Android app on Google Play

 

प्रकरण ७

 

अचानक मध्यरात्री शारदाला जाग आली. तिने तिच्या आजुबाजूला पाहील. अमेय आणी किमया दोघेही तिथे नव्हते. तिला आश्चर्य वाटल. दोघे एवढ्या रात्री कुठे गेले असतील. असा विचार करून ती उठली. बेडरूम मधून बाहेर आली. प्रथम तिने इतर खोल्यामध्ये पाहील. तिथेही ते दोघे नव्हते. ति आता खाली हॉल मध्ये आली. हॉल मध्ये तिला समोर दोन आक्रुत्या पडलेल्या दिसल्या. तिने जवळ जाऊन पाहील आणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. समोरच द्रुश्य पाहुन ति तिथेच थिजल्यासारखी उभी राहीली. तिच्या समोर अमेय आणी किमया रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अचानक एक हसण्याचा आवाज आला आणी हे शब्द शारदाच्या कानांवर पडले,"हे दोघे गेले. आता तुझी पाळी. हाहाहा." ती पूर्ण ताकदीनिशी किंचाळली. पुढच्याच क्षणी शारदा तिच्या बेडवर उठून बसली. तिच सर्वांग घामाने ओलचिंब झाल होत. तिने थरथरत आजुबाजूला पाहिल. अमेय आणी किमया शांत झोपले होते. म्हणजे मघाशी जे बघितल ते स्वप्न होत तर. आता तिच्या जिवात जिव आला. तिने बाजुच्या टेबलवर पडलेला जग उचलला आणी गटागटा घशात रिकामा केला. आता तिला थोड बर वाटत होत. तिने घड्याळाकडे पाहील. पहाटेचे ४ वाजले होते. अचानक तिच्या मनात एक विचार चमकुन गेला. अस म्हणतात की पहाटेचे स्वप्न खरे होतात. या विचाराने पुन्हा तिचा जीव घाबरायला लागला होता.

                                 अमेय नेहमीसारख ऑफीसला निघून गेला होता. शारदाला पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवत होत. अचानक तिला हॉल मधून विचित्र आवाज यायला लागले. रामूकाका काही कामासाठी बाहेर गेले होते. ती घरी एकटीच होती. त्यात या विचित्र आवाजांनी तिच्या भीतीत आणखीनच भर पडली. ते आवाज आता अधिक वाढत चालले होते. तिने हिम्मत करून हॉल मध्ये जायच ठरवल. ती हळूहळू हॉलच्या दिशेने जायला लागली. हॉल मध्ये तिने पाहिल की समोरच्या भिंतीवर किमया  काहीतरी करत होती. ती काय करते आहे हे पाहण्यासाठी अजुन जवळ गेली. त्या भिंतीवर लाल अक्षरात इंग्रजी मध्ये लिहिलेल होत,'GET READY TO DIE'. शारदा घाबरुन मागे सरकली. तेवढ्यात रामूकाका तिथे आले. त्यांनी सुध्दा ते लिहिलेल पाहील. शारदा भीतीने थरथरत होती. रामूकाकांनी शारदाला धीर दिला. आणी स्वतः हिम्मत करून किमयाच्या जवळ आले. रामूकाका गुडघ्यावर बसले आणी एक हात किमयाच्या खांद्यावर ठेवला. हात ठेवताच ती मागे फिरली आणी तिने रामूकाकांचा गळा पकडला. तिची पकड इतकी घट्ट होती की रामूकाकांना सुटण्याची संधीच नाही मिळाली. आणी तिने रामूकाकांना अगदी खेळण्यासारख सहज उचलून दूरवर फेकुन दिल. आता ती शारदाकडे वळली. शारदाने तिच्यासमोर गुडघे टेकले आणी हात जोडून म्हणाली,"हे बघ तु जी कोणी आहेस माझ्या मुलीला सोडून दे. तिने तुझ काही बिघडवलेल नाहीये. तुला जे काही करायचय ते माझ्या मार्फत कर. पण माझ्या मुलीला सोड."

किमया विक्षिप्त पणे हसली आणी घोगर्या आवाजात म्हणाली,"ही पोरगी माझी शिकार आहे. मी हिला सोडणार नाही. मी हिला मारून टाकणार आणी मग मला ते मिळेल ज्यासाठी माझा आत्मा इतकी वर्ष तडफडतोय. पण त्या आधी मी तुम्हा सगळ्यांना मारेल." अस म्हणून ती हसली. आणी तिने शारदाचा गळा पकडला. तेवढ्यात अचानक एक पांढरी राख किमयाच्या अंगावर पडली. तिने शारदाचा गळा सोडला आणी किंचाळून दूर झाली. तिने वळून पाहील. समोर तो साधू आणी त्याचा शिष्य उभा होता. "तु परत आलास." किमया चवताळून घोगर्या आवाजात म्हणाली. "हो मी परत आलोय. तुला कायमस्वरूपी या जगातून मुक्त करण्यासाठी." अस म्हणून त्या साधूने पुन्हा पिशवीतून मुठ्ठीभर पांढरी राख काढली आणी डोळे बंद करून  काहीतरी पुटपुटला. त्याने ती राख तिच्या अंगावर टाकली. ती पुन्हा ओरडून खाली पडली.

                       ऑफिसमधील टेबलावरचा फोन खणखणला. अमेयने फोन उचलला,"हेलो".

"अमेय, तु लवकर घरी ये. इथे खुप भयानक घडतय. मला काहीच कळत नाहीये." शारदाचा घाबरलेला आवाज आला.

अमेयः अग पण काय झालय ते तर सांग.

शारदाः फोनवर नाही सांगता येणार तु लवकर घरी ये.

अस म्हणून तिने फोन ठेवून दिला. "काय रे, काय झाल." त्याचा मित्र जयंतने विचारल.

अमेयः अरे, शारदाचा फोन होता. घरी बोलवलय. काहीतरी गंभीर प्रकरण दिसतय. मला जाव लागेल. तु इथे सगळ सांभाळून घे. ओके.

अस म्हणून तो ऑफिसमधून निघाला.

अमेय घरी पोहोचल्यानंतर धावत पळत घरात गेला. समोरच द्रुश्य पाहून तो भयचकीत झाला.
 
                
                       राखेच्या गोल रिंगणात किमया बसलेली होती. ती त्या राखेच्या रिंगणातून बाहेर निघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. स्वामी तिच्या समोर योगमुद्रेत बसलेले होते. त्यांचे डोळे बंद होते. त्यांचा शिष्य मुकुंदा किमयावर लक्ष ठेवत होता. दूर कोपर्यामध्ये शारदा आणी रामूकाका घाबरलेल्या अवस्थेत बसलेले होते. अमेयला पाहताच शारदा धावत येऊन त्याला बिलगली.

"शारदा,हे सगळ काय चाललय? हा माणूस कोण आहे? आणी किमयाला काय झालय?" असे एकावर एक प्रश्न त्याने शारदावर फेकले. शारदाने घडलेली सगळी हकिकत त्याला सांगितली.

"काय?" अमेय मोठ्याने ओरडला,"शारदा, आर यु आऊट ऑफ युवर माईंड? अग ही १२ वर्षाची मुलगी एवढ्या म्हातार्या रामूकाकांना उचलुन कस फेकु शकते?"

शारदाः अमेय, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलय. आणी ती किमया नव्हती. तो तिच्या अंगात घुसलेला आत्मा होता.

अमेयः ईनफ शारदा. मी तुला पहिलेही सांगितल आहे कि जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. आणी जे तु किमयाबद्दल सांगितलस ना त्या मागे नक्कीच मानसीक कारण असणार. तिला असल्या तांत्रीकांची नाही तर एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे.

"पप्पा,मला वाचवा." तिकडून किमयाचा आवाज आला, "ही बघा, ही माणस माझ्यासोबत काय करता आहेत. मला इथून बाहेर काढा." ती रडत म्हणाली.

अमेयः किमया बेटा, घाबरू नकोस मी आलोय ना मी तुला इथून बाहेर काढेल.

अस म्हणून तो पुढे जायला लागला. शारदाने त्याला अडवल. "नाही अमेय, स्वामींनी सांगितलय कि त्या राखेच्या गोल रिंगणात कोणीही जाऊ नका. तो आत्मा......"

"शारदा", अमेय आता संतापला होता, "अग तुझी मुलगी आहे ती कोणी भूत नाही. तिच्याकडे बघ जरा तिला त्रास होतोय या सगळ्याचा. " अस म्हणून त्याने शारदाला दूर ढकलल. तो त्या राखेच्या गोल रिंगणात प्रवेश करणार इतक्यात स्वामी कडाडले, "थांब. असला मुर्खपणा करू नकोस. नाहीतर अनर्थ होईल." पण अमेयने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल नाही. त्याने पायाने ते राखेच गोल रिंगण विस्कटून टाकल. आणी किमयाजवळ जाऊन बसला. "तू ठिक आहेस ना बेटा. घाबरू नकोस तुझे पप्पा आलेत आता." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. किमयाने डोक वर केल. तिचे डोळे लाल भडक होते. ती कुत्सितपणे हसत होती. अमेयला काही कळायच्या आत तिने त्याचा गळा पकडला. आणी रामूकाकांना उचलून फेकल होत तसच त्यालाही उचलून फेकल. तो समोरच्या भिंतीवर जोरात आपटला. त्याला क्षणभर कळालच नाही कि काय घडल. त्याने समोर पाहील. किमया उभ राहुन घोगर्या आवाजात हसली, "मुर्खा, तु माझ्या सुटकेचा मार्ग मोकळा केलास. आता मी ह्या मुलीला घेऊन जाईन. ही एक्कावन्नावी असेल. आता माझ लक्ष्य पूर्ण होईल. पण जाण्याच्या आधी....." ती पुन्हा भयानक हसली. तिने तिच्या एका हाताची मूठ बंद केली. आणी डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली. तिने डोळे उघडले तिचे डोळे काळेशार होते. तीने तिच्या हाताची मूठ  शारदाकडे करून उघडली. तिच्या तळहातातून काळा गोळा निघाला. आणी तो शारदाकडे झेपावला. कोणाला काही कळायच्या आत तो गोळा शारदाच्या छातीला लागला. शारदाच निष्प्राण शरीर जमीनीवर पडल. किमया तिथून गायब झाली होती. कोणीही काहीही बोलत नव्हत. भयाण शांतता पसरली होती.
                                                                       क्रमशः