२३. सुपर नेचर कडे
जहाजावर दुसऱ्या दिवशी सारंगला सुनिलने त्याच्या घरी पाठवले आणि तो स्वतः नजरेने त्याच्या घरातील दृश्य पाहू लागला. मग सारंगजवळील फोन वरून तो आधी आईवडील मग भाऊ, वहिनी आणि नंतर आत्या यांचेशी बोलला आणि सत्य परिस्थिती सांगितली. त्याला घरची खूप आठवण येत होती. त्यांना प्रत्यक्ष बघून त्याला बरे वाटले, मात्र घरचे फक्त फोनवरून सुनिलशी बोलू शकत होते त्याला बघू शकत नव्हते. सायली आणि निद्राजीता या दोघीही आपल्या घरी फोनवर संपर्क साधून होत्या. दोघींच्या कुटुंबियांना सुनिलने आपल्या दृष्टीने बघून त्याबद्दल दोघींना सांगितले आणि सुनिलही त्यांच्या कुटुंबियांशी बोलला.
सायलीला त्याने आधी जहाजावर लग्नासाठी रीतसर मागणी घातली आणि मग तिच्या आरक्त होऊन लाजलेल्या चेहऱ्यासह मिळालेल्या होकारानंतर फोनवरून तिच्या कुटुंबातील मंडळींनासुद्धा लग्नाचा निर्णय दोघांनी सांगितला. या सर्वांच्या कुटुंबियांना गोपनीयतेची शपथ दिली गेली होती की सायली, निद्राजीता आणि सुनिल हे जे काही काम करत होते त्याबद्दल कुणालाही काहीही सांगायचे नाही. मग जहाजावर त्यांनी सर्वांसमोर सात फेरे घेऊन छोटासा लग्नविधी आटोपला. त्याचे फोटो आणि व्हीडिओ नंतर घरच्यांना पाठवला.
तसेच गेल्या काही दिवसांतील सर्व वेगवान घटनांनंतर सुनिल रात्री विविध शक्यतांचा विचार करू लागला, "हॉस्पिटलमध्ये ती नर्स सायलीला असेच इंजेक्शनमधील स्प्रेचा वापर करून, गायब करून छोट्या पेशीसमूहात रूपांतर तर करणार नव्हती ना? जसे पप्पूचे झाले! जपानचा तो रोबोट एक्स्पर्ट सायंटिस्ट बाथरूममध्ये अशाच पद्धतीने तर गायब झाला नसेल ना? व्यक्तींना गायब करून त्यातून उरलेल्या त्या पेशीसमूहाचे ते लोक काय करत असतील? क्लोन की आणखी काही? त्या पेशी समूहातून त्यांना त्या व्यक्तींच्या जीवनाची सगळी माहिती मिळत असावी का? मला पडलेले ते दिवास्वप्न हेच दर्शवत होते का? त्या स्वप्नानुसार जगातले सजीव हळूहळू अशा रितीने गायब होणार होते का? यामागे नेमके कोण हे आणि त्यांचा उद्देश्य नेमका काय आहे?"
एक ना अनेक वेगवेगळ्या विचारांची त्याची जणू काही झोप उडाली. अशा विचारांनी रात्री त्याला झोप न आल्याने तो अस्वस्थ झाला. सायलीसुद्धा त्याच्या सोबतच रूममध्ये होती पण तिला झोप लागली होती. तिला त्याने झोपेतून उठवले नाही आणि तो त्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये येऊन कठड्यावर हात ठेऊन रात्रीच्या अथांग समुद्राकडे बघत राहिला. समुद्रातील अथांग पाण्याकडे बघून त्याला शांत वाटायला लागले. सगळीकडे पाणीच पाणी होते.
थोड्या वेळाने विचार शांत झाल्यावर तो पुन्हा जहाजावरील आपल्या रूममध्ये आला. सायलीजवळ पहुडला आणि पाठीमागून तिला मिठी मारली. त्याच्या हातांचा तिच्या छातीला स्पर्श झाल्याने तिला जाग आली. तो स्पर्श तिला अचानक आणि अनपेक्षितपणे मिळाल्याने खूप आवडला आणि तिला आणखी तसा स्पर्श हवाहवासा वाटला. मग त्याचे हात तिने आणखी स्वतःच्या हाताने तिच्या छातीच्या दोन्ही उभारांवर घट्ट दाबून धरले. यामुळे सुनिल उद्दीपित झाला आणि आता दोघांनाही भावना अनावर झाल्या. त्याने तिला स्वतःच्या दिशेने कूस बदलवून फिरवले आणि ओढले. मग आवेगाने तिच्या ओठांचा किस घ्यायला सुरुवात केली आणि एका हाताने तिचे कपडे काढायला लागला आणि दुसऱ्या हाताने तिची नाजूक कमर पकडली. मग आपोआपच दोघांनी एकमेकांची अंतर्वस्त्रे पण क्षणांत बाजूला केली. आता ती दोन शरीरे एकमेकांना अतिशय उत्कटतेने अशी बिलगली जणू काही त्यांचे दोघांचे मिळून एकच शरीर आहे. प्रेमासाठी आसुसलेल्या अनावृत्त शरीराच्या तिच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाचा वेध सुनिलचे हात हळुवारपणे घेऊ लागले. तिने डोळे मिटून घेतले होते आणि या सर्वांचा ती सुखद अनुभव घेऊ लागली. दोघांचेही श्वास गरम होऊन हृदय वेगाने धडधड करायला लागले. ओठांचा किस घेऊन झाल्यावर त्याने तिच्या कपाळाचा, डोळ्यांचा, नाकाचा, कानांच्या पाळ्यांचा, मानेचा आणि नंतर छातीच्या दोन्ही उन्नत उभारांचा हळुवारपणे पुन्हा पुन्हा किस घ्यायला सुरुवात केली. त्याच्या त्या हळुवार नाजूक स्पर्श मालिकेने तीचे शरीर खुलून बहरले जसे काही कळीचे क्षणांत फुल व्हावे! मग बराच वेळ तो तिला घट्ट पकडून तिच्यात प्रवेश करत राहिला. या क्षणी आपण कुठे आहोत याची काहीही जाणीव दोघांना नव्हती. शेवटी प्रेमाच्या या खेळातील परमावस्थेतील अत्युच्च अनुभूती दोघांना एकाच वेळेस मिळाली आणि दोघांनीही एक परमोच्च सुखद अनुभूतीचा सुस्कारा टाकला आणि मग ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात काही वेळातच गाढ झोपून गेले.
निद्राजीता मात्र कधीही जहाजावर कोणत्याही रात्री झोपली नाही. तिला जहाजाच्या डेकवर फिरतांना तिचा प्रियकर आठवत होता. सायली सुनिलची जोडी पाहून तिलाही त्याची आठवण झाली. तिला तिच्या बालपणापासूनच्या काही घटनासुद्धा आठवत होत्या.
दोन दिवसानंतर दुपारी जहाजावर एक बातमी येऊन धडकली. गेट वे ऑफ इंडिया गायब झाले होते म्हणे, रात्रीतून! प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमची इमारत आणि नंतर त्यातील सर्व दुर्मिळ मुर्त्या वस्तू हे सगळे गायब झाले होते. मुंबईतील अनेक महत्वाच्या वास्तू गायब झाल्या होत्या अशाच बातम्या एक दोन दिवसांतच जगभरातून येऊ लागल्या की जगातील सात आश्चर्य एका रात्रीतून गायब झाले होते. त्या सर्व इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे पण गायब होत होते. त्या वास्तूंच्या आजूबाजूला असलेल्या इतर सीसीटीव्ही कॅमेरांतून असे दिसत होते की एका क्षणी ती वास्तू होती आणि दुसऱ्या काही सेकंदांतच ती हळूहळू नाहीशी होत नष्ट झालेली होती. सगळीकडे संभ्रम आणि हाहा:कार माजला होता. अनेक क्षेत्रांतील महत्वाच्या व्यक्ती तर गायब होतच होत्या आणि आता जगभरातील महत्वाच्या वास्तू आपोआप गायब होऊन नष्ट होत होत्या.
नेत्राने आधी एकदा सांगितल्याप्रमाणे सुपर नेचर बेटावर लवकर पोहोचून तिथे नुकत्याच वसवल्या गेलेल्या पण अजून विकसित होत असलेल्या स्वागत संस्थेचे जे मुख्यालय होते तिथे असे काहीतरी होते ज्यामुळे सर्वजण तिथे सुरक्षित राहणार होते. विशेष म्हणजे हेरगिरी करणारी विमाने आणि इतर कोणत्याही रडारयुक्त उपाकरणांना आणि बऱ्याच इतर सॅटेलाईट्सना सुद्धा आपल्या विविध कॅमेरांतून हे बेट दृष्टीस पडत नव्हते. इतर जगासाठी तिथे फक्त समुद्राचे पाणीच दिसायचे पण तिथे होते एक बेट. हे बेट जगाच्या नकाशावर नव्हते. मादागास्कर आणि मॉरिशस या बेटांच्या मध्ये ते बेट होते. जेव्हा तिथून इतर जहाजे जात, त्यांना ते बेट न दिसल्याने वेगाने टक्कर होऊन नष्ट होत. मग हळूहळू सावधगिरीचा उपाय म्हणून तेवढया विशिष्ट भागातून प्रवास करणे विविध जहाजे टाळू लागले होते. पण स्वागत संस्थेशी संबंधित सर्व इतर संस्था व्यक्ती ज्या जगभर होत्या त्यांनी आपापल्या सॅटेलाईट्समधून त्या बेटावर जात असणारी जहाजे नंतर अदृश्य होतात त्या संबंधित मेसेजेस आणि व्हीडिओज वेळोवेळी इतर सामान्य जनतेपासून लपवून ठेवलेले होते. असे काय होते तिथे ज्यामुळे ते बेट अदृश्य होते? इतर कुणी जरी त्याचे व्हीडिओ बनवले तरीही ते समुद्रातील एक न उलगडलेले रहस्य म्हणून त्यापासून दूर राहणे पसंत करत होते. जहाज दोनेक दिवसांनी सुपर नेचर बेटावर पोहोचले आणि बेटाभोवतालच्या एका सुरक्षा कवचात हळूहळू शिरले. इतरांच्या दृष्टीने किंवा सॅटेलाईट्स मधून पाहिल्यास ते जहाज अचानक नष्ट किंवा गायब झाले होते.
^^^