Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ८

आकाशात काळे ढग जमु लागले होते. वारा जोरात वाहु लागला होता. सगळीकडे शांतता होती. बेडरूम मध्ये शारदाच शरीर बेडवर पडलेल होत. स्वामी डोळे बंद करून योगमुद्रेत बसलेले होते. मुकुंदा स्वामींजवळ बसुन त्यांच्या पुढच्या आदेशाची वाट पाहत होता. रामुकाका कोपर्यात बसुन देवाचा धावा करत होते. अमेय शारदाजवळ बसुन तिच्या केसांतून हात फिरवत होता. "मला माफ कर शारदा, तुझ्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी तुझ ऐकल असत तर तु आता जिवंत असतीस." तो भरल्या कंठाने म्हणाला.
                    अचानक बेडरूमचा दरवाजा उघडला आणी जयंत धडधडत आत घुसुन आला. समोरच द्रुश्य पाहुन त्याला धक्काच बसला. अमेयने त्याला मिठीच मारली. आणी इतक्या वेळेपासुन रोखुन धरलेला अश्रुंचा पुर सुटला. जयंतने मोठ्या प्रयत्नाने अमेयला शांत केल. त्याने अमेयला बेडवर बसवले आणी म्हणाला, "मित्रा, शांत हो आणी मला सांग हे सगळ कस झाल? कोणी केल?" अमेयने मोठ्या मुश्कीलीने स्वतःला सावरत घडलेली हकीकत सविस्तर सांगितली.

"काय? म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खर्या आहेत. साराह विंचेस्टरचा आत्मा खरच या घरात आहे." जयंत आश्चर्यचकीत होत म्हणाला.

अमेयः तुला काय माहीत आहे या घराबद्दल?

जयंतः मी वाचल होत. पण त्यावेळेस माझा विश्वास बसला नव्हता त्यावर.

अमेयः जयंत, तुला या घराच्या इतिहासाबद्दल जे काही माहीत आहे ते सांग. मी शारदाला वाचवू शकलो नाही. पण मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. प्लीज मला सगळ सांग.

जयंतः सांगतो. १८८४ मध्ये एक इंग्रज दांपत्य साराह  आणी विलीयम विंचेस्टर गोव्यात रहायला आले. विलीयम हे ब्रिटीश फौजेत कामाला होते. त्यांची गोव्यात बदली झाली होती. इथे आल्यानंतर त्यांनी या घराच्या बांधकामाला सुरूवात केली. घर बांधून पूर्ण झाल्यानंतर ते दांपत्य इथे रहायला आल. पहिले काही वर्ष सगळ सुरळीत चालु होत. पण विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतात स्वातंत्र्यलढ्याचा जोर वाढू लागला होता. त्याचे पडसाद गोव्यातही उमटले. क्रांतीकारकांनी इंग्रजांविरूध्द जोरदार लढाई चालु केली होती. क्रांतीकारकांशी झालेल्या अश्याच एका चकमकीत विलीयम विंचेस्टर मारले गेले. त्यानंतर सगळच बदलल. पतीच्या आकस्मीक म्रुत्युमुळे साराह यांच्या मनावर फार वाईट परिणाम झाला. विलीयम यांच्या म्रुत्युनंतर काही दिवसांनी अचानक गोव्यातून लहान मुले गायब व्हायच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळच्या ब्रिटीश सरकारने या घटनेचा कसुन शोध घेतला, पण सरकारच्या हाती ना गायब झालेली मुले लागली ना तो मुले चोरणारा गुन्हेगार.  पण मध्येच अश्या अफवा पसरल्या की त्या मुलांच्या गायब होण्या साराह विंचेस्टरचा हात आहे. अस म्हणतात की तिने या घराच्या तळघरात एक गुप्त ठिकाण बनवल होत. त्यालाच विंचेस्टर मिस्ट्री हाऊस अस म्हणतात. हे कळल्यावर लोकांनी याच घरातील तळघरात तिला जिवंत जाळल. त्यानंतर काय झाल हे मला काही जास्त माहीत नाही.

"त्यानंतर काय झाल हे मी सांगतो." स्वामींचा आवाज आला. अमेय आणी जयंतने पाहील. स्वामींचा चेहरा पहिल्यापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. "त्या अफवा नव्हत्या. ते सगळ खर होत. तीच त्या मुलांचे बळी देत होती."

"बळी?" अमेय आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.

स्वामीः हो बळी. पतीच्या निधनानंतर तिची मानसिक स्थिती खालावली होती. अशातच तिला एका अघोरी विद्येची माहीती मिळाली. कमजोर मनाच्या लोकांवर वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो. इथेही तसच झाल. ती एक अशी अघोरी विद्या आहे की जर तिचे सगळे टप्पे  यशस्वी रीत्या पूर्ण केले तर तो माणूस सर्व शक्तिमान होऊ शकतो. याच शक्तिच्या लालसेने तिने त्या अघोरी विद्येचे सर्व टप्पे पूर्ण केले. शेवटचा टप्पा होता १०-१५ वर्ष वयाच्या  ५१ लहान मुलांचे बळी. पण तिच्या दुर्दैवाने तिच्या ह्या क्रुत्यांची माहीती लोकांपर्यंत पोहोचली. लोक आमच्या गुरूदेवांकडे आले. त्या लोकांसोबत गुरूदेव इथे आले. आणी गुरूदेवांच्या आज्ञेनेच तिला तळघरात जिवंत जाळण्यात आल. माणसाची इच्छा जर तीव्र असेल तर म्रुत्युनंतर सुध्दा माणसाचा आत्मा भटकत राहतो. इथेही तेच घडल. तिला कोणत्याही परिस्थितीत ती शक्ती प्राप्त करायची होती. त्यामुळे तिचा आत्मा इथेच राहीला. गुरूदेवांनी आम्हाला सांगितल होत की संधी मिळताच ती लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणी काही वर्षांआधी तसच घडल. इथे रहायला आलेल्या एका कुटुंबाचा संशयास्पद म्रुत्यु झाला.  त्यावेळी आम्ही वेळेवर पोहोचुन तिला त्या खोलीत कोंडून टाकल होत. पण आता ती तुझ्या मुलीला घेऊन गेली आहे. हा तिचा ५१ वा बळी असेल. आणी अस झाल तर संपूर्ण मानवजातीवर संकट येईल. तिचा आता समूळ नाश करणे हा एकच उपाय आहे. त्यासाठी आपल्याला एका विशिष्ट शस्त्राची गरज लागेल. आणी ते शस्त्र आता मी निर्माण करणार आहे. मुकुंदा, चल.

स्वामी झपाझप पावले टाकीत बाहेर निघून गेले. अमेय आणी जयंत त्यांच्या मागोमाग गेले. स्वामी बाहेरील अंगणात उभे राहीले. त्यांनी मुकुंदाच्या हातातील पिशवीतून रिकामे कमंडलू काढले. ते कमंडलू उजव्या हातात धरून डोळे बंद करून स्वामी काहीतरी पुटपुटले. क्षणात ते रिकामे कमंडलू पाण्याने भरले. ते कमंडलू त्यांनी आता डाव्या हातात धरल. त्यातील पाणी उजव्या हाताच्या ओंजळीत घेतल. स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द बाहेर पडले,

"हे आकाश, धरती, वायू, जल, अग्नी हे सर्व विश्व तुम्हा पंचतत्वांपासुन निर्माण झाले आहे. या सगळ्याची उत्पत्ती, स्थिती, लय तुमच्यातच आहे. आज मानव जातीवर एक भयानक संकट घोंघावत आहे. त्या संकटाशी लढाई देण्यासाठी पंचतत्वांपासुन बनलेल्या एका दिव्य शस्त्राची गरज आहे. म्हणून मी आपल्या तपश्चर्येच पुण्य देऊन तुमची शक्ती असलेल्या दिव्य शस्त्राची मागणी करतो."

अस म्हणून ओंजळीतील पाणी जमीनीवर सोडले. पाणी सोडताक्षणी जोराचा वारा सुटला. जमीन हादरायला लागली. अचानक जमीन दुभंगली आणी जमीनीतून एक दिव्यास्त्र बाहेर पडले. त्याच्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपले. अमेय आणी जयंत आश्चर्याने हा चमत्कार बघत होते. स्वामींनी ते दिव्यास्त्र अलगद  हातात घेतले. "आता तिचा अंत कोणीही रोखु शकत नाही. मुकुंदा, चल." स्वामी जाण्यासाठी वळले.

अमेयः थांबा स्वामी, हे काम मला करू द्या. माझ्या मुळेच ती स्वतंत्र झाली. शारदाच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. किमयाचा जीव धोक्यात आहे. संपूर्ण मानवजातीवर संकट आहे. हे सगळ माझ्या मुळे  झालय. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या. तिचा अंत करायला मला जाऊ द्या.

स्वामींच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटले. त्यांनी ते दिव्यास्त्र अमेयच्या हातात दिले. ते दिव्यास्त्र हातात येतात अमेयच्या अंगात नवीन तेज संचारले. "जर तु तिचा अंत करण्यात यशस्वी ठरलास तुझ्या पत्नीचा सुध्दा जीव वाचेल." स्वामी म्हणाले.

"मित्रा," जयंतने हाक मारली, "तु एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे."

"साहेब, थांबा." घरातून रामूकाका पळत आले, "साहेब, मी पण तुमच्या सोबत येतो.

अमेयः स्वामी, आशिर्वाद द्या. ही लढाई आपणच जिंकु.

"विजयी भव" स्वामी दोन्ही हात उंचावून हसत म्हणाले.
                                                                          क्रमशः