करणें जंव कांही करूं जाये...
करणें जंव कांही करूं जाये शेवट । तंव पडे आडवाटें द्वैतभावें ॥ १ ॥
राहिलें करणें नचलें पैं कर्म । हरिविण देहधर्म चुकताहे ॥ २ ॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना । तंव साधनी परता पडो पाहे ॥ ३ ॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ । तेणें मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥ ४ ॥