चतुरानन घन अनंत उपजती । द...
चतुरानन घन अनंत उपजती । देवो देवी किती तयामाजि ॥ १ ॥
तेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म । गोपसंगे सम वर्ते रया ॥ २ ॥
निगमा नाठवे वेदाचां द्योतुकु । तो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति । आपण श्रीपति क्रीडतसे ॥ ४ ॥