Get it on Google Play
Download on the App Store

न्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्रपट - वर्षा सोनवणे

ssraindrop.sonawane@gmail.com

न्यूड: काल पाहिला. काय बोलू.  किंवा काय लिहू. ? जबरदस्त,  सॉलिड,  हटके.
याही पुढे जाऊन मी म्हणेन.  हा चित्रपट  म्हणजे डोक्याला शॉट.  निशब्द. सुन्न. बधीर. व्हायला झाले,  चित्रपट संपला तेंव्हा.

म्हणजे माझ्यासकट सगळेच प्रेक्षक तसेच  निशब्द. निश्चल. बसून  राहिले होते पाच मिनिटं.  संपलेल्या चित्रपटाच्या पडद्याकडे पहात.  कुणाला जागेवरून उठावे,  हेच भान राहिले नाही. शे वटच्या सीनची ताकदच होती इतकी जबरदस्त.

ही कथा आहे यमुनेची.  गावात राहणारी.  नवऱ्याच्या अत्याचाराला त्रस्त होऊन,   आपल्या दहावी झालेल्या मुलाला घेऊन नेसत्या वस्त्रानिशी घर सोडून शहरात राहणाऱ्या चंद्रक्काकडे आलेली यमुना.  चंद्राक्काच करत असलेले न्यूड मॉडेलिंगचे काम स्वीकारते.  असे आणि इतकेच  मूळ कथानक आहे.  परंतु ते दाखवताना दिग्दर्शकाने तो विषय इतक्या वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे की hats off to him!!  असेच म्हणावे असे वाटते.

चित्रपट सुरू होतो,   त्यावेळचा पहिला सीन खूप  सुरेख  दाखविला  आहे.  पहाटेची झुंजुमुंजूची वेळ.  यमुना तिच्या झोपलेल्या मुलाची पापी घेऊन  नदीवर निघालीय.  नदीवर तिच्या आधीच सात आठ बायका कपडे धूत आहेत.  ती नदी,  त्या एका तालात कपडे धुणाऱ्या बायका,   आजूबाजूला अजुन पुरते न उजडल्यामुळे अंधुकस,  काळसर पांढरट दिसणारे आकाश.  आजूबाजूला हिरवीगार झाडी,   बॅकग्राऊंडला कुणीतरी गात असलेले एक गाणं.  आणि नदीत पोहण्यासाठी उतरलेली यमुना.  काय लिहावे त्या सीनबद्दल.  
अतिशय सुरेख निसर्गसौंदर्य दाखवणारा,   पण तरीही गूढ भासणारा.  काहीतरी अघटित पुढे घडणार आहे असा संदेश देणारा.  उत्सुकता वाढवणारा असा तो सीन.

त्यापुढे जे घडते ते प्रत्यक्षातच  पहावे.  पण जे घडते ते पाहताना 'कल्याणी मुळे' या अभिनेत्रीने रंगवलेली यमुना,  त्या पहिल्याच सीनमध्ये  मनाची पकड घेते.

माझ्या मतानुसार,  हा चित्रपट एकूण तीन टप्प्यात विभागला गेला आहे.

पहिल्या टप्प्यात: चित्रपटाची नायिका यमुना.  तिचा १० वी झालेला मुलगा.  तिचा बाहेरख्याली नवरा.  आणि त्याने यमुनेवर  केलेले   अत्याचार असा आहे.

दुसऱ्या टप्प्यात:  यमुनेचे मुंबईत तिच्या नवऱ्याला सोडून येणं.  आणि काम म्हणून तिच्या वाटेला चंद्रक्काच्या ओळखीने मिळालेले न्यूड मॉडेलिंग चे काम स्वीकारणे हे दाखविले आहे.  या मध्ये कल्याणी मुळे या अभिनेत्रीने यमुनेच्या चेहऱ्यावरचे जे  वेगवेगळे भाव  दाखविले आहेत ते फक्त पहावेच.  शब्द अपुरे पडतील इतका सुरेख अभिनय तिने केला आहे.  म्हणजे,  सर्व प्रथम  चंद्राक्का अश्या प्रकारचे मॉडेलिंग करते आहे हे समजल्यावर तिच्या विषयी  वाटणारा राग,  पण तरीही तिच्या या अश्या कामाविषयी यमुनेला वाटणारी उत्सुकता.  इतर दुसरे काम खूप शोधूनही  न मिळाल्यामुळे हे काम स्वीकारल्यावर,   प्रथम जेंव्हा ती पोजींगला बसते,  त्यावेळी झालेली तिच्या मनाची तगमग.  स्वतःचीच लाज,  आतून अपराधी वाटत असताना,  मुलाच्या शिक्षणासाठी मिळालेलं एकमेव काम करण्याचा निग्रह.  तरीही चित्रकार विद्यार्थ्यांच्या समोर अश्या विवस्त्र अवस्थेत बसताना तिच्या जीवाची चाललेली घालमेल. भीती. या सर्वांचे एकत्रित भाव कल्याणी ने खूपच प्रभावीपणे,  चेहऱ्यावरील हाव भावांमधून,  डोळ्यांमधून,  आणि शारीरिक हालचाली मधून दाखविले आहे.  

यानंतर काही काळाने या व्यवसायात स्थिरावलेली,  आत्मविश्वास मिळवलेली चित्रपटातील यमुना पाहताना फार सुरेख अनुभूती येते.  लाज. भीती.  अपराधी भावना.  ते थेट आत्मविश्वास.  हा प्रवास यमुनेने लीलया पेलला आहे.  

छाया कदम यांनी केलेली चंद्राक्काची भूमिकाही अतिशय सशक्त आहे.  त्यांचाही अभिनय छानच आहे.  परंतु त्या पात्राची लांबी फारशी नाहीय.

आणि तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात.

१. न्यूड मॉडेलिंगमुळे त्यावेळी बिघडलेली थोडी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती. नसुरुद्दिन शाह यांनी साकारलेली प्रतीकात्मक भूमिका.

२.  यमुनेच्या  मुलाच्या मनातील प्रश्न.  आई नक्की कोणते काम करीत आहे याबद्दल शंका,  यामुळे उठलेले त्याच्या मनातील वादळ,  त्याने आईशी केलेले असभ्य वर्तन.  त्याला  आई बद्दल सत्य माहित नसताना उगीचच वाटणारी चीड.  आणि

३. या कामातील अनुभव आणि नवीन पोझिंग ला  बसणाऱ्या मुलीला यमुनेचे मार्गदर्शन.  असे एकूण चित्रपटाचे स्वरूप आहे.
 
संपूर्ण चित्रपटात अगदी पहिल्यापासून ते शेवटच्या सीनपर्यंत यमुनेचे पाण्याशी असलेले,  गूढ तरीही आपुलकीचे नाते,   दाखविले आहे.  ती जेंव्हा जेव्हा दुःखी होते तेंव्हा तेंव्हा पाण्यात उतरते.  म्हणूनच शेवटीही मुलाने केलेली अवहेलना सहन न झाल्याने ती पुन्हा पाण्यामध्येच उतरते.  इथे मात्र गावातल्या नदी ऐवजी मुंबईचा अथांग,  भरती आलेला समुद्र असतो तिला मिठीत घेण्यासाठी.  (परंतु चित्रपटाचा शेवट हा नाहीय. )
 
मला वाटते,  सुरेख  छायाचित्रण ही या  चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे.

छायाचित्रण इतके छान आहे की काही प्रसंग अगदी ठाव घेतात हृदयाचा.  

सर्वात पहिला,  नदीवरचा प्रसंग कॅमेरामनने  फार सुरेख दाखविला आहे.

त्यानंतरच्या एका सीन मध्ये नवऱ्याने बाहेर,  चारचौघात पचकन  तोंडावर थुंकल्यामुळे,  अपमानित  झालेली,  जणू तो अपमानच धुवायला नेसत्या वस्त्रात नदीत उडी मारून,  तशीच ओलेती बाहेर येऊन पण तरीही अश्लील न वाटणारी,  भर गावातून चालत घरी जाणारी यमुना.  तिच्या  पाण्याने निथळत असणाऱ्या कपड्यांमधल्या ओल्या देहाला  पाठमोरं दाखवले आहे.  ते पाहताना काय होते हे शब्दातीत आहे.

पोझिंगला बसलेली  विवस्त्र यमुना  प्रेक्षकांना कुठंही आणि कधीही अश्लील भासली नाही  याचे श्रेय,   छायाचित्रकाराचे आहे.  त्यांनी खूप छान दिशेने ते दाखविले आहे,  ज्यामुळे आपल्याला तिचे विवस्त्र असणे अस्वस्थ करत नाही.  

आणि तसाच शेवटचा एक प्रसंग.  रिप रिप सुरू असलेला पाऊस,  सोबतीला खवळलेला,  भरती आलेला समुद्र.  जणू तो,  हिच्याच मनातील भावनिक उलथापालथ दाखवतो आहे.  काळजात चर्र करणारा असा तो प्रसंग.   हे सगळे फक्त आणि फक्त पाहूनच अनुभवावे असे!
 
'कल्याणी मुळे' या अभिनेत्रीचा जिवंत अभिनय.  
रवी जाधव यांचे उत्कृष्ठ दिग्दर्शन.  
अमलेंदु चौधरी यांचे अती सुरेख  छायाचित्रण.  
आणि सचिन कुंडलकर यांची  उत्तम  पटकथा.

अश्या चार भक्कम खांबांवर उभा राहिलेला "न्यूड" हा चित्रपट  प्रत्येकाने जरूर जरूर  पहावा असा आहे.
(अगदी अमराठी लोकांनीही बघावा.  इंग्रजी सब–टायटलची सोय आहे.)

आरंभ: सप्टेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय नऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे युरोपायन – रिता जोहरापूरकर १ युरोपायन – रिता जोहरापूरकर २ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २ मोठयांचे मोठेपण - अविनाश हळबे पर्यावरण आणि बांधकाम व्यावसायिक – प्रवीण गिरजापुरे सेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा जनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव नामदेवराव: प्रेमाचा निर्मळ झरा - किरण दहीवदकर, पुणे महादेव – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव धैर्याचे घाव – ओशो नागपंचमी ३२ शिराळा! – आशिष कर्ले डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा मी का लिहिते? - अंजना कर्णिक, मुंबई आईचे घर – मंजुषा सोनार, पुणे माझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव माझ्यातल्या मीचा मान!! - उर्मिला देवेन, जपान श्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते! - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव 'शिक्षक' नवयुगाचा शिल्पकार! – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव न्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्रपट - वर्षा सोनवणे न्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर श्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक! - राज जाधव, पुणे करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर पुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती – निमिष सोनार मुलाखत: राजेश बाळापुरे रेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन मैथिली अतुल यांची खुसखुशीत "नै" वन लायनर्स लीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे जसे आपण तसे जग? आशू लॅमोस, मस्कत सारे काही अनपेक्षित! - निमिष सोनार गरज आहे एका साक्षीची दहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन देणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन सत्य - भरत उपासनी, नाशिक बालपण – उदय जडीये, पिंपरी अरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे व्हॉट्सअप स्टेटस - प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे माझ्या मनातला पाऊस - जुईली अतितकर, नवीन पनवेल चांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे भेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे धनी – मोहन वायकोळे, बोईसर नवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक रथचक्र - भरत उपासनी, नाशिक सांगू कसे मी कोणाला? - सुवर्णा कांबळे, कळंबोली चारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली स्केचेस (रेखाटने) – हर्षलता पाटील ग्राफिटी – अविनाश हळबे स्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार स्केचेस (रेखाटने) – अथर्व सोनार, पुणे व्यंगचित्रे – सिद्धेश देवधर, गोवा व्यंगचित्रे – रोहिणी जाधव, बेलापूर निसर्ग छायाचित्रण – अनन्या बाळापुरे, चिंचवड नऊवारी साडीचे फोटो