अध्याय बारावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
देवी म्हणे जो मज नित्य स्तवनें ॥ स्तुती करील एकाग्र मनें ॥ त्याचें मी विघ्न संपूर्ण ॥ नाश करीन निःसंशयें ॥१॥
मधुकैटभाचें मर्दन ॥ महिषासुराचाही नाश जाण ॥ जो याचें करील वर्णन ॥ शुंभ निशुंभाचाही वध ॥२॥
अष्टमी आणि चतुर्दशी ॥ नवमी दिनीं एकाग्रतेसी ॥ भक्तीनें करील जो श्रवणासी ॥ उत्तम महिमेसी माझिया ॥३॥
तो दूर होईल पापापासून ॥ दुःख न बाधी तयालागून ॥ दरिद्री कधीं न होय तो आपण ॥ अनिष्ट कानीं नाइके तो ॥४॥
त्यासी नसे शत्रूभय ॥ चोरभय ना राजभय ॥ शस्त्र अग्नी उदकी पाहे ॥ स्वप्नीही भय न होय त्यासी ॥५॥
या कारणें माहात्म्य माझें ॥ एकाग्र होऊनि पठण कीजे ॥ श्रवण करी जो भक्तराज ॥ महिमा माझा उत्कृष्ट ॥६॥
विघ्नें तयाची संपूर्ण ॥ महामारीपासूनि झालीं उत्पन्न ॥ तसेंच त्रिविध उत्पति जाण ॥ माझा महिमा श्रवणें नासती ॥७॥
जेथें जेथें पाठ करील जाण ॥ तेथें तेथें माझें आयतन ॥ सदा नमनकर्त्या सोडवीन ॥ तयासी ठेविन संन्निध मी ॥८॥
पूजाबळिप्रदानपूर्वक ॥ हवनमहोत्सव सम्यक ॥ सर्वही माझ्या चरित्रें देख ॥ उच्चारपूर्वक करी जो श्रवण ॥९॥
श्रवण आणि पठणानें ॥ जाणून अथवा न जाणून ॥ बळिपूर्वक पूजा केल्या जाण ॥ घेत प्रीते मानूनि मी ॥१०॥
महापूजा शरत्काळीं बरी ॥ प्रतिवार्षिकीं उत्साह जो करी ॥ तेथें माझें माहात्म्य आदरीं ॥ श्रवण करी भक्तीनें ॥११॥
समस्त विघ्ना मुक्त होऊन ॥ धान्यधनासहित जाण ॥ मनुष्य माझ्या प्रसादानें ॥ पावेल जाण असंशय ॥१२॥
माझें माहात्म्य करितां श्रवण ॥ तशीच माझी उत्पत्ति ही जाण ॥ युद्धपराक्रम वर्णितां संपूर्ण ॥ तो पुरुष आपण निर्भय होय ॥१३॥
शत्रूचा होईल क्षय ॥ होईल कल्याण अक्षय ॥ कुल चिरकाल नांदे त्याचे पाहे ॥ माहात्म्य माझे ऐकिलीयां ॥१४॥
सर्वही शांति कर्माच्या ठाई ॥ तसेंच दुष्ट स्वप्न पाहिल्याही ॥ उपग्रह पीडा होतां ते समयीं ॥ माहात्म्य सर्वही ऐकावें माझें ॥१५॥
समस्त विघ्नें नासतील ॥ गृहपीडा दूर होईल ॥ जरी न दुःस्वप्न पाहील ॥ सुस्वप्न होईल तयासी ॥१६॥
बालग्रहबाधा झाली जयासी ॥ शांतिकारक होईल शिशूसी ॥ इष्टजन अनिष्ट झाले जयासी ॥ मित्र तयासी होतील ॥१७॥
अशेष जे कां दुर्वृत्त ॥ बळहीन होतील समस्त ॥ राक्षसपिशाचभूतें ॥ पठणमात्रें होतील नाश ॥१८॥
माझें माहात्म्य सर्वही जाण ॥ माझ्या सानिध्यासी होय कारण ॥ अर्घ्य पुष्प धूप बलिदान ॥ गंधदीप संपूर्ण उत्तमोत्तम ॥१९॥
होम आणि ब्राह्मणभोजन ॥ अहर्निशीं करूनि प्रोक्षण ॥ आणीही भोग संपूर्ण ॥ करी प्रदान वार्षिक पर्वीं ॥२०॥
मत्प्रीत्यर्थ जो करील ॥ संपूर्ण माझें चरित्र ऐकेल ॥ श्रवणमात्रें पापें नासतील ॥ आरोग्य तात्काळ होईल त्यासी ॥२१॥
भूतापासोनि करील रक्षण ॥ जन्मापासूनि माझें कीर्तन ॥ युद्धी माझें चरित्र जाण ॥ दुष्ट दैत्य संपूर्ण नाशील ॥२२॥
श्रवण केल्या तेव्हां वैरीकृत ॥ भयाचा नाश होईल समस्त ॥ तुम्हीही केल्या प्रस्तुत ॥ ब्रह्मर्षी स्तवीत जयातें ॥२३॥
ब्रह्मयानें स्तविलें तयासी ॥ दिधलें म्यां शुभमतीसी ॥ महारणीं दूर प्रदेशीं ॥ अथवा ओणव्यासी पडल्या प्रसंग ॥२४॥
आडमार्गीं गांठिल्या चोरानें ॥ अथवा अकस्मात धरिल्या शत्रूनें ॥ व्याघ्रसिंहाची गांठी पडल्या जाण ॥ वनगज येऊन वेढिल्या वनीं ॥२५॥
राजा क्रोधें आज्ञापिल्या ॥ वध्यबंदी घातल्या ॥ अथवा तुफान वारा लागल्या ॥ मध्यसमुद्रीं गेल्या नावेसी ॥२६॥
आणि शस्त्रें पडल्या समयीं ॥ अतिघोर संग्रामाच्या ठायीं ॥ सर्व बांधांपासूनि पाही ॥ देवहो ऐशाही संकटीं मी तया ॥२७॥
स्मरण केल्या माझें चरित्र ॥ सुटे संकटापासूनि नर ॥ माझ्या प्रभावें सिंहव्याघ्रादि चोर ॥ नच वैर करितील तेही ॥२८॥
जाती दुरुनीचि पळून ॥ माझें चैर्त्र केल्या स्मरण ॥ ऋषी म्हणे देवी ऐसें बोलून ॥ थोर पराक्रमी आपण चंडिका ॥२९॥
पाहात असतां देवमंडळी ॥ तेथेंचि गुप्त झाली ॥ देव निरुपद्रव ते वेळीं ॥ पूर्वाधिकार मेळीं मिळाले ॥३०॥
सर्व यज्ञभागाचें भोजन ॥ करिते झाले शत्रूहीन ॥ दैत्यालागीं मारिल्यावरी देवीनें ॥ देवशत्रू जाण शुंभाला युद्धीं ॥३१॥
अति उग्र पराक्रमें करून ॥ जग विध्वंशिलें जयानें ॥ निशुंभ तोही निमाल्यावरी जाण ॥ उरलें पाताळालागुन दैत्य गेले ॥३२॥
या प्रकारें देवी भगवती ॥ ते नित्य असतांही मागुती मागुती ॥ अवतरोनि पाळिती ॥ या जगाप्रती जाण राया ॥३३॥
तिनेंचि मोहिलें सकळ विश्व ॥ उत्पन्नही करी विश्व सर्व ॥ तिला मागतां विज्ञानज्ञातृत्व ॥ सिद्धी सर्व देत संतोषोनि ॥३४॥
व्याप्त तेचि जगा सकळ ॥ या ब्रह्मांडा जाण भूपाळ ॥ महाकाळी महाकाल्या ॥ धरी नृपाळा महामारीरूप ॥३५॥
संहारकाळीं महामारी ॥ शाश्वत असोनि सृष्टीही करी ॥ सर्वभूता पाळणारी ॥ स्थितकाळीं ही सनातन जे ॥३६॥
उत्पतिकाळीं मनुष्यास ते ॥ लक्ष्मीगृहीं वृद्धी करिते ॥ ते न ये तरी अभागी ते ॥ नाश तेथें सर्वस्व होय ॥३७॥
स्तवूनि पूजितां पुष्पें करून ॥ आणिकही सुगंधगंधानें ॥ देते संतती धनधान्य ॥ करी बुद्धिप्रदान धर्माविषयीं ॥३८॥
सुरथराजासी ऐसी कथा ॥ सुमेधा ऋषी झाला सांगतां ॥ भागोरी ऋषीसी करूनि श्रोता ॥ मार्कंडेय कथा सांगे तेची ॥३९॥
नित्यानंदतीर्थ यती ॥ करी श्रोत्यासी विनंती ॥ तेचि कथा म्यां यथामती ॥ वर्णिली श्रोती क्षमा करा ॥४०॥
इति श्रीदेविजय ग्रंथ ॥ मार्कंडेय पुराणसंमत ॥ द्वादशाध्याय झाला समाप्त ॥ जगदंबासमर्थ प्रीति पावो ॥४१॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ द्वादशाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय द्वादशाध्याय समाप्त ॥