Android app on Google Play

 

प्रकरण ३

 

शारदाच्या किंचाळण्याने अमेय आणी रामुकाका किचनकडे धावले.किचनमध्ये शारदा खिडकीच्या बाहेर एकटक पाहत होती. तिचा चेहरा भयाने पिवळा पडला होता. अमेयने तिच्या जवळ जाऊन काय झाले म्हणून विचारले. ती सर्वांगाने थरथरत होती. थरथरत्या हाताने तिने खिडकिच्या बाहेर पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवले. अमेयने बाहेर पाहीले पण त्याला तिथे काहीच दिसले नाही. "अग काय दिसल तुला काही सांगशील का नाही." अमेय वैतागुन म्हणाला. शारदाने आवंढा गिळला आणी थरथरत म्हणाली, "मी...मी इथे किचन पाहत होती. अचानक माझ लक्ष त्या पींपळाच्या झाडाकडे गेल. त्यावर कोणीतरी बसलेल होत. कोण आहे हे पाहण्यासाठी खिडकीच्या जवळ गेले. अचानक त्याने चेहरा वर केला. त्याचा चेहरा एकदम विक्रुत होता. त्याने माझ्याकडे पाहिल आणी एकदम गायब झाल. अमेय, मला वाटत रामुकाका बरोबर बोलतायत. इथे नक्कीच काहितरी आहे आपण इथे नको राहुयात. प्लीज....."

"ओ जस्ट शट अप शारदा." अमेय ओरडतच बोलला, "बस झाल आता माझ्याकडे असल्या फालतु गोष्टिंसाठी वेळ नाहीये. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, वास्तविकता नाही. आता हे विचार डोक्यातून काढून टाक. आणी रामुकाका क्रुपा करुन तिच्या डोक्यात अस काही भरवू नका. मला अर्जंट ऑफिसला जाव लागतय. घरी उशीर होईल." अस म्हणून कोणालाही बोलायची संंधी न देता अमेय तडक घरातून निघून गेला.                                                                                                                      क्रमशः