Get it on Google Play
Download on the App Store

शिशिरकुमार घोष 19

चैतन्यसंप्रदायाची मतें वगैरे संस्कृतमध्यें होती तीं शिशिरकुमारांनी वंगभाषेंत आणिली. जगांतील नानाविध धर्मांचे सार या वैष्णवधर्मांत आहे असें त्यांस वाटे. हें सार सर्वसामान्य लोकांच्या समोर आणणें हें त्यास कर्तव्य वाटलें. त्यांचे हृदय प्रेमाने भरलेलें होतें. आपण मिळविलेलें.  आपल्या हृदयांतच कोंडून ठेवता येणें शक्य नव्हतें. त्यांनी ज्ञानद्रव्य मिळविलें तें हृदयभूमित पुरुन ठेवण्यासाठी नव्हे. राजाच्या  घरांत एकीकडून द्राव्य येतें, तर दुसरीकडून त्याला पाट फोडलेला असतो,  तद्वत्  जें शिशिरबाबू  वाचीत, मिळवीत तें आपल्या न वाचल्यासवरल्या लोकांस केव्हा देऊं याविषयीं उत्सुक असत. ज्याला म्हणून  हृदय आहे, ज्यांत म्हणून थोडेसें तरी विचार करतां येण्यासारखे आहे.  त्या सर्वास हीं विचारमौक्तिकें हृदयांत सांठविण्यास सांपडावी ही त्यांची  महनीय इच्छा, परंतु हें करतांना त्यांना अहंकाराचा लवलेश नसे. परमेश्वर, श्रीगौरांग  आपल्याकडून कार्य करवितो आहे ही त्यांची भावना  जागृत असे. धर्म या शब्दांतील खरा अर्थ त्यांस अनुभवितां आला.  वृदांवनातील आपल्या खेडयांतील लोकांत भावांसह कीर्तनरंगांत दंग होण्याचे दिवस त्यांना आठवत व त्यांच्या डोळयांत आनंदाश्रू उभे राहत वैष्णवधर्मातील गोडी, अनूपम सौंदर्य, त्यांतील परमेश्वरी महात्म्य हें  सर्व कांही, त्यांस अवर्णनीय वाटे. नडियाच्या त्या अवतारी पुरुषाने जें सांगितले, जें आचारिलें तें लोकांस समजविण्यासाठी त्यांनी ग्रंथापाठीमागून ग्रंथ लिहिले. वैष्णवधर्माची थोर महती गात असतांना त्यांच्या तोंडातून दुस-या पंथाविषयी एक तरी अनुदार उदा्र बाहेर पडावयाचा होता. पण छे, राय सीतानाथराय हे शिशिरबाबूंविषयी  म्हणाले, ''वैष्णवधर्म जवळ जवळ मेल्याप्रमाणें झाला होता त्यांत शिशिरबाबूंनी नवचैतन्य ओतलें, जगापुढें विचाराच्या पायावर सुंदर अशी इमारत त्यांनी उठविली. सर्व हिंदुस्थान तर त्यांच्यानानाविध चळवळींच्या मुळें ऋणी आहेच, परंतु त्यांतल्या त्यांत वैष्णवधर्मांचे लोकांवर तर त्यांचे न फिटणारे उपकार झाले आहेत.

वैष्णव धर्माचे संबंधीचे हे ग्रंथ ते मरेपर्यंत लिहित होतेच. परंतु  मरण्याचे आधीं ४-५ वर्षे त्यांनी परलोकविद्येच्या संबंधी एखादें मासिक काढण्याचें ठरविले. मासिक काढलें म्हणजे व्याप वाढतो. आपले लोक ही विचार प्रदर्शित करुं लागतात. नानाप्रकारचे अनुभव प्रसिध्द होऊन त्यांच्यावर शास्त्रीय चर्चा होऊं लागते.

शिशिरबाबूंचे महाराज सर जोतींद्र मोहन टागोर हे एक परम मित्र होते. ज्योतिद्र मोहन हे फार विद्वान व सुसंस्कृत, त्याचप्रमाणें अनुभवी  होते. शिशिरबाबूंनी त्यांस सल्ला विचारली. शिशिरबाबूंस त्यांनी जें पत्र पाठविलें त्याचा सारांश मी देतो.

''तुम्ही जें मासिक काढणार आहांत, त्यांचे सर्व लोक मोठया उत्साहाने व आनंदाने स्वागत करितील अशी मला आशा आहे. ज्याला म्हणून  गूढवादाची गोडी आहे, परलोकींच्या गोष्टी जाणण्याची जबर जिज्ञासा आहे, तो तो, आपणांस धन्यवाद देईल अशी आम्हांस खात्री आहे. अशा प्रकाराचे मासिक चालवण्यास लायक माणूस तुमच्याशिवाय अन्य मला खरोखरच दिसत नाही. तुमची बुध्दिमता असामान्य आहे, तुमची योग्यता अलौकिक आहे, तुम्ही ज्ञानांत मुरलेले आहांत ऋषीप्रमाणे आपले विचार जिवंत व अभिनव असतात. त्यांत नाविन्य असते.  पारलौकिक ज्ञानाचा प्रसार करण्यात विचार करण्यांत आपण दाखविलेला उत्साह, आपली दिसून आलेली कळकळ केवळ दुर्मिळ होत तुमच्या कार्यात तुम्हासं यश येईल याबदद्ल यत्किंचित्ही शंका नाही.  राजकारणी पुरुष म्हणून जगाला तुमची ओळख आहे. कारण अमृतबझारपत्रिकेचा तुमच्याशी संबंध आहे. परंतु खरें पाहिलें तर भक्तिपूर्ण भावांने आणि प्रेमाने लिहिलेले आपले धार्मिक ग्रंथ पाहिले म्हणजे  शाश्वत गोष्टीवर विचार करणारे म्हणूनच तुमची जास्त प्रसिध्दी झाली पाहिजे.