अविट हे न विटे हरिचे हे ग...
अविट हे न विटे हरिचे हे गुण । सर्व सनातन ध्यातां रूपें ॥ १ ॥
साध्य हें साधन हरिरूपें ध्यान । रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥ २ ॥
असंगेंचि नटु नटलों पैं साचे । नाहीं त्या यमाचें भय आम्हां ॥ ३ ॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली । साधना दिधली चांगयासी ॥ ४ ॥