Get it on Google Play
Download on the App Store

सेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा

ashishkarle101@gmail.com  
9765262926


सेल्फ मेडिकेशन म्हणजे वैद्यकीय तपासणी व सल्ल्याशिवाय स्वतःहून औषधांचा वापर करणे होय.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली वाढ आणि सहजतेने उपलब्ध झालेले माहितीचे स्रोत यामुळे सेल्फ मेडिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
 
सेल्फ मेडिकेशन चे काही फायदेदेखील आहेत.
 
यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होतो शिवाय डॉक्टरांची वाट पाहण्यामध्ये जाणारा वेळ वाचतो,  काही काळापुरते त्रासापासून मुक्तता मिळते,  अविकसित व विकसनशील देशातील लोकांची आर्थिक परिस्थिती तसेच विकसित देशातील महागड्या आरोग्यसेवा यामध्ये कुठेतरी सेल्फ मेडिकेशन लोकांना फायदेशीर ठरते,  परंतु यामध्ये आरोग्यासंदर्भात दुष्परिणाम संभावण्याचा व रुग्णाच्या जिवावर भेतण्याचा धोका असतो.  त्यामुळे शक्यतो सेल्फ मेडिकेशन टाळावे.
 
सेल्फ मेडिकेशनचा माहीत स्रोत हा इंटरनेट,  यापूर्वी त्या औषधाचा वापर केलेले रुग्ण,  जाहिराती,  दूरदर्शनवरील व इतर प्रसार माध्यमातील विविध आरोग्यविषयक कार्यक्रम असतात.
 
बऱ्याचदा लक्षणे सारखी असली तरी आजार वेगळे आसू शकतात त्यामुळे सारख्या लक्षणांसाठी एकच औषध वापरणे टाळावे शिवाय रुगणाचे वय, लिंग,  वजन यानुसार औषधाची मात्रा (डोस) बदलत असतो.
 
प्रथमोपचारामध्ये सेल्फ मेडिकेशन बऱ्यापैकी फायदेशीर ठरते ज्यामुळे पुढे जाऊन उद्धभवनाऱ्या समस्या काहीअंशी टाळल्या जातात.
 
सुरक्षित सेल्फ मेडिकेशनसाठी औषधे व आरोग्यसंदर्भात माहिती असणे गरजेचे आहे.  यासाठी शक्यतो स्वतःहून औषधांचा वापर करण्यापूर्वी फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
 
सर्वसाधारणपणे Over The Counter Drugs (औषधयोजनेशिवाय घेता येणारी औषधे) यांचाच सेल्फ मेडिकेशन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो परंतु दुर्दैव बऱ्याच ठिकाणी जी औषधे फक्त औषधयोजना दाखवूनच खरेदी करता येतात अशी औषधे सुद्धा सहजतेने उपलब्ध होतात.  त्यामुळे सेल्फ मेडिकेशनचा धोका संभावण्याची शक्यता असते.
 
सुरक्षित सेल्फ मेडिकेशन व सेल्फ मेडिकेशनमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरवणारे फार्मासिस्ट,  डॉक्टर परिचारिका (नर्सेस) यांनी जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.
 
सेल्फ मेडिकेशन मध्ये फार्मासिस्टची भूमिका महत्वपूर्ण ठरते.  फार्मासिस्ट हा औषधातील कार्यकारी तत्व,  औषधाचा शरीरावर कसा परिणाम होतो,  शरीरावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात.  सेल्फ मेडिकेशन मध्ये औषधेही थेट फार्मासिस्ट कडूनच खरेदी केली जात असल्यामुळे यामध्ये फार्मासिस्टचा भूमिका खूपच महत्वपूर्ण आहे त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून औषधाचा वापर करण्यापूर्वी फार्मासिस्टचा सल्ल जरूर घ्यावा.
 
आणि शक्यतो सेल्फ मेडिकेशन टाळावे व औषधे ही डॉक्टरांकडून तपासणी करून डॉक्टर व फार्मासिस्ट यांच्या त्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत तसेच औषधाचा वापर केल्यानंतर होणाऱ्या समस्यांबाबत फार्मासिस्ट आणि डॉक्टरांशी संपर्क करावा.
 
जरी तुम्ही स्वतःहून कोणतेही औषध घेतले असेल आणि काही दुष्परिणाम जाणवू लागले असतील तर त्वरित त्या औषधाचा वापर थांबवून फार्मासिस्ट आणि डॉक्टरशी संपर्क साधावा.

आरंभ: सप्टेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय नऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे युरोपायन – रिता जोहरापूरकर १ युरोपायन – रिता जोहरापूरकर २ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २ मोठयांचे मोठेपण - अविनाश हळबे पर्यावरण आणि बांधकाम व्यावसायिक – प्रवीण गिरजापुरे सेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा जनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव नामदेवराव: प्रेमाचा निर्मळ झरा - किरण दहीवदकर, पुणे महादेव – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव धैर्याचे घाव – ओशो नागपंचमी ३२ शिराळा! – आशिष कर्ले डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा मी का लिहिते? - अंजना कर्णिक, मुंबई आईचे घर – मंजुषा सोनार, पुणे माझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव माझ्यातल्या मीचा मान!! - उर्मिला देवेन, जपान श्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते! - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव 'शिक्षक' नवयुगाचा शिल्पकार! – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव न्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्रपट - वर्षा सोनवणे न्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर श्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक! - राज जाधव, पुणे करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर पुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती – निमिष सोनार मुलाखत: राजेश बाळापुरे रेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन मैथिली अतुल यांची खुसखुशीत "नै" वन लायनर्स लीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे जसे आपण तसे जग? आशू लॅमोस, मस्कत सारे काही अनपेक्षित! - निमिष सोनार गरज आहे एका साक्षीची दहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन देणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन सत्य - भरत उपासनी, नाशिक बालपण – उदय जडीये, पिंपरी अरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे व्हॉट्सअप स्टेटस - प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे माझ्या मनातला पाऊस - जुईली अतितकर, नवीन पनवेल चांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे भेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे धनी – मोहन वायकोळे, बोईसर नवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक रथचक्र - भरत उपासनी, नाशिक सांगू कसे मी कोणाला? - सुवर्णा कांबळे, कळंबोली चारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली स्केचेस (रेखाटने) – हर्षलता पाटील ग्राफिटी – अविनाश हळबे स्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार स्केचेस (रेखाटने) – अथर्व सोनार, पुणे व्यंगचित्रे – सिद्धेश देवधर, गोवा व्यंगचित्रे – रोहिणी जाधव, बेलापूर निसर्ग छायाचित्रण – अनन्या बाळापुरे, चिंचवड नऊवारी साडीचे फोटो