Get it on Google Play
Download on the App Store

साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर

adivate484@gmail.com  
7483619155


दिवस एकामागून एक कसे निघुन गेले कळलेच नाही. आमच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली. पण अस वाटत की जणू कालचीच घटना आहे.

तशी मी मराठी मुलगी कॉलेज संपले आणि आमच्या घरच्यांनी माझे लग्न लावुन दिले.  गंमत अशी की माझ्या नवऱ्याला मराठी येत नव्हते कारण ते कर्नाटकाचे अणि मला कन्नड येत नव्हते.  आम्ही संभाषणासाठी नेहमी हिंदी भाषेचा वापर करायचो.  लग्न होऊन सहा महिने झाली तरी आमचे हे नेहमी कामात गुंतलेले असायचे.  आमच्या घरी मी अणि हे आम्ही दोघेच.  त्यामुळे मला फार कंटाळा यायचा.  
एका रविवारी सकाळी आमचे हे लॅपटॉप वरती काम करत असताना मला हाक मारली.

ते : चाय बनाओ.  
मी पटकन चहा बनवला आणि चहाचा कप त्यांच्यासमोरच्या टेबलावर आपटला.  
आज माझा मूड थोडा खराब आहे ओळखून ते म्हणाले
क्या हुआ? क्या बात है!
मी : आप कभी मुझे घुमाने ले के नही जाते हो.  घर मे बैठके बोअर हो जाती हु मै!
ते : आप को पता है ना सारे फॅक्टरी की जिम्मेदारी मुझपे है! चलो कोई बात नाही… आज शाम को सुदीप की राण्णा पिक्चर देखेंगे.

बोलल्या प्रमाणे त्यांनी दोन तिकीट बूक केली.  थेटर मध्ये ईतकी गर्दी होती की बापरे" कधी एकदाचा पिक्चर चालु होतोय अस वाटत होतं.

Bangalore मध्ये पहिल्यांदा मी पिक्चर बघणार होते.  आजूबाजूला खूप लोक होती.  अणि सुदीप चा प्रचंड कटआउट लावला होता त्यावर फुलांच्या मोठमोठ्या माळा.  सुदीप चे फॅन कटआउट वर दुधाचा अभिषेक करत होते.  हा काय प्रकार चालु आहे ते मला समजत नव्हते.  मी माझ्या मिस्टरांना विचारलं ते म्हणाले.  
साऊथ इंडियन पिक्चर मे ये सब कॉमन है! डोन्ट वरी.
थेटर चा एन्ट्री गेट ओपन झाला.  आम्ही आत गेलो.  पिक्चर चालु झाला.  

हा एक असा पिक्चर आहे की जिच्यामधे मनोरंजन,  कुटुंबातील प्रेम,  अणि सेंटिमेंट आहे.

हा पिक्चर चालू होतो तो एका श्रीमंत विभागलेल्या कुटुंबापासून.  कुटुंबातील मुलगी सरस्वती एका गरीब वकीलाशी गुपचूप लग्न करते.  हे तिच्या वडिलांना सहन होत नाही त्यामुळे ते मुलीशी असणारे सर्व नाती तोडतात.  या घटनेला जवळजवळ 25 वर्षे उलटली पन याचा पश्चाताप त्यांना होत असतो.  त्यांचा  नातू  सुदीप (कन्नड सुपरस्टार सुदीप) त्यांना वचन देतो की सरस्वतीला परत घेऊन येईन.

आजोबांना दिलेल्या वचनाप्रमाणे तो आपल्या सरस्वती आत्या  ला शोधतो.  अणि सरस्वती आत्या खुप जिद्दी असतात.  सरस्वती आत्या चा राग शांत करण्यासाठी व त्यांना परत घरी घेऊन जाण्यासाठी त्याला आत्याच्या घरात शिरण्याचा एक मोका हवा असतो.  जेव्हा सरस्वती आत्या घर सोडुन आल्या होत्या तेव्हा सुदीप लहान होता.  आता मोठेपणी तो कसा दिसतो ते सरस्वती आत्या ना माहीत नसते. या गोष्टीचा फायदा घेऊन तो ड्रायवर चंदू बनून आत्याच्या घरी एंट्री घेतो.  सरस्वती आत्या च्या दोन मुली असतात.  मोठ्या मुलीवर त्याला क्रश होतो.  मोठ्या मुलीच्या रोल हरिप्रिया (प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री) यांनी केला आहे.  अणि छोट्या मुलीचा रोल (रचिता राम) यांनी केला आहे.  सुदीप ड्रायवर म्हणुन काम तरी मिळवतो पण कोणती गाडी पेट्रोल वर चालते कोणती डिझेल वर हे त्याला माहीत नसते.  आत्याच्या घरच्यांनी भाजी आणायला सांगितले तर कोणत्या भाजी ला काय म्हणतात हे त्याला माहीत नसते.  त्यासाठी सुदीप एक बॅकअप टीम तयार करतो.  

सरस्वती आत्या कर्जबाजारी झालेल्या असतात कर्ज चुकविण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत जातो त्यासाठी त्यांना आपली हॉटेल विकावी लागतात.  पण सुदीप जाऊन मारामारी करून हॉटेल परत मिळवतो.  काही दिवसातच सुदीप ला कळते की अत्याची मोठी मुलगी दुसऱ्या मुलावर प्रेम करते अणि त्या मुलाचे लग्न ठरलेले असते.  ज्या घराण्यातील मुलीबरोबर आत्याच्या मोठ्या मुलीच्या प्रियकराचे लग्न ठरलेले असते ते घराने गुंडगिरी घराने असते.  रात्री सुदीप त्या मुलाला आणायला चाललेला असतो तेव्हा आत्याच्या छोट्या मुलीला संशय येतो की एवढ्या रात्री हा गाडी घेऊन जात आहे नक्कीच हा चोर आहे.  

गडबडीत तिचा पाय घसरतो तिच्या डोक्याला मार लागतो आणि ती त्याच्या गाडीत पडते.  जेव्हा सकाळी ती उठते तेव्हा तिला काहीच आठवत नसते.  (पिक्चर मध्ये हा सीन मला खूप आवडला) सुदीप त्या मुलाच्यालग्नात जातो आणि लग्नातुन मोठया मुलीच्या प्रियकराला पळवून आणतो.  नंतर त्याला कामावरून काढून टाकले जाते.  छोट्या मुलीचे लग्न ठरवले जाते.  त्याचवेळी अचानक सुदीप च्या आजोबांची तब्येत बिघडते.  काय करावे हे त्याला सुचत नसते.  त्याला फक्त एक चान्स हवा असतो अणि नशिबाने त्याला तो मिळतो.  त्या चान्स चा वापर तो कश्या पद्धतीने करतो.  सरस्वती आत्याच्या छोट्या मुलीला कसे प्रेमात पाडतो.  त्याच्या आई समान असणाऱ्या सरस्वती आत्याला परत घरी कसा घेऊन येतो हे सांगण्यापेक्षा बघण्यात खूप मनोरंजक आहे.  

प्रेम हे खूपच पावित्र्य असते.  प्रेम करा पण आई वडिलांवर,  भाऊ बहिणीवर,  कॉलेज मधे टाइमपास म्हणुन कुणावर प्रेम करू नका.  जर प्रेम केलेच तर लग्ना साठी आई वडिलांची मान्यता घ्या.  उगाच पळुन जाणे गुपचूप लग्न करून आई वडिलांना दुखवू नका.  आज काल पळुन जाणे फॅशन बनले आहे. ज्या आई वडिलांनी ईतक्या वर्षे तुमचे पालन पोषण केले त्यांना दुखवून तुम्ही कधीही सुखी राहू शकत नाही.  हा या पिक्चर चा सारांश आहे.

आरंभ: सप्टेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय नऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे युरोपायन – रिता जोहरापूरकर १ युरोपायन – रिता जोहरापूरकर २ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २ मोठयांचे मोठेपण - अविनाश हळबे पर्यावरण आणि बांधकाम व्यावसायिक – प्रवीण गिरजापुरे सेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा जनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव नामदेवराव: प्रेमाचा निर्मळ झरा - किरण दहीवदकर, पुणे महादेव – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव धैर्याचे घाव – ओशो नागपंचमी ३२ शिराळा! – आशिष कर्ले डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा मी का लिहिते? - अंजना कर्णिक, मुंबई आईचे घर – मंजुषा सोनार, पुणे माझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव माझ्यातल्या मीचा मान!! - उर्मिला देवेन, जपान श्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते! - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव 'शिक्षक' नवयुगाचा शिल्पकार! – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव न्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्रपट - वर्षा सोनवणे न्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर श्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक! - राज जाधव, पुणे करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर पुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती – निमिष सोनार मुलाखत: राजेश बाळापुरे रेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन मैथिली अतुल यांची खुसखुशीत "नै" वन लायनर्स लीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे जसे आपण तसे जग? आशू लॅमोस, मस्कत सारे काही अनपेक्षित! - निमिष सोनार गरज आहे एका साक्षीची दहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन देणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन सत्य - भरत उपासनी, नाशिक बालपण – उदय जडीये, पिंपरी अरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे व्हॉट्सअप स्टेटस - प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे माझ्या मनातला पाऊस - जुईली अतितकर, नवीन पनवेल चांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे भेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे धनी – मोहन वायकोळे, बोईसर नवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक रथचक्र - भरत उपासनी, नाशिक सांगू कसे मी कोणाला? - सुवर्णा कांबळे, कळंबोली चारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली स्केचेस (रेखाटने) – हर्षलता पाटील ग्राफिटी – अविनाश हळबे स्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार स्केचेस (रेखाटने) – अथर्व सोनार, पुणे व्यंगचित्रे – सिद्धेश देवधर, गोवा व्यंगचित्रे – रोहिणी जाधव, बेलापूर निसर्ग छायाचित्रण – अनन्या बाळापुरे, चिंचवड नऊवारी साडीचे फोटो