निर्दोषरहित सर्व गुणीं हे...
निर्दोषरहित सर्व गुणीं हेत । द्वैत विवर्जित अरूप सदां ॥१॥
तें रूप स्वरूप कृष्ण बाळलीला । माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट । तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे । अकार पैं लोपे एका नामें ॥४॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद । ब्रह्माकार भेद नाहीं सदा ॥५॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरूप गोकुळीं । वृंदावन पाळी यमुनातटीं ॥६॥