सांगू कसे मी कोणाला? - सुवर्णा कांबळे, कळंबोली
suvarnakamble474@gmail.com
9960354673
सांगू कसे मी कोणाला? मलाही न कळे,
टोचतात, सलतात, अंतरीची वादळे.
काय केला मी गुन्हा? मज कधी न कळे
अश्रूंनी केले न तळे, अंतरीची वादळे.
मी सोसले, भोगले, यातना त्या न कळे
आर्ततेची हाक माझी, अंतरीची वादळे.