अकर्ता पैं कर्ता नाही यास...
अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता । आपण तत्वता स्वयें असे ॥ १ ॥
तें रूप चोखाळ कृष्णनामें बिंबे । यशोदा सुलभें गीतीं गाय ॥ २ ॥
व्योमाकार ठसा नभीं दशदिशा । त्यामाजि आकाशा अवकाश होय ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म । उपदेश सुगम कृष्णनाम ॥ ४ ॥