिच्या सूनेच्या मनात घर करुन बसलेले ..सासू वाईटच ही संकल्पना खोलवर रुजलेली ..माहेरच्यांचे अति लक्ष तिला तिचा संसार सासरची माणसं यापासून बाजूला घेवून गेला वेगळे राहतानाही तिच्या बोलण्यातून सुमनबद्दलचा तिचा राग उफाळून येत होता ..हे केवळ स्वतः चे स्वातंत्र्य ...जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न वाजवीपेक्षा माहेरच्यांनी दिलेल लक्ष यामुळे स्वतः च आपण आपल्या संसारात विघ्न आणलं हे कळायला थोडा तिला उशीर लागेल ...पण सुमन असेपर्यत ती मागे फिरावी ..हे तिला कळायला हवे मनातील ही जळमटं काढण्याचा एक प्रयत्न करता येईल का? असा विचार मनात आला . ..तिला बोलत करताना सुमनबद्दल तिच्या मिस्टरांबद्ल तिच्या मनात भरलेली आग जाणवत होती मुलालाही तिने ...त्याचे ही यात चुकलेच ..दोष फक्त अवतीभोवती वावरताना आपणच आपला संसार फुलवायला हवा आपल्या माणसांना ..हेच न कळण्याचा ...असं एखाद्या च मांडलेलं घरटं मोडू नये हाच विचार मनात आला मी सुमनच्या सूनेला समजावण्याचा प्रयत्न केला ...तिच्या सासरच्यांबद्दलचे चुकीचे दृष्टिकोन तिच्या मनात आजही रुंजी घालत होते ..ती ही तडफडत असावी आपली असहायता धमक्या दबाव दहशत तंत्राने व्यक्त करत आपले अस्तित्व चुकीच्या पद्धतीने व्यक्त करत असावी .हे तिच्या व्यक्ती मत्वाकडे बघून लक्षात येत होते ..एवढेच मला वाटले योग्य वेळी योग्य समुपदेशान तिच्या स्वभावातील नकळत निर्माण झालेली ही दाहकता मीच बरोबर आहे हा फाजील आत्मविश्वास तिलाच नकळत कोलमडून टाकत असावा ...प्रेम हे सहवासातच निर्माण होत असतं ह्याची जाणीव तिला तेव्हा होणं अपेक्षित .होतं आता उशीर झाला असला तरी आपणच पेरलेल्या गोष्टी सुधाराण्याची तिने गरज आहे असे वाटून गेले.
माहेरच्यांनीही काही गोष्टी त लक्ष घालू नये हा नियम त्यांनी न पाळल्याने केवळ ..एकमेकांशी एकमेकांनी करुन दिलेले हे गैरसमजच वाटले ...सुमनच्या सूनेला माझ्या परीने समजावून मी बाहेर पडले पण तिच्या व्यक्ती मत्वातील तो राग, दहशत आपलं तेच बरोबर हे मानण्याची वृत्ती ..एक हळूवारपणा मनाचा मोठेपणा आपलेपणा कधी कितपत आणेल याबद्दल मी साशंकच होते काही व्यक्ती मत्व दुहेरी असतात आत्ता प्रेमळ तर कधी हिंसक वागतील याचा नेम नाही असाच काहिसा दोष ..आपलं हित कशात आहे हे कळण्याची सद्सद्विवेकबुद्धी गमावुन बसली जाते अन् आयुष्य एका वेगळ्याच टप्प्यावर येवुन थांबते ..यातूनही फक्त हक्क स्वार्थच बघत पुन्हा स्वतः ची वाढ खुंटलेलीच राहते.. मतितार्थ केवळ समजुतीचा घोटाळा ...चुकीचे दृष्टिकोन एखाद्या बद्दलचे चुकीचे नकाशे ..अहंकार...जबाबदारीची नसलेली जाणीव.. किंवा लग्न म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात हेच मान्य नसणं तरीही नात्यात अडकणं ...अशा.ब-याच गोष्टी मनात येवून गेल्या कुणाचे चुकले ? असा विचार करताना...
सुमन माझी होती तिची सून ही .तिचा मुलगादेखील तेवढाच जबाबदार होता या परिस्थितीत त्याची चूक सूनेपेक्षाही जास्तच होती ...पण आता तिला त्याला हे आता समजणं किवा समजावून घेणं अवघड वाटलं मला शेवटी काळ हेच औषध...फक्त वेळ निघून गेल्यावर काही उरत नाही हे समजणे योग्य एवढेच वाटले मी तिथून बाहेर पडले..दोष कुणाचा कोण चुकले कोण बरोबर हे ज्याचे त्याने ठरवायचे पण मला आता..
या सगळ्यात मला काय करायचे हे मीच ठरवले अन् आता सुमनची मदत पैशानी नव्हे बरोबरीने करत आयुष्याकडे तिला वेगळ्या दृष्टीने बघण्यास मदत माझ्या कडून व्हावी ..तिची सून तरुण आहे आज ना उद्या तिला कळेलच मी कुठे कशी का चुकले?? व्यक्ती स्वातंत्र्य आहेच..ती मी तून लवकर बाहेर पडो एवढेच...
सुमनची सोबत मला जमेल तशी मी करायचे ठरवले ..अन् माझी मीच आनंदी झाले ..कारण तुम्ही आनंदी असाल तरच इतरांना आनंद द्याल...सुमनचे आयुष्य आनंदी जाण्यास मी तिला मदत करणार हे माझे मीच मला आश्वासन देत माझ्या लेकिच्या घरी आले ..
आज मला माझ्या मुलीचा व जावई यांचा सार्थ अभिमान वाटला .मी आनंदी आहे याचे समाधानही माझी लेक जावई तिच्या सासूसास-यांसोबत आम्हांलाही मस्त मजेत मानाने ठेवतात ..खरी स्त्री -पुरुष समानता हीच मुली ही आपली जबाबदारी तेवढ्याच लीलया सांभाळतात मला माझ्या लेकीचा खूप अभिमान वाटला खरा ....पण सुमनचा पोरका झालेला स्वाभिमान माझे मन दुखावून गेला....!
कुणाचे कष्टाने बनवलेले घरटे मोडण्याचे पाप अनाहूतपणे होवू नये ही काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी हे मात्र जाणवले...!!
©मधुरा धायगुडे