अध्याय सातवा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे शुंभ आज्ञेनें ॥ चंडमुंडआदि करून ॥ चतुरंगसेनेसह वर्तमान ॥ उद्यते आयुधें जाणते आले ॥१॥
त्यांनीं देवी देखिली ॥ हास्य करीत उभी राहिली ॥ कांचन शैलश्रृंगीं बैसली ॥ सिंहावरी शोभली जगदंबा ॥२॥
तीसि पाहूनि धरावयासी ॥ सिद्ध झाले प्रयत्नाविषीं ॥ खङ्गचापधारी न कळतां तीसी ॥ गेले समीप प्रदेशीं अंबेच्या ॥३॥
शत्रूवरी अंबिका आपण ॥ झाली परम कोपायमान ॥ वदन तिचें मशीवर्ण ॥ कोपें दारुण झालें तेव्हां ॥४॥
गांठीं पडल्या भोंवयाशीं ॥ ललाट रुंद झालें अवेशी ॥ कराल वदन काळी अपैशी ॥ घेऊनि पाशाशी निघाली ॥५॥
विचित्र खट्वांग घेऊन ॥ नरमाळाचे करूनि भूषण ॥ व्याघ्रचर्माचें परिधान ॥ शुष्कांगी जाण अतिभ्यासुर ॥६॥
मज जिचें विस्तीर्ण अत्यंत ॥ जीभ भयंकर लळलळीत ॥ निमग्न कोपें नेत्र आरक्त ॥ नादें समस्त दिशा गर्जवी ॥७॥
वेगें शिरली सैन्याआंत ॥ करूं लागली असुरघात ॥ बळेंचि तोंडांत ॥ दैत्यसैन्य ते भक्षुंचि लागे ॥८॥
गजामागील रक्षकासी ॥ महात घंटा अंकुशेंसी ॥ येका हातें मत्त गजासी ॥ गोळा करूनि त्यासी टाकीं मुखीं ॥९॥
तसेंच घोडेश्वार ॥ सारथीसहित रहंवर ॥ मुखीं टाकूनि अपार ॥ भयंकर खातसे ते ॥१०॥
कोण्हासी धरिला केशीं ॥ कोणासी धरूनियां मानेसी ॥ लातें हाणूनि कितियेकांसी ॥ रगडी कोणासीं उरानें ॥११॥
त्यानीं टाकिली जे कां शस्त्रें ॥ असुराचीं जें जें महाअस्त्रें ॥ रोषे मुखें करूनि समग्र ॥ दंताग्रें टाकी चघळून ॥१२॥
बळवंताचें सर्वही बळ दुष्ट ॥ दैत्याचें जें कां सकळ ॥ अनेक भक्षिलें तत्काळ ॥ ताडनबळें करी कोण्हा ॥१३॥
खङ्गें मारिलें कितियेक ॥ खट्वांगें मारिलें बहुतेक ॥ नाश पावले अनेक ॥ दंताग्रें देख चाविलें कोण्हा ॥१४॥
क्षणमात्रें दैत्यबळ ॥ मारुनि टाकिले सकळ ॥ तें पाहूनि चंड धावला तत्काळ ॥ अतिवेगें खळ काळीवरी ॥१५॥
शरवृष्टी अपार ॥ असुरें केली काळीवर ॥ चक्रें आच्छादिली समग्र ॥ चंडासुरें ते काळीं ॥१६॥
तें अनेक जें कां चक्रें ॥ काळी टाकी तितुकीं स्वअस्त्रें ॥ जैसा सूर्य निघे बाहेर ॥ मेघापासूनि भयंकर निघे तैसी ॥१७॥
अतिकोपें अट्टाहास्य ॥ भयंकर शब्द करी आवेशें ॥ कराळ काळीचें आस्य ॥ विकट दांतास पाहील कोण ॥१८॥
हातीं खङ्ग घेऊनि ते वेळीं ॥ चंडावरी देवी धांवली ॥ हातें येक्या शेंडी धरिली ॥ मस्तक तोडिले खङ्गानें ॥१९॥
चंडासी मारिलें तें पाहूनी ॥ मुंड धांविन्नला तत्क्षणीं ॥ त्यासीही पाडूनि धरणी ॥ रोषें करोनी मारिली खङ्गें ॥२०॥
त्याचें सैन्य तें हस्तशेष ॥ पाहूनि त्यांनीं चंडाचा नाश ॥ भयें पळालें दशदिशे ॥ मुंडही मेला ऐसें पाहुनी ॥२१॥
चंडमुंड दैत्याचें शीर ॥ काळीनें घेऊनि त्याचे शरीर ॥ बोले अट्टाहास्य करूनि थोर ॥ जगदंबसमोर तें काळीं ॥२२॥
चंडमुंड दोघें मारून ॥ तुज म्यां केलें बळिप्रदान ॥ युद्धयज्ञीं शुंभासी जाण ॥ निशुंभा मारून विजयी होसी ॥२३॥
ऋषी म्हणे आणिलें त्यासी ॥ पाहुनि चंडमुंडा असुरासी ॥ मधुरगिरा काळीसी ॥ जगदंबा तियेसी बोलत ॥२४॥
तुवां आणिले चंडमुंडालागीं ॥ आलीसि घेऊनि लाग वेगीं ॥ चामुंडा ऐसें या जगीं ॥ ख्याति अभंगीं पावशील ॥२५॥
ऐसी कथा सुमेधा ऋषी ॥ सांगितली सुरथ राजासी ॥ तेचि कथा भागोरी ऋषीसी ॥ मार्कंडेय ऋषी सांगत ॥२६॥
संत श्रोत्या विनवण ॥ नित्यानंद करी नम्रवचनें ॥ ग्रंथार्थ कवित्व कांहींच मी नेणें ॥ न्यून पूर्ण करणे तुम्हांचिकडे ॥२७॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ झाला सप्तमाध्याय समाप्त ॥ पुढील कथा श्रोते श्रवण करा ॥२८॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ सप्तमोध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय सप्तमोध्याय समाप्त ॥