अध्याय नववा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
राजा म्हणे सांगितलें विचित्र ॥ तुवां मजलागी हें चरित्र ॥ देवीमाहात्म्य अतिपवित्र ॥ महाअसुर रक्तबीजवध ॥१॥
आणीकही ऐकूं इच्छि माझें मन ॥ रक्तबीज मारिल्यावरी जाण ॥ शुंभें काय केलें आपण ॥ निशुंभानेंहि दारुण अतिकोपें ॥२॥
ऋषी म्हणे अतिकोपें दैत्य ॥ रक्तबीजाचा केल्यावरी घात ॥ शुंभनिशुंभ दोघे उद्यत ॥ सैन्यही निःपात झाल्यावरी ॥३॥
सैन्य झालें वाताहत ॥ तें पाहूनि कोपें अद्भुत ॥ धाऊनि गेला निशुंभ तेथें ॥ सेना समस्त घेऊनी ॥४॥
निशुंभाच्या मागेंपुढें ॥ आजूबाजू दैत्य गाढे ॥ ओंठ चावूनि असूर निधडे ॥ देवीसी रोकडे मारूं आले ॥५॥
मोठ्या पराक्रमें आला जाण ॥ शुंभ तोही सैन्य घेऊन ॥ कोपें चंडिकेसी माराया लागून ॥ युद्ध मातृगणासी त्यानें केलें ॥६॥
युद्ध मोठें प्रवर्तलें ॥ देवी - दैत्याचें तें वेळें ॥ शरवर्षाव करी प्रबळ ॥ मेघ सजळ वर्षे जैसा ॥७॥
चंडिकेनें अपुल्या शरें ॥ तोडूनि टाकिले शर समग्र ॥ शस्त्रसंघात असुरावर ॥ टाकूनि शरीरा हाणीत ॥८॥
निशुंभानें खङ्ग तीक्ष्ण ॥ सतेज ढालही घेऊन ॥ केलें सिंहमस्तकी ताडन ॥ उत्तम वाहन देवीचें जें ॥९॥
सिंहासी ताडितां देवी आपण ॥ तीक्ष्णधार खङ्ग घेऊन ॥ निशुंभाची शीघ्र तोडिली जाण ॥ खङ्ग दारुण ढालही त्याची ॥१०॥
ढालतलवार त्याची तोडितां ॥ असुर झाला शक्ती टाकितां ॥ ते शक्तीही द्विखंड करितां ॥ चक्रासन्मुख येतां तें वेळीं ॥११॥
कोप आला निशुंभाला ॥ असुर तो शूल टाकितां झाला ॥ येतां मुष्टिघातें त्रिशूलाला ॥ चूर्ण देवीनें केला तत्क्षणीं ॥१२॥
मग तो करी गदाघाता ॥ देवीसी जेव्हां त्वरित ॥ देवी टाकूनि शूलातें ॥ भस्मीभूत केली गदा ॥१३॥
त्यानें फरश हातीं घेऊन ॥ धांविन्नला दैत्य दारुण ॥ देवीनें शरवृष्टी करून ॥ भूतळीं जाण पाडिला ॥१४॥
निशुंभ मोठा पराक्रमी ॥ त्यासी पाडितां रणभूमी ॥ शुंभा चढली क्रोध ऊर्मी ॥ आला अधर्मी अंबिके मारूं ॥१५॥
तो रथीं बैसला उंच ॥ भार घेऊनि आयुधाचे ॥ भुजा आठही पराक्रमी ज्याचे ॥ रूप त्याचे नभाएवढें ॥१६॥
तो येतो ऐसें पाहून ॥ देवीनें केलें शंखस्फुरण ॥ ज्या शब्दही धनुष्याचा जाण ॥ केला अंबेनें अतिशयें ॥१७॥
करूनियां घंटानादासी ॥ भरोनि टाकिलें दशदिशेसीं ॥ समस्त त्या दैत्यसेनेसीं ॥ हत तेजासी करिते ॥१८॥
सिंहही करी मोठा शब्द ॥ जेणें मत्तमातंगाचा जाय मद ॥ दुमदुमीं गगनी नाद ॥ दशदिशा अगाध गर्जती ॥१९॥
तेव्हां काळी उडाली ॥ गगनीहूनि पृथ्वीतळीं ॥ कर ताडीत आरोळी ॥ करीं अंतराळीं पूर्वशब्द ॥२०॥
अत्यंत मोठा अट्टहास्य ॥ शिवदूती ते करीतसे ॥ शब्देची पावले असुर त्रास ॥ क्रोध शुंभास आला फार ॥२१॥
उभारे उभा दुर्जना ॥ ऐसें ऐकूनि अंबेच्या वचना ॥ ते वेळी जयशब्दगर्जना ॥ गर्जती पुन्हः पुन्हा अंतरिक्ष देव ॥२२॥
शुंभे टाकिली शक्ती गर्जत ॥ भयंकर ज्वाळामुखी वमीत ॥ अग्नीकल्लाळा ऐसी येत ॥ उल्कापातें नाशिली ते ॥२३॥
शुंभ दैत्याच्या सिंहनादें ॥ लोक तिन्ही व्यापूनि कां दे ॥ मारिलें मारिलें म्हणे घोरशब्दें जिंकिलें म्हणे हे राजा रे ॥२४॥
देवी शुंभें सोडिले शर ॥ अपुले टाकूनि शर ॥ अपार तोडूनि टाकिले बाण दुर्धर ॥ सहस्राचे सहस्र येकसरें ॥२५॥
तेव्हां चंडिका कोपली जाण ॥ शूल हाणितला तयालागुन ॥ पडला पृथ्वीवरी दैत्य दारुण ॥ मूर्च्छित जाण अचेतन ॥२६॥
तेव्हां निशुंभ झाला सावधान ॥ धनुष्य सज्ज करूनि त्यानें ॥ देवीवरी टाकी बाण ॥ काळीसही जाण सिंहासह ॥२७॥
पुन्हां बाहू केला उदंड ॥ दशसहस्त्र जे कां दोर्दंड ॥ अयुतचक्रें दैत्य प्रचंड ॥ झांकूनि चंडिकेसी टाकिले ॥२८॥
तेव्हां कोपली भगवती ॥ दुर्गा दुस्तर दुःखा नाशकर्ती ॥ झाली चक्रें तोडिती ॥ स्वशरघाती ते काळीं ॥२९॥
तेव्हां निशुंभ वेगें करून ॥ तो हातीं गदा घेऊन ॥ धांविन्नला माराया लागून ॥ सभोंवतें सैन्य दैत्याचें ॥३०॥
गदा वेगें त्याची आली ॥ चंडिका ते तोडूनि टाकिली ॥ खङ्गे करूनि ते काळीं ॥ शूल ते वेळीं घेतला त्यानें ॥३१॥
येतां हातीं शूल घेऊन ॥ देवा दुःखकारी निशुंभ दारुण ॥ हृदयीं भेदिलें शूलाग्रानें ॥ वेगें देवीनें ते काळीं ॥३२॥
शूलें भिन्न होतां हृदयें ॥ दुजा तेथूनि पुरुष निघे पाहे ॥ महाबळी अतिवीर्य ॥ उभी राहे म्हणे तो ॥३३॥
तो निघाला पाहून ॥ देवीनें केलें हास्यवदन ॥ शिरच्छेद केला खङ्गानें ॥ पडला गतप्रण पृथ्वीवरी ॥३४॥
तेव्हां सिंह भक्षी उग्र ॥ दांतें फोडूनि अधरशिर ॥ त्या काळीं काळी तो असुर ॥ शिवदूती समग्रसहीत त्या ॥३५॥
कौमारीनें शक्ती टाकून ॥ कितियेक असुराचे घेतले प्राण ॥ ब्राह्मीनें अभिमंत्रून ॥ उदक शिंपून पाडीले बहुत ॥३६॥
त्रिशूल घेऊनि माहेश्वरी ॥ बहुतेकाचा घात करी ॥ वाराही तुंड प्रहरीं ॥ उदंड पृथ्वीवरी पाडिले ॥३७॥
वैष्णवीते असुरा करी उदंड ॥ चक्रेकरी खंड खंड ॥ ऐंद्री घेऊनि वज्र प्रचंड ॥ धाडी काळाकडे कितियेक ॥३८॥
काळीनें केलें पोटभरी भक्षण ॥ बहुतेकांचे गेले प्राण ॥ काळीनें केलें पोटभरी भक्षण ॥ शिवदूती सिंहे जाण दानव ॥३९॥
सुरथनामा राजासी ॥ कथा सांगतो सुमेधा ऋषी ॥ मार्कंडेय म्हणे भागोरीसीं ॥ पुढील कथेसी अवधान देईं ॥४०॥
देवी विजय ग्रंथकथन ॥ केलें मार्कंडेयपुराणसंमतानें ॥ नित्यानंद म्हणे श्रोत्यालागुन ॥ द्यावें अवधान कथेसी ॥४१॥
नित्यानंद विनवी भवानी ॥ आपुली कथा घेईं गोड करूनी ॥ माझ्या हृदयीं प्रगटोनी ॥ वदवी वाणी प्राकृत कथा ॥४२॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ नवमाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय नवमाध्याय समाप्त ॥