Get it on Google Play
Download on the App Store

विनोदी: फिस्कटलेला फराळ – निखील शेलार

ग्रामीण भागात सकाळी पहाटे कोंबडा आरवतो आणि गावकरी आपल्या दिवसाला सुरुवात करतात. पण आपल्या शहरी भागात सकाळी कोंबड्याच्या ऐवजी अलार्म वाजतो.आपण तो अलार्म १०-१० मिनिटांसाठी स्नुझ (Snooze) करतो. शेवटी घड्याळाचा काटा आणि आपला आळस एका अपरिहार्य झोन मध्ये आला की आपल्याला उठावेच लागते. उठताना आपण घड्याळाकडे एक रागाने कटाक्ष टाकून अरे बापरे ८ कसे वाजले असे बोलून ८.३५ ची ट्रेन कशी भेटेल यासाठी आपली त्रेधातिरपिट उडते.तसे ग्रामीण भागातील गावकरी तसे लकी (Lucky) आहेत की त्यांचा कोंबडा आपल्या अलार्म सारखा स्नुझ (snooze)होत नाही म्हणून त्याच्या आळसाला कुठेही जागा उरत नाही. असो, हे सगळे सांगण्यात माझा हेतू हा होता की पूर्ण वर्षभरात एकच असा दिवस येतो की जेव्हा सकाळी लवकर न उठण्याची कोणतीच सबब त्या दिवशी वर्क (work) होत नाही तो दिवस म्हणजे दिवाळी पहाट. त्या दिवशी आपला अलार्म वाजण्याआधी आपल्या परिसरातील फटाकेच झोपमोड करतात. एक मोठी फटाक्याची माळ वाजू लागते आणि आपण आपली तोंडातील लाळ पुसून आता पुन्हा झोपणे नाही असे स्वतशीच बोलून अर्धवट उघड्या डोळ्यांनी बाथरूमचा दरवाजा शोधतो.

या वर्षी दिवाळीला बऱ्यापैकी म्हणजे पंधरा दिवसाचा अजुन अवधी होता. बायकोला विचारले की यावर्षी फराळ कधी बनवणार आहेस. तिने नेहमी प्रमाणे काही माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. पण पुन्हा डिवचले तेव्हा ती बोलली की ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणून दिवाळीच्या आधी आठवडा फराळ करायला घेऊ. हे ऐकुन थोडासा सुटकेचा निःश्वास मी घेतला. पण कसले काय आणि कुठले काय... आता दिवाळी सुरुवात व्हायला तीनच दिवस उरले होते. तिथे बायकोचा बॉस बायकोसाठी कामांचा मुसळधार पाऊस पाडत होता. त्यामुळे आमच्या फराळ नावाच्या कसोटी सामन्यांचा टॉस देखील उडवला जात नव्हता. शेवटी भीती इतकीच होती की या मुसळधार ऑफीस कामामुळे बायको स्वयंपाक घरात डकवर्थ लुईस मेथड अमलात आणून फक्त शंकरपाळ्या बनवून बाकी सर्व फराळ रेडिमेड आणते की काय असे वाटू लागले होते. दुसऱ्या बाजूला माझ्या ऑफिसमध्ये मी एका मोठ्या प्रोजेक्टचे काम संपवून थोडासा फ्री झालो होतो. प्रोजेक्टचे रिझल्ट सुद्धा चांगले दिसत होते. त्यामुळे माझ्या ऑफिस मध्ये मी सध्यातरी तव्यावर नव्हतो. संध्याकाळी योग्य वेळेवर निघायला भेटत होते. म्हणून म्हटले की चला या वर्षी दिवाळी आपल्या परीने साजरी करू. स्वयंपाक घराचे बोलाल तर मी चहा, डाळभात, ऑमलेट यासारखे आपत्कालीन परिस्थितीत आपल्या पोटाचे खळगे भरू शकते इतकेच पदार्थ येत होते. लहानपणी आईला कधी कधी फराळात थोडी फार मदत केली इतकाच तटपुंजा अनुभव गाठीशी बांधून मी फराळ नावाचा कोंढाणा गड सर करायचे ठरवले.

ऑफिसमध्ये होतो तेव्हाच यूट्यूबचे फराळाचे ऑफलाईन व्हिडिओ सेव्ह (save) केले. घरात एक अन्नपूर्णा नावाचे रेसिपी बुक होते त्याची फराळाच्या रेसिपीची काही पाने चाळली. बेसन लाडू आणि चकली हे दोन पदार्थ सर्वात आधी बनवू अशी कागदावर मांडणी केली. मग या अन्नपूर्णा पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे काय काय जिन्नस लागतील ते सर्व एका कागदावर उतरवले आणि थेट डीमार्ट (Dmart) गाठले. या बाजारहाट प्रकारची पण गम्मत आहे. आपण एरवी कोणतीही नवी वस्तू विकत घेतली की ती महाग असते पण ती वस्तू एक दिवस वापरून पुन्हा विकायला काढली तर त्यावर सेकंडहॅण्डचा टॅग लागून ती जुनी होते आणि त्यावर घसारा किंवा भावउतार (depreciation) चा फॉर्म्युला लागून त्याची किंमत जवळपास निम्मी होते. पण बाजारहाट प्रकारात जुना तांदूळ महाग असतो तर नवीन तांदूळ स्वस्त असतो. याच कन्फ्युजन मध्ये मी लहानपणी एकदा नवीन तांदूळ स्वस्त मिळतोय म्हणून तोच आणला आणि आईचा ओरडा खाल्ला. त्यानंतर एक दिवस तांदळाचा फॉर्म्युला मी डाळीवर लावला आणि जुनी डाळ स्वस्त देत होता म्हणून ती जुनी डाळ घेऊन आलो तेव्हा पुन्हा आईचा ओरडा खाल्ला. मग एकदा बसून आपले कन्सेप्ट क्लिअर केले की तांदूळ जुना चांगला म्हणून तो महाग असतो आणि डाळ नवीन चांगली म्हणून ती जुन्या डाळीपेक्षा महाग असते. हा कन्सेप्ट क्लिअर करता करता मोठा झालो. डीमार्ट मध्ये आलो आणि सर्व वस्तू लिस्ट प्रमाणे घेऊ लागलो. माझ्या चेहऱ्याची गरिबी इतकी आहे की ती मला नेहमी डीमार्ट मध्ये जाणवते. मी डीमार्ट मध्ये एका ठिकाणी उभा राहून कोणत्या वस्तू लिस्टमधील शिल्लक आहेत असा विचार करत होतो इतक्यात एक नॉन महाराष्ट्रीन सुंदर तरुणी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली "अरे भाई इससे छोटा साइज का टॉप मिलेगा क्या ?"क्षणभर मी गोंधळलो पण नंतर कळले की ती मला डीमार्ट (Dmart) चा स्टाफ समजत आहे. तेव्हा मी तिला इंग्लिश मध्ये प्रत्युत्तर दिले की I am not Dmart Staff, I am a customer. तशी ती सॉरी बोलून निघून गेली. असे प्रसंग माझ्या जीवनात वारंवार घडत असतात त्यामुळे त्याचं काही वावग वाटले नाही.

अशा गरीब चेहऱ्याचे जसे तोटे आहेत तसे फायदे सुद्धा आहेत. बस स्टॉप वर जेव्हा एकदा भिकारी जेव्हा माझ्याकडे पैसे मागतो तेव्हा त्याला मी एकदा नकार दिला तरी तो निघून जातो. माझ्या बाजूला एखादा राजबिंडा तरुण उभा असेल तर तोच भिकारी त्याने पैसे दिल्याशिवाय त्याचे पाय सोडत नाही. तेव्हा अशा साध्या भोळ्या चेहऱ्याचा गर्व वाटतो. असो लिस्ट मध्ये नमूद जवळपास सर्वच वस्तू भेटल्या. घरी आल्यावर युट्यूबचे ऑफलाईन व्हिडिओ पाहता पाहता मी माझ्या फराळाचा श्रीगणेशा केला. कधी चकलीच्या पिठात पाणी जास्त होत होते म्हणून एक्स्ट्रा पीठ टाकले. तेव्हा मग पीठ जास्त आणि पाणी कमी होऊ लागले. अशा सारवासारवी धोरणात मी त्या चकलीच्या भांड्याने चकल्या पाडायला घेतल्या. गोल गोल चकली काढताना त्या दूरदर्शन वाहिनी सुरू होताना एक वर्तुळाकार चक्र एका कर्कश पार्श्वसंगीतासह फिरताना दिसायचे ते चक्र फिरून झाले की दूरदर्शनवरचे कार्यक्रम सुरू होत असे, त्या चक्राची आठवण आली. ज्यांना हे चक्र डोळ्यासमोर आले ते नक्कीच ८० च्या दशकात किंवा त्या आधी जन्माला आले असतील. त्यानंतर जन्म घेतलेल्या इतरांनी लक्ष देऊ नका.

चकल्या जेव्हा पाडून तळायला घेतल्या तेव्हा त्या कढईत आत्महत्या करत आहेत असे वाटले. तेलात गेल्यावर त्या चकल्याचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया सारखे दोन भाग पडत होते. तेल गरम होईपर्यंत चकल्या बाहेर काढायला माझ्याकडे पुष्कळ वेळ होता. पण एकदा तेल गरम झाले की माझी तारांबळ उडाली. कोणती चकली आधी टाकली आणि कोणती नंतर टाकली याचा थांगपत्ता नव्हता. वाटत होते की सर्व चकल्याना रोल नंबर चिकटवून मग तळले पाहिजे. तळलेल्या चकल्या ना माझ्या अकुशल कामगिरीमुळे वेगवेगळे रंग प्राप्त झाले होते. काही तांबूस चकल्या होत्या, काही तपकिरी रंगाच्या, काही चॉकलेटी तर तळून करपलेल्या चकल्या ना काळसर लाल रंग प्रधान झाला होता. पदार्थ एक पण रंग अनेक अशी अवस्था झाली होती.

याच चकल्या जेव्हा एका प्लास्टिक डब्यात भरल्या तेव्हा एका लाकडाच्या आंब्याच्या पेटीत पायरी, तोतापुरी पासून ते हापूस आंबा अशा सगळ्या व्हरायटी (Variety) भेटत होत्या असा फिल आला. मी बनवायला गेलो हापूस आणि हाती आला पायरी आंबा अशी गत झाली. पण मी पण माझी पायरी ओळखून तो पायरी आंबा accept केला. जी अवस्था चकल्याची होती तशीच अवस्था दुसऱ्या दिवशी बेसनाच्या लाडूची होती. बेसनाचे लाडू ज्या ताटात ठेवले होते त्या बसल्या जागेवरून उठण्याची तसदी घ्यायला तयार नव्हते. प्रत्येक लाडू मध्ये मी अर्धा काजू मानाचा तुरा म्हणून रोवला होता. एक दिवसानंतर ते लाडू इतके कडकं झाले की ज्याला हे लाडू खाण्यास द्यावे त्याला एक सोबत हातोडी सुद्धा द्यावी लागेल. त्यातील एका लाडूच्या परिघाला जर सिझन बॉल सारखी गोल शिलाई मारली आणि तो लाडू जर जसप्रीत बुमराह ला दिला तर तो वानखेडे स्टेडियमच्या पीचवर इनस्विंग आणि आउटस्विंग अशा दोन्ही प्रकारे लाडूला स्विंग करेल. हा विनोदाचा भाग झाला. मी उत्तम फराळ बनवून बायकोला सरप्राइज देणार होतो पण ते काही जमले नाही. तिनेच ऑफिस मधून येताना सगळा फराळ रेडिमेड आणून मलाच सरप्राइज केले. स्वयंपाक घरातील पसारा पाहून ती रागवण्याआधीच मी पसार झालो होतो.

न्युक्लिअर टेस्ट जशी अयशस्वी झाल्यावर जसे वैज्ञानिकांची मान दुःखाने खाली होते तसा माझा हा प्रयत्न असफल झाल्यामुळे माझी मान शरमेने खाली झाली होती. पण विज्ञान असो की एखादा शोध असो, त्यास एखादी टेस्टिंग किंवा रिसर्च असफल होणे ही सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक असफल प्रयत्नानिशी आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असतो. प्रयोगातून विद्या उगम पावते ते खरेच. त्यामुळे पुढच्या वर्षी जोमाने प्रयत्न करू आणि खमंग फराळ बनवू. पण जाता जाता तुम्हाला प्रश्न पडेल की रेडिमेड फराळसमोर माझे लाडू आणि माझ्या चकल्यांचे काय झाले. तर आम्ही आमचा रेडिमेड फराळ जेव्हा आमच्या पाहुण्यांना देत होतो तेव्हा जशी मिठाईच्या पेटाऱ्यात लपून शिवाजी महाराजांनी जशी आग्र्याच्या नजरकैदेत आपली सुटका केली आणि एकाही मुघलाला संशय सुद्धा नाही आला नेमके तसेच त्या माझ्या चकल्या आणि लाडू त्या रेडिमेड फराळात मिक्स करून पाहुण्यांना दिल्या आणि माफ करा पण आमच्या एकाही पाहुण्यांना आमच्या या चलाखीचा संशयसुद्धा आला नाही. माझा फिस्कटलेला फराळ संपल्यावर अखेर मी सुटकेचा निःश्वास टाकला.

लेखणी : निखिल शेलार (9987959084)

आरंभ: डिसेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ अंक (डिसेंबर ते मार्च 2019-20) संपादकीय || लेख विभाग || अध्यात्म: गीता महती - सुभाष देशपांडे, मुंबई सामाजिक: आमची ‘येष्टी’ - अविनाश हळबे, पुणे प्रवासवर्णन: नेपाळवर बुलेटस्वारी - अजित मुठे अध्यात्म: कर्मयोगातून साक्षात्कार गाठता येणे शक्य आहे काय? - सद्गुरू (ईशा फौंडेशन) मार्गदर्शन: इतरांच्या अपेक्षा सांभाळताना! - सद्गुरू (ईशा फौंडेशन) चित्रपट वेध: आमची माती, आमची माणसे आणि आपला चित्रपट - निखील शेलार आयुर्वेद: जीवन जगण्याचे शास्त्र - डॉ.केतन हरिभाऊ दांगट माहितीपर: कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (कॉप-१४) – स्वस्ति सामाजिक: वृद्धाश्रम - प्रणाली कदम, मुंबई महिला सक्षमीकरण: स्त्री पुरुष समानता : काळाची गरज - निखिल शेलार महिला सक्षमीकरण: सक्षम 'स्व'रक्षणाय - मैत्रेयी प्रतिभा प्रदीप महिला सक्षमीकरण: ती वांझ नाहीच - सरिता भोसले महिला सक्षमीकरण: रूढी परंपरा आणि तिचं सौभाग्य - सरिता भोसले लिहिणाऱ्या उत्सवात गझल, कवितांना बहर - प्रकाश क्षीरसागर, गोवा विनोदी: शेवटी मी मत कोणाला दिले? - शरणप्पा नागठाणे विनोदी: फिस्कटलेला फराळ – निखील शेलार जागरूकता: मानवा, ते येत आहेत! - निमिष सोनार, पुणे तत्वज्ञान: बाकी दुःख - उदय जडिये तत्वज्ञान: समाधान - रोहन केदारे, भांडूप गणेश विशेष: प्रथम तुला वंदितो गजानना - निखील शेलार गणेश विशेष: ग्लोबल बाप्पा..सबळ बाप्पा! - जुईली अतितकर सामाजिक: गोतवळ्यातील माणूस! - मंजुषा सोनार पुस्तक परीक्षण: एका दिशेचा शोध - ओंकार दिलीप बागल बापाचं काळीज - किशोर चलाख अन् गुलाबाला काटे मिळाले - प्रकाश क्षीरसागर चित्रपट परीक्षण: फत्तेशिकस्त - निमिष सोनार, पुणे विडंबन: बंड्या आणि टूथपेस्ट – निमिष सोनार, पुणे रेसिपी: निनाव – नीला पाटणकर रेसिपी: बिरडे - नीला पाटणकर कोडे: प्याला आणि आशा निराशा – निमिष सोनार नाटक परीक्षण: देहभान - वैष्णवी कारंजकर, सातारा मायेचे अन्न - मंजुषा सोनार, पुणे || कविता विभाग || कविता: आम्हांला सोडून - योगेश रामनाथ खालकर कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो चारोळ्या: नीला पाटणकर, शिकागो कविता: एक असावा नवरोबा (भाग १) - नीला पाटणकर, शिकागो कविता: एक असावा नवरोबा (भाग २) - नीला पाटणकर, शिकागो गझल: तू - प्रकाश क्षीरसागर चारोळी: दु:ख आणि जिद्द - विलास गायकवाड, लातूर कविता: किंमत आसवांची - विलास गायकवाड, लातूर कविता: माणूसकी जळते आहे - विलास गायकवाड, लातूर कविता: ओढ तुझी - मयुरी घग कविता: आठवणी - सुवर्णा कांबळे कविता: काय मी शोधत गेलो ? प्रा.गायकवाड विलास कविता: आस - मयुरी घाग || कथा विभाग || विनोदी कथा: संशयाचे शरसंधान - सविता कारंजकर, सातारा विज्ञान कथा: 31 डिसेंबर - निमिष सोनार प्रेरणा कथा: अंधारातूंन प्रकाशाकडे - नीला पाटणकर, शिकागो भय कथा: त्या वळणावर - निमिष सोनार प्रेम कथा: सरप्राईज - राहुल दवे, मिशिगन बोध कथा: असा हा जगदीश! - प्रणाली कदम || कला विभाग || अक्षता दिवटे पेंटिंग शरण्या गिर्जापुरे पेंटिंग सिद्धेश देवधर व्यंगचित्रे हेमंत बेटावदकर पेंटिंग सद्गुरू वाक्ये (ईशां फौन्डेशन) तीन कविता: धगधगते वास्तव - स्वप्नील धने