विश्रांति मनाची निजशांति ...
विश्रांति मनाची निजशांति साची । मग त्या यमाची भेटी नाहीं ॥ १ ॥
अधिकारी मन मग सारी स्नान । रोकडेंचे साधन आलें हाता ॥ २ ॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान । चित्तीं नारायणमंत्र जपे ॥ ३ ॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन । नित्य मंत्र स्नान करीं वेगीं ॥ ४ ॥