शिशिरकुमार घोष 10
परंतु रानडयांनी एकदां सांगितल्याप्रमांणे हें जगणें नव्हे, हें मरणें आहे. टॉलस्टाय म्हणतो. ‘To be good and bad a good life Means to give to others more than one takes from Them . The less there is of love for self with all the ensuing care about self and the selfish demands made upon the labour of others, and the more three is is of love for others, with the resultant care for and labor bestowed upon others, the better is the life. The more a man gives to others and the less he demands for himself the better he is, the less be gives to others and the more he demands for him self the worse he is” अशा प्रकारें परासाठी जगणें म्हणजेच स्वत:चा अत्यंत स्वार्थ होय. हिरालाल या दृष्टीने अत्यंत उच्च असा जीवनक्रम संपवून गेला. आत्महत्या करणें हें पाप असो, तें गर्हृहि असेल, परंतु त्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नसून परार्थ साधतां येत नाही. म्हणून स्वत:जीव धारणें हे त्यास अशक्य झालें.
हिरालालच्या या आकस्मिक मरणप्रसंगाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. एकामागून एक आले. लेक हे कठोर आघात सहन करण्यास परमेश्वरानेंच सामर्थ्य द्यांवे लागतें. या बंधुवर्यांची आई आधींच पतिनिधनानें खिन्न व पोळलेली. त्यांत आपल्या गुणसंपन्न, सुशील व थोर वृत्तीच्या मुलाचा तारुण्यात अजून प्रवेश झालेला नाहीं ताच असा अकल्पित व दु:खकारक शेवट पाहून तिच्या अंत:करणाची काय स्थिती झाली असेल ती त्या स्थितींतील आयांनाचय समजेल. इतरांस त्याची थोडी कल्पना येणेंहि अशक्य आहे. हिरालालच्या आईनें त्याचा ध्यास घेतला. हें शिशिर यास सहन होईना. मुलांनी आपल्या मातेचें समाधान करण्याची पराकाष्ठा केली. परंतु तिचें सांत्वन होईना. शिशिरच्या शुर हृदयाची ही परीक्षा होती. दिलाची शहानिशा व्हावयाची होती. दु:खात चूर झालेल्या माझया मातेला मी कसं सुख द्यांवे याविषयी तो विचार करुं लागला. जेथें विलक्षण इच्छा असते तेथें मार्गही लवकरच सांपडतो. परदेशांतून या सुमारास परलोकविद्येविषयीच्या नवीन शास्त्रीय कल्पना या परलोकविद्येच्या माहेरघर म्हणून मानलें जाणा-या भारतवर्षाच्या किना-यावर येऊन आदळत होत्या. परंतु फारच थोडया सुशिक्षितांची दृष्टि या चित्ताकर्षक शास्त्राकडे वळली होती. बाबू पिअरी चंद्र मित्र व आणखी दोनचार व्यक्ति सोडल्या तर कलकत्यामध्यें या गोष्टीत कोणी मन घातलें नव्हते. या परलोकाविद्याविषयीची शहानिशा करावी, या जगांतून दूर गेलेला आत्मा पुन:भेटू शकतो काय, कसा भेटेल वगैरे गोष्टीचे संपूर्ण व शास्त्रशुध्द चिकित्सात्मक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी हा वीर अमेरिकेत जाण्यास तयार झाला.
आईला समाधान व सुख व्हावें म्हणून कोण हा अटटाहास, कोण ही यातायात! पंरतु एकदां मनांत विचार आलां म्हणजे तदर्थ काहींही करण्यास माघार घेणारा हा मोहरा नव्हता. कचरणारा कच्च्या दिलाचा हा गडी नव्हता.