कोडे: प्याला आणि आशा निराशा – निमिष सोनार
जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.
आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.
त्यानंतर आपण थोडे पुढे जाऊ आणि त्यात चार शक्यता येतात.
(A) समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो -
(1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(2) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.
(B) समजा एक निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो -
(3) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(4) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.
मग A(1) आणि B(4) याना काय म्हणाल? आशावादी कि निराशावादी? आणि का?