ग्रासूनी भान मान दृश्य द्...
ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न । आपण चिद्धन वैकुंठी रया ॥१॥
तें रूप सखोल कृष्ण रूपें खेळें । नंदयशोदेमेळें गोपीसंगें ॥२॥
नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार । आपण श्रीधर सर्व सुखें ॥३॥
तेंची हें रूपडें कृष्णनामें पिकलें । यमुने स्थिरावलें वेणू वातां ॥४॥
ज्योतिरूपें कीर्ण अनंत विस्तार । ब्रह्मांड आकार अनंतकोटी ॥५॥
निवृत्ति सोज्वळ नित्य नुतन सोय । आपणची होय गोपरूपें ॥६॥