आदि अंतु हरि सर्वा घटीं प...
आदि अंतु हरि सर्वा घटीं पूर्ण । जाणोनि संतजन प्रेमभरित ॥ १ ॥
रामनाम चित्तें प्रेम वोसंडत । नित्यानित्य तृप्त हरिभक्ति ॥ २ ॥
शांति क्षमा दया सावध पैं चित्तीं । आनंदे डुल्लती सनकादिक ॥ ३ ॥
मुक्ताई म्हणे नाम श्रीहरिचे जोडी । नित्यता आवडी चरणसेवे ॥ ४ ॥