प्रकरण १
गोव्यातील एका भल्यामोठ्या बंगल्याजवळ एक गाडी येऊन थांबली. बंगल्याच्या केअरटेकरने लगबगीने पुढे होऊन बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वार उघडले. ती गाडी आत बंगल्याच्या दरवाज्या समोर थांबली. गाडीतून अमेय, त्याची पत्नी शारदा व १२ वर्षांची मुलगी किमया उतरले. "तर, हा आहे आपला नवीन बंगला." अमेय हात फैलावत म्हणाला. शारदा बंगल्याच निरीक्षण करत होती. "छान आहे. तीन मजल्यांचा प्रशस्त आहे. पण थोडा जुना वाटतोय." शारदाने आपला रिमार्क दिला. "जुना तर आहेच. हा बंगला १८८४ मध्ये इंग्रजांनी बांधला होता." अमेय आपल ज्ञान पाजळत म्हणाला. "पण तरी मला आश्चर्यच वाटतय. एवढा मोठा बंगला आपल्याला इतक्या कमी किंमतीत कसा मिळाला." शारदाने आपला संशय व्यक्त केला. "अग आता तूच तर म्हणालीस ना कि हा बंगला जुना वाटतोय म्हणून. आणी काही लोकांनी या बंगल्याबद्दल गैरसमज पसरवले आहेत." अमेय म्हणाला.
शारदा: कसले गैरसमज ?
अमेय: हेच की या घरात भूत-प्रेत वगैरे आहेत म्हणून.
"बाबा, हे भूत खरच असतात का हो ?" छोटी किमया आपले छोटे डोळे मोठे करत म्हणाली.
अमेय: नाही बेटा, हे काही खर नसत. हे रिकामटेकड्या लोकांच्या रिकामटेकड्या गोष्टी आहेत. बर मग आपला इथेच मुक्काम करायचा विचार आहे का आतही जायच आहे.
एवढा वेळ विचारात गढलेली शारदा त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर आली.
ते आता ग्रूहप्रवेशा साठी सज्ज होते. क्रमश: