Get it on Google Play
Download on the App Store

आयुर्वेद: जीवन जगण्याचे शास्त्र - डॉ.केतन हरिभाऊ दांगट

9422358617/9975427432

निरोगी व दीर्घायुषी जगण्याचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

आयुष्यासाठी हितकर ,अहितकर,सुखकर, दुःखकर तसेच पथ्य कारक व अपथ्याकारक गोष्टींचा विचार करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हा अथर्ववेदाचे उपांग असून तज्ञ अशा मुनिवरांकडून उत्तरोत्तर विकसित झाला आहे. कोणतेही आधुनिक साधने उपलब्ध नसताना हजारो वर्षे निसर्ग आणि मानवी शरीराचे सखोल निरीक्षण करून लिहून ठेवलेले आरोग्याचे नियम व औषधी यांचे दिसून येणारे सुपरीणाम पाहून आपण अचंबित होतो.

त्रिदोष:

वात ,पित्त ,कफ हे तीन दोष शरीर व मनाचे नियंत्रण करतात ,असे आयुर्वेद शास्त्र सांगते .शरीराची वाढ करणारा कफ, आहाराचे शरीर भावात रूपांतर करणारे पित्त, संचलन करणारा वात असे तीन दोष. शरीराच्या सर्व क्रिया व रचना या तीन दोषांच्या अधीन आहेत. या त्रिदोषची उत्पत्ती ,पृथ्वी ,जल ,तेज ,वायू ,आकाश या पंचमहाभूतांपासून होते. दोष समतोल अवस्थेत असल्यास शरीराचे क्रियाव्यापार सुरू राहून शरीर निरोगी राहते, पण हाच समतोल बिघडला तर विविध व्याधी उत्पन्न होतात.

निदान:

व्याधीचे निदान हे पूर्वरुप, रूप,लक्षण यावरून त त्रिविध परीक्षा ( दर्शन , स्पर्शन, प्रश्न) तसेच प्रकृती, नाडी ,मल, मुत्र, जिव्हा ,सार, सत्व, सात्म्य या परिक्षांद्वारे केले जाते.

चिकित्सा:

ज्या उपक्रमांच्या साहाय्याने त्रिदोष, सात धातू व तीन मल यांचे समतोल प्रमाण राखले जाते त्यास चिकित्सा असे म्हणतात.  दोन प्रकार - १. शमन चिकित्सा  २. शोधन चिकित्सा ( पंचकर्म )
शमन चिकिस्तेत वनस्पती  औषधी व रसौषधीचा आंतर्भाव होतो. चूर्ण, वटी, गुटी, काढा, आसव, अरिष्ट, भस्म, स्वरस, अवलेह, लेप, सिद्ध तेल, तूप यांचा व्याधिनुसार वापर केला जातो.

रोग निर्माणकारी दोषांना शरीराच्या बाहेर काढून टाकणाऱ्या सर्व उपक्रमांना शोधन असे म्हणतात. प्रमुख पाच उपक्रम असल्याने यांना पंचकर्म असे म्हणतात.

पंचकर्म चिकित्सा:

पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी साठी करावयाचे उपक्रम.वमन-उलटी करविणे, विरेचन-जुलाब करविणे, बस्ती - औषधी तेल व काढा गुदद्वार द्वारे शरीरात सोडणे , नस्य- नाकात औषध टाकणं, रक्तमोक्षण- अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढणे. पंचकर्मामुळे  व्याधी समूळ नष्ट होतात. तसेच रोग निर्माण होऊ नयेत आणि रोगप्रतिकरकशक्ती वाढवण्यासाठी पंच-कर्म उपयुक्त आहेत. म्हणजेच स्वस्थ व्यक्तींमध्ये स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि रुग्णांमध्ये आजार दूर करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरते.

डॉ.केतन हरिभाऊ दांगट
एम.डी. आयुर्वेद
महेश्वर क्लिनिक,
तुकाई टेकडी चौक,
हडपसर,
पुणे -४११०२८

आरंभ: डिसेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ अंक (डिसेंबर ते मार्च 2019-20) संपादकीय || लेख विभाग || अध्यात्म: गीता महती - सुभाष देशपांडे, मुंबई सामाजिक: आमची ‘येष्टी’ - अविनाश हळबे, पुणे प्रवासवर्णन: नेपाळवर बुलेटस्वारी - अजित मुठे अध्यात्म: कर्मयोगातून साक्षात्कार गाठता येणे शक्य आहे काय? - सद्गुरू (ईशा फौंडेशन) मार्गदर्शन: इतरांच्या अपेक्षा सांभाळताना! - सद्गुरू (ईशा फौंडेशन) चित्रपट वेध: आमची माती, आमची माणसे आणि आपला चित्रपट - निखील शेलार आयुर्वेद: जीवन जगण्याचे शास्त्र - डॉ.केतन हरिभाऊ दांगट माहितीपर: कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (कॉप-१४) – स्वस्ति सामाजिक: वृद्धाश्रम - प्रणाली कदम, मुंबई महिला सक्षमीकरण: स्त्री पुरुष समानता : काळाची गरज - निखिल शेलार महिला सक्षमीकरण: सक्षम 'स्व'रक्षणाय - मैत्रेयी प्रतिभा प्रदीप महिला सक्षमीकरण: ती वांझ नाहीच - सरिता भोसले महिला सक्षमीकरण: रूढी परंपरा आणि तिचं सौभाग्य - सरिता भोसले लिहिणाऱ्या उत्सवात गझल, कवितांना बहर - प्रकाश क्षीरसागर, गोवा विनोदी: शेवटी मी मत कोणाला दिले? - शरणप्पा नागठाणे विनोदी: फिस्कटलेला फराळ – निखील शेलार जागरूकता: मानवा, ते येत आहेत! - निमिष सोनार, पुणे तत्वज्ञान: बाकी दुःख - उदय जडिये तत्वज्ञान: समाधान - रोहन केदारे, भांडूप गणेश विशेष: प्रथम तुला वंदितो गजानना - निखील शेलार गणेश विशेष: ग्लोबल बाप्पा..सबळ बाप्पा! - जुईली अतितकर सामाजिक: गोतवळ्यातील माणूस! - मंजुषा सोनार पुस्तक परीक्षण: एका दिशेचा शोध - ओंकार दिलीप बागल बापाचं काळीज - किशोर चलाख अन् गुलाबाला काटे मिळाले - प्रकाश क्षीरसागर चित्रपट परीक्षण: फत्तेशिकस्त - निमिष सोनार, पुणे विडंबन: बंड्या आणि टूथपेस्ट – निमिष सोनार, पुणे रेसिपी: निनाव – नीला पाटणकर रेसिपी: बिरडे - नीला पाटणकर कोडे: प्याला आणि आशा निराशा – निमिष सोनार नाटक परीक्षण: देहभान - वैष्णवी कारंजकर, सातारा मायेचे अन्न - मंजुषा सोनार, पुणे || कविता विभाग || कविता: आम्हांला सोडून - योगेश रामनाथ खालकर कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो चारोळ्या: नीला पाटणकर, शिकागो कविता: एक असावा नवरोबा (भाग १) - नीला पाटणकर, शिकागो कविता: एक असावा नवरोबा (भाग २) - नीला पाटणकर, शिकागो गझल: तू - प्रकाश क्षीरसागर चारोळी: दु:ख आणि जिद्द - विलास गायकवाड, लातूर कविता: किंमत आसवांची - विलास गायकवाड, लातूर कविता: माणूसकी जळते आहे - विलास गायकवाड, लातूर कविता: ओढ तुझी - मयुरी घग कविता: आठवणी - सुवर्णा कांबळे कविता: काय मी शोधत गेलो ? प्रा.गायकवाड विलास कविता: आस - मयुरी घाग || कथा विभाग || विनोदी कथा: संशयाचे शरसंधान - सविता कारंजकर, सातारा विज्ञान कथा: 31 डिसेंबर - निमिष सोनार प्रेरणा कथा: अंधारातूंन प्रकाशाकडे - नीला पाटणकर, शिकागो भय कथा: त्या वळणावर - निमिष सोनार प्रेम कथा: सरप्राईज - राहुल दवे, मिशिगन बोध कथा: असा हा जगदीश! - प्रणाली कदम || कला विभाग || अक्षता दिवटे पेंटिंग शरण्या गिर्जापुरे पेंटिंग सिद्धेश देवधर व्यंगचित्रे हेमंत बेटावदकर पेंटिंग सद्गुरू वाक्ये (ईशां फौन्डेशन) तीन कविता: धगधगते वास्तव - स्वप्नील धने