Get it on Google Play
Download on the App Store

सारे काही अनपेक्षित! - निमिष सोनार

(हा इंटरनेटवरील काही लघूकथांचा स्वैर अनुवाद आहे)
 
1
त्या दिवशी पाच वर्षाचा मुलगा एलेक्स हा त्याचे वडील डेव्हिड यांच्या सोबत एकटाच बेडवर खेळत बसलेला होता,  तो म्हणाला, " पप्पा बेडखाली कुणीतरी आहे,  बघा ना!"
" अरे कुणी कशाला येईल बेडखाली?"
" बघा ना,  मला हालचाल जाणवतेय!"
" ठीक आहे,  तुझ्या समाधानासाठी बघतो" ,  असे म्हणून डेव्हिडने बेडखाली वाकून पाहिले,  बघतो तर काय घाबरून पाय दुमडून थरथरत अलेक्स बेड खाली बसला होता आणि घाबरत हळू आवाजात म्हणाला,
" पप्पा बेडवर कुणीतरी आहे!"

2
मी त्या दिवशी घरी एकटाच होतो.  रात्री सगळी दारं खिडक्या बंद करून बसलो.
तेवढ्यात लाईट गेली.  अंधारात चाचपडत मी टॉर्च शोधला आणि अचानक मला काचेवर कुणी टकटक करतंय असा आवाज आला.
मी काचेच्या खिडकीकडे टॉर्च मारून पाहिले आणि परत पुन्हा पुन्हा टकटक झाली पण तो आवाज त्या खिडकीतून येतच नव्हता.
खिडकी बाहेरही कुणीच नव्हतं.
मी आवाजाच्या दिशेने मागे टॉर्च वळवला तर कळलं की आवाज आरश्यातून येत होता.

3
मी हॉस्टेल रूम मध्ये एकटा रहात होतो तेव्हाची गोष्ट.
रोज रात्री एक मांजर खिडकीतून यायचं.  ते रोज रात्री टेबलावर बसून माझेकडे एकटक बघायचं.
त्याला एवढं माझेकडे एकटक बघून काय वाटायचं काय माहीत?
एकदा त्याच्या जवळ जाऊन मी पाहिलं तर लक्षात आलं की ते मांजर माझ्याकडे नाही,  माझ्या मागे कुणाकडे तरी बघत होतं.


4
ते नेहमी म्हणतात की अभिनय नीट शिकायचा असेल तर आरश्यात बघून सराव करावा.
मी एकदा आरशात पाहून हसले पण माझे प्रतिबिंब मला साथ देत नव्हते,  ते उलट माझ्याकडे डोळे रोखून पाहत होते.
सांगा मी काय करू आता?

5
एका गावात दोन लहान निरागस भावंडं एका झोपडीत आई बरोबर रहात असतात.  थंडीचे दिवस असतात.  एके संध्याकाळी ती मुले त्यांच्या झोपडीजवळ असलेल्या पर्वतावर नेहेमीसारखी आपडी थापडी हा टाळ्यांचा खेळ खेळत असतात.  आईला त्या दिवशी कामावरून यायला उशीर होतो.  त्यामुळे त्यांना नेहमीची आईची हाक अजून ऐकू न आल्याने ती खेळात एवढी मग्न होतात की त्यांना घरी परतायचे भानच रहात नाही.  इतर मुले घरी निघून जातात.  नंतर लक्षात आल्यावर अंधार झालेला असतो.

आईची आठवण आल्यानंतर,  घाबरल्याने आणि बावरल्याने ती दोघेजण रस्ता चुकतात आणि अंधारात भरकटत जातात.  सगळीकडे त्यांना एकसारखी झाडे दिसायला लागतात.  घराकडे जायचा रस्ता सुद्धा सापडेनासा होतो.  त्यादिवशी आकाशात चंद्र सुद्धा नसतो.  दूरपर्यंत त्यांना स्वत:ची झोपडी दिसून येत नाही.

शेवटी मेटाकुटीला येऊन ते एका झाडाखाली बसतात.  दोघेजण आता थंडीने कुडकुडायला लागतात.  तेवढ्यात समोर त्यांना मोडकळीस आलेली एक मोठी झोपडी दिसते.  त्यात प्रकाश असतो.  त्यात ते जायचे ठरवतात.

झोपडीचे दार उघडे असल्याने ढकलून ते आत शिरतात.  आत कुणीच नसते.  झोपडीला खिडक्या असतात पण त्यांना दारे नसतात.  खिडकीतून थंडी आत येत असते.  दोघांना एक शिडी दिसते जी माळ्यावर जाते.  ते माळ्यावर चढतात तशी त्यांना ऊब जाणवते.  माळ्यावर पांघरूण असते.  ते दोघे रात्री तेथेच थांबायचे ठरवून अंगावर पांघरून घेतात आणि झोपून जातात.  माळ्याच्या वरच्या बाजूला छतावर एक छोटा गोल झरोका असतो.

बरोबर मध्यरात्री त्या गोल झरोक्यातून कुणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू येेतो.  आवाज हळूहळू वाढत जातो.  त्यामुळे मुलगा बहिणीला उठवतो.  ते घाबरून एकमेकांना बिलगतात पण आवाज वाढत गेल्याने तो मुलगा पांघरूण बाजूला करून बाजूच्या एका लाकडी स्टूलवर चढून त्या झरोक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण हात पुरत नाही.

मग पुन्हा खाली उतरून मुलगा छताकडे बघून म्हणतो, "कोण आहे छतावर? आम्हाला घाबरवू नको.  आम्ही छोटे आहोत.  आम्हाला त्रास देऊ नको!"

छतावरचा आवाज अचानक बंद होतो.  ते दोघे झोपतात.  तेवढ्यात पूर्वीपेक्षा दुपटीने मोठ्या आवाजात छतावर चालण्याचा आवाज ऐकू येतो.
मुलगी निरागसतेने म्हणते, " दादा अरे कुणीतरी आपल्यासारखे छोटे असणार.  रस्ता चुकलेले.  ते आत यायला घाबरत असतील!"

" अगं ताई भूत पण असू शकतं.  भूत आहे की आपल्यासारखे कुणीतरी लहान मूल हे बघायला आपण त्यांना टाळी वाजवायला सांगू.  जर वर भूत असेल तर त्यांना दोन टाळ्या वाजवायला सांगू आणि लहान कुणीतरी असेल तर एक टाळी! आपडी थापडी सारखं!"

शेवटी निरागस मुले ती.  पांघरूण बाजूला सारून ते दोघेजण झरोक्याखाली उभे रहातात.
मुलगा झरोक्याकडे पाहून विचारतो, " छतावर जर भूत असेल तर दोन टाळ्या वाजव आणि लहान मुलगा असेल तर एक टाळी वाजव!"

छातावरची हालचाल बंद होते आणि पांघरुणाखालून दोन टाळ्या वाजवल्याचा आवाज येतो.

आरंभ: सप्टेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय नऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे युरोपायन – रिता जोहरापूरकर १ युरोपायन – रिता जोहरापूरकर २ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १ ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २ मोठयांचे मोठेपण - अविनाश हळबे पर्यावरण आणि बांधकाम व्यावसायिक – प्रवीण गिरजापुरे सेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा जनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव नामदेवराव: प्रेमाचा निर्मळ झरा - किरण दहीवदकर, पुणे महादेव – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव धैर्याचे घाव – ओशो नागपंचमी ३२ शिराळा! – आशिष कर्ले डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा मी का लिहिते? - अंजना कर्णिक, मुंबई आईचे घर – मंजुषा सोनार, पुणे माझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव माझ्यातल्या मीचा मान!! - उर्मिला देवेन, जपान श्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते! - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव 'शिक्षक' नवयुगाचा शिल्पकार! – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव न्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्रपट - वर्षा सोनवणे न्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर श्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक! - राज जाधव, पुणे करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर पुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती – निमिष सोनार मुलाखत: राजेश बाळापुरे रेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन मैथिली अतुल यांची खुसखुशीत "नै" वन लायनर्स लीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे जसे आपण तसे जग? आशू लॅमोस, मस्कत सारे काही अनपेक्षित! - निमिष सोनार गरज आहे एका साक्षीची दहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन देणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन सत्य - भरत उपासनी, नाशिक बालपण – उदय जडीये, पिंपरी अरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे व्हॉट्सअप स्टेटस - प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे माझ्या मनातला पाऊस - जुईली अतितकर, नवीन पनवेल चांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे भेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे धनी – मोहन वायकोळे, बोईसर नवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक रथचक्र - भरत उपासनी, नाशिक सांगू कसे मी कोणाला? - सुवर्णा कांबळे, कळंबोली चारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली स्केचेस (रेखाटने) – हर्षलता पाटील ग्राफिटी – अविनाश हळबे स्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार स्केचेस (रेखाटने) – अथर्व सोनार, पुणे व्यंगचित्रे – सिद्धेश देवधर, गोवा व्यंगचित्रे – रोहिणी जाधव, बेलापूर निसर्ग छायाचित्रण – अनन्या बाळापुरे, चिंचवड नऊवारी साडीचे फोटो