Android app on Google Play

 

प्रकरण ५

 

शारदा बाहेरील अंगणात अस्वस्थतेने फेर्या घालत होती. रात्रीचे ८ वाजले होते. अमेय अजुन आला नव्हता. रामूकाकांच्या बोलण्याचा अर्थ तिला काही केल्या समजत नव्हता. ति त्याचाच विचार करत होती. तेवढ्यात तिला अमेयची गाडी गेट मधून येतांना दिसली. तो गाडीमधून खाली उतरला. "काय ग, काय झाल अस बाहेर का उभी राहीलीस." तो शारदाजवळ येत म्हणाला. "मला तुला काहीतरी सांगायचय." अस म्हणून ति त्याला आत घेऊन गेली. आत गेल्यानंतर तिने काही वेळापूर्वीची ती घटना आणी रामूकाकांच बोलण  सांगितल.
"तुझ डोक फिरलय का. तु काय बोलतेस हे तुला तरी कळतय का." अमेय चिडून म्हणाला. "तो दरवाजा अनेक वर्षांपासुन बंद आहे. तिथे कोणीच रहात नाही." शारदाला त्याच्या कडून अशीच प्रतिक्रीया अपेक्षीत होती. तरी समजावणीच्या सुरात म्हणाली,"मी पण तेच म्हणतेय.पहीले ती झाडावरची घटना आणी आता ही दरवाज्याची घटना. रामूकाका म्हणतात त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार".

अमेयः ओके ठीक आहे. तुला जाणून घ्यायचय ना की तो दरवाजा कोणी ठोकला मग चल माझ्यासोबत".
अस म्हणून अमेयने शारदाचा हात धरला आणी तिला तिसर्या मजल्यावर घेऊन गेला. त्या बंद दारासमोर आल्यावर तो म्हणाला,"हा दरवाजा मी आता उघडणार आहे. लगेच खर खोट समोर येईल."

शारदाः थांब अमेय, रामूकाकांनी निक्षून सांगितलय हा दरवाजा उघडू नका म्हणून.

अमेयः रामूकाकांनी सांगितल आहे? मग तर मी आता नक्कीच उघडणार.

अस म्हणून त्याने शारदाला बाजुला ढकलल आणी दरवाज्या जवळ जाऊन त्याच्या कुलूपावर बांधलेले धागेदोरे काढायला सुरूवात केली. दोर्यांच्या खाली एक काळी बाहूली बांधली होती. ती बाहूली सुध्दा त्याने काढली. अचानक ती काढल्याबरोबर त्या दरवाज्याला लावलेल भलमोठ कुलूप आश्चर्यकारक रित्या तुटून खाली पडल. अमेयने तो आत ढकलला. बंद दरवाजा उघडला गेला होता.

तो दरवाजा उघडल्या बरोबर एक थंड हवेची अनैसर्गिक झुळूक त्या दोघांच्याही अंगात हुडहूडी भरवून गेली.
" ये बघ आहे का कोणी इथे." अमेय आत येत म्हणाला. शारदा सुध्दा त्याच्या मागे आत आली. "हं. कायतर म्हणे दरवाजा ठोकला कोणीतरी. मुर्खांचा बाजार." ती खोली बर्यापैकी मोठी होती. त्या खोलीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. त्या खोलीतील सर्व वस्तु पांढर्या कपड्याने झाकलेल्या होत्या. शारदा त्या खोलीच चांगल्या प्रकारे निरीक्षण करत होती. अचानक तिच लक्ष समोरच्या भिंतीकडे गेल. त्या भिंतीवर एक चित्र होत. ते चित्र जुन्या काळातल्या एका ब्रिटीश स्त्रीच वाटत होत. शारदाने त्या चित्राजवळ जाऊन त्याला निरखून पाहील. त्या चित्राच्या खाली तीच नाव आणी जन्म-म्रुत्युच वर्ष लिहील होत.

             Sarah Winchester
             the owner of this Winchester house
             born: 1840
             died:. 1922.

"ओ बाईसाहेब, जर तुमच निरीक्षण झाल असेल तर खाली चला आता. खूप भूक लागली आहे." अमेयच्या बोलण्याने शारदा भानावर आली. आणी त्याच्या सोबत खोलीतून बाहेर निघाली. बाहेर आल्यावर तिने एकदा मागे वळून खोलीवर नजर टाकली. ती खोली एकदम शांत वाटत होती.

      कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती.
                                                                       क्रमशः