मुक्तामुक्त दोन्ही आईक तो...
मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णीं । हरिनाम वर्णी सदा काळ ॥ १॥
नाहीं काळ तेथें आम्हां वेळ कैची । हरिनामछंदाची गोडी थोरी ॥ २ ॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्हीं कदां । निरंतर धंदा रामकृष्ण ॥ ३ ॥
मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत । हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥ ४ ॥