मुक्तजीव सदा होति पै नामप...
मुक्तजीव सदा होति पै नामपाठें । तेंचि रूप ईटे देखिलें आम्ही ॥ १ ॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी । आणूनि लवकरी तारी जन ॥ २ ॥
ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची । निरसिली जनाची भ्रमभुली ॥ ३ ॥
मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली । चरणीं समरसली हरिपाठें ॥ ४ ॥