काळवेष दुरी काळचक्र करीं ...
काळवेष दुरी काळचक्र करीं । बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला । कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥
गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे । यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥
निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा । दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥