चितासी व्यापक व्यापूनि दु...
चितासी व्यापक व्यापूनि दुरी । तेंचि माजी घरीं नांदे सदा ॥ १ ॥
दिसे मध्य सुख मुक्तलग हरी । शांति वसे घरीं सदोदित ॥ २ ॥
नाहीं या शेवट अवघाचि निघोट । गुरुतत्त्वें वाट चैतन्याची ॥ ३ ॥
मुक्ताई संपन्न मुक्त पैं सेजुले । सर्वत्र उभविलें मुक्ति चोख ॥ ४ ॥