Android app on Google Play

 

वलय - प्रकरण ४३

 

सकाळी सकाळी ९ वाजता मेन गेट वरील सिक्युरिटी गार्डला पास दाखवल्यावर त्या शांत बंगल्यात पाठीवर सॅक असलेल्या राजेशने  प्रवेश केला.

गार्डने घराजवळील बागीच्याकडे बोट दाखवले, "साहब, वहां है! आपको वही बुलाया है! जाईये!"

एवढा मोठा सुपरस्टार, पण अगदी सामान्य माणसासारखा बागेतील झाडांना तन्मयतेने पाणी देत होता.  त्यांनी साधे आणि सफेद कपडे परिधान केले होते. गेटवरील हालचाल ऐकल्याने आणि भेटण्याची वेळ ठरलेली असल्याने राजेश त्यांचेकडे आल्यावर त्याची मागे वळून पाहिले.

त्यांच्या धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, "आईये! आईये! राजेशजी! स्वागत है आपका! आप सामने रखी कुर्सी पर विराजमान होईये.. हम जरा आते है! बसा! बसा! संकोच करू नका!"

त्यांचा मराठी उच्चार अगदी छान होता. बागेच्या मधोमध तीन खुर्च्या आणि एक टेबल ठेवलेला होता. वातावरण अगदी प्रसन्न होते. राजेशने सॅक बाजूला ठेवली.

"धन्यवाद सर!" असे म्हणत राजेश बसला. थोड्या वेळाने अमित श्रीवास्तव आले.  सोबत चहा घेऊन एक नोकर आला. त्याने चहाचे समान टेबलावर ठेवले आणि तो मध्ये निघून गेला. लगेचच तेथे त्यांची पत्नी वंदना आली.

जुजबी बोलणे झाल्यावर अमितजी म्हणाले, "राजेश और मेरे लिये गरम थालीपीठ और थंडा दही बनाइएगा श्रीमतीजी!"

राजेशला आश्चर्य वाटले की एवढे मोठे सुपरस्टार पण किती अदबीने बोलत आहेत! आणि त्यांची पत्नी सुद्धा किती नम्र? आणि त्या स्वत: नाश्ता बनवणार आणि तो पण मराठी? यांना कसे कळले की मला थालीपीठ आवडतंय?

राजेशची चेहऱ्यावरील धांदल आणि आश्चर्य पाहून अमितजी हसत म्हणाले, "राजेश जी! हमने भी आपके इंटरव्ह्यू पढ रखे है, आपकी पसंद नापसंद के बारे में हमने थोडीसी जानकारी तो पहले से ही पता कर ली थी!"

त्यांची पत्नी हसत म्हणाली,  "राजेश जी आपकी पत्नी नाही आयी? उनको भी साथ में ले आते तो हम दोनो थोडा समय साथ में बीता लेते, गपशप कर लेते! वैसे भी हमारा बेटा अभिजित और बहू सौंदर्या देश से बाहर गये हुये है!"

सुनंदाबद्दल काय सांगावे या विवंचनेत राजेश पडला पण तो लगेच म्हणाला, "ती माहेरी गेली आहे! मैके गायी है!"

ओके ओके म्हणत त्या मध्ये निघून गेल्या.

"आप बहोत अच्छे लेखक है! समीरण के मुव्ही में मेरे छोटेसे रोल के लिये आप स्क्रिप्ट लिखने वाले है यह सुनके मुझे बहोत आनंद हुवा!

"धन्यवाद सर!" सॅक मधून लॅपटॉप काढत फाईल ओपन करून तो म्हणाला, "मैने ये स्क्रिप्ट लिखी है, प्रथम आपण ती वाचा मग आपण त्यावर चर्चा करू शकतो!"

दोघांनी चहा घ्यायला सुरुवात केली. अमिताजीनी काही वेळ ती स्क्रिप्ट वाचली. त्या चित्रपटातील काही पात्रे समाजातील तळागाळातील लोकांसाठी खूप संघर्षानंतर एक संस्था स्थापन करतात हा त्या चित्रपटाचा मूळ गाभा होता. समाजातील काही विघातक प्रवृत्ती त्यांना त्रास देतात, हे टीव्हीवर बघून अमितजी व्यथित होतात आणि ते त्या संस्थेला मदत करायचे ठरवतात. त्यांच्या सपोर्टमुळे आणि स्वत: त्या संस्थेच्या समर्थनार्थ एके ठिकाणी त्यांनी दिलेल्या भाषणामुळे संस्थेला विरोध करणारे काहीजण नरमतात. त्या संस्थेला अमितजी पैशांची सुद्धा मदत करतात एवढा त्यांचा चित्रपटात रोल होता ज्यासाठी राजेशने स्क्रिप्ट लिहिली होती. ती स्क्रिप्ट खूप प्रभावशाली होती. अमितजींना ती आवडली. समीरणला लगेच कॉल करून त्यांनी राजेश एक चांगला लेखक असून त्याची स्क्रिप्ट त्यांना आवडल्याचे सांगूनही टाकले.

मग वंदनाजी नाश्ता घेऊन आल्या. तिघांनी सोबत नाश्ता केला. थोडे जुजबी बोलणे झाले. मग वंदनाजी निघून गेल्या.    

राजेश मग म्हणाला, "आप जो अभिजित को लेकर होम प्रोडक्शन में मुव्ही बना रहे है, उसमे आपके बेटे अभिजित के किरदार के लिये स्टोरी और स्क्रिप्ट लिखना शुरू कर दिया है! वह भी आप एक बार देख लिजीए!"

मग अमितजी ते वाचू लागले. अर्थातच तेही त्याना आवडले. त्यांनी थोडे बदलही सुचवले व म्हणाले, "स्क्रिप्ट और स्टोरी कम्प्लीट होने के बाद अभिजित को जरूर दिखाईएगा! वे बहोत उमदा कलाकार है! वे आपके स्टोरी को बहोत पसंद करेंगे! उनको भी आपके साथ काम करने की बहोत बहोत इच्छा है! अभिजीतने आनेवाले समय में कुछ मराठी फिल्मे प्रोड्यूस करने का निश्चय किया है!"

"बिलकुल सर! शुअर! इट्स माय प्लेजर!"

त्या चित्रपटाची संकल्पना थोडक्यात अशी होती:

"एका आंतरराष्ट्रीय डॉनला पकडण्यासाठी भारत सरकार चार जणांची गुप्तचर टोळी बनवून परदेशात पाठवते ज्याच्या प्रमुखाचा (म्हणजे कप्तान वीरेंदर सिंगचा) रोल अभिजित करणार असतो. दरम्यान एका देशात गुप्तहेर कारवाया करत असतांना त्याला नताशा भेटते जिचा रोल प्रसिद्ध अभिनेत्री शलाका करणार असते, पण ती नेमकी कोण असते? भारताची मित्र कि शत्रू? कप्तान वीरेंदर तिचा पर्दाफाश कसा करतो? मग अनेक देशांत प्रवास करून अनेक थ्रिलिंग हाणामारी एक्शन घडून या चित्रपटाचा क्लायमॅक्स भारतात संसद भवनाजवळ होतो."

मग राजेशने एका वेगळ्या विषयाला हात घातला, "अमितजी! एक महात्वाच्या विषयावर बोलायचे आहे! तुम्हाला वेळ आहे ना?"

"बोलिये बोलिये राजेश जी! आज शाम पाच बाजे तक हम आपके लिये मौजूद है! बस हमने आजका डिनर किसी फॅमिली के साथ करने का वादा कीया है! इसलिये शाम को बाहर जायेंगे! यु नो! थोडा सोशलायझेशन जीवन में आवश्यक है!"

"हा अमितजी! आप बिलकुल ठीक कह रहे है!" राजेशने पुष्टी जोडली.

"हा तो बोलिये! क्या कहना चाह राहे है आप? आप अपने विषय पर बोलने के बाद आपके लिये हमारे पास एक सरप्राईज और एक न्यूज है! बहोत बडा सरप्राईज!"

राजेशला मनोमन आश्चर्य वाटले. कोणते सरप्राईज असणार यांचेकडे? पण त्याआधी माझा विषय मी संपवतो.

"अमितजी! आजकल आपने सुना होगा की उमदा लेखको जो कथा लिखकर निर्माता और निर्देशक को सुनाते है, वे बाद में उस कथा के आधार पर अपना नाम डालकर मूवी बनाते है! और लेखको को उसका क्रेडीट देते नाही है!"

"हा राजेश! हमे पता है! हम भी ऐसी घटनाओ से व्यथित है! पर ज्यादातर ऐसी घटनाओ मे सबूत न होने के कारण और कॉपीराईट के नियम पता न होने के कारण लेखक कुछ नाही कर पाते!  कुछ लेखक जल्दबाजी में अपनी कथा निर्माताओ को सुना देते है और कोई सबूत नही रहता की उसने कथा सुनाई की नही इस बात का कोई सबूत बचता नही!"

आता राजेश हिम्मत करून जे सांगणार होता ते अमितजी स्वीकारतील की नाही आणि कसे स्वीकारतील याबद्दल तो थोडा साशंक होता!

पण थोडी हिम्मत करूज तो म्हणाला, " अमितजी! तुम्हाला तुमच्या करीयरच्या  सुरुवातीचा चित्रपट आठवत असेल! "किस्मत का खेल!"?

"हा! बिलकुल! हमे याद है! त्या चित्रपटामुळे माझ्या करियरला चांगले वळण मिळाले! मग मला अनेक चित्रपट मिळत गेले आणि मी यशस्वी झालो! के के सुमनची कमाल म्हणावी. त्यांनी त्या चित्रपटात माझा दमदार रोल लिहिला होता. त्यानंतर जरी मी त्याच्या पुढच्या चित्रपटात काम केले नाही, तरी माझ्या करियरला यशस्वी वळण दिल्याबद्दल मी त्यांचे नेहमी आभार मानतो!"

"आणि मी जर का म्हणालो कि केके सुमनने ती कथा सपशेल चोरली आहे तर?"

"क्या? क्या कह रहे है राजेश आप?"

"सर! और अगर मै आपसे कहू की वो स्टोरी मैने ही अपने कॉलेज जीवन में लिखी है तो?"

अमितजी अस्वस्थ होत म्हणाले, "क्या बात कह रहे हो राजेश? आप "केके सुमन" पर गंभीर किस्म के आरोप लगा रहे है! माना की आप एक जाने माने लेखक है पर किसी निर्माता को बदनाम करके आपको क्या मिलेगा? आप जो आरोप लगा रहे है, उसके पुष्टी के लिये क्या सबूत है आपके पास?"

अमिताजींचा हा पवित्रा थोडा अनपेक्षित असला तरी त्याने असा अंदाज बांधला होता.

तो तयारीनिशी आला होता.

त्याने लॅपटॉपवर एक व्हीडीओ प्ले केला आणि अमितजी तो पाहू लागले. रत्नाकरला विश्वासात घेऊन राजेशने त्याचेकडून जी माहिती आणि कबूली त्याच्या नकळत रेकॉर्ड केली होती त्याचा तो व्हीडीओ होता. त्यांनंतर राजेशने अमितजींना थोडक्यात त्याच्या जीवनातील पूर्वीच्या घटना सांगितल्या.

तसेच केकेचा मुलगा पिके याच्यासोबत राजेशने केलेल्या ऑपरेशनबद्दल पण सांगितले. अमितजींना ते ऐकून राजेशचे कौतुक वाटले आणि हसू सुद्धा आवरले नाही.

"राजेश जी! मै मानता हुं! आपके साथ बहोत गलत हुवा है! माझी सहानुभूती आहे तुम्हाला! पिके सोबत तुम्ही जे केलत ते एका अर्थाने योग्यच होतं! "

दुपारी जेवण झाल्यानंतर आता तिघेजण निवांत बसले होते.

वंदनाजी, राजेश आणि अमितजी!

अमितजींनी आपल्या पत्नीला सुद्धा राजेशबद्दल आणि एकूण सगळ्या लेखन चोरीच्या प्रकाराबद्दल सांगितले.

मग अमितजींनी राजेशला यासंदर्भात सर्वोतोपरी शक्य असेल तशी मदत करण्याचे आश्वासन दिले! मग राजेशने निरोप घेण्याआधी अमितजी सकाळी त्याला जे सिक्रेट किंवा सरप्राईज सांगणार होते ते त्यांनी राजेशला सांगितले. ते सरप्राईज म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी संधी होती जी राजेशकडे लवकरच चालून येणार होती आणि त्याद्वारे राजेशला न भूतो न भविष्यती असा फायदा होणार होता.

ती गोष्ट अशी होती की – हॉलीवूडच्या त्या बहुचर्चित आगामी भव्य चित्रपटासाठी भारतात घडणाऱ्या घटनांमध्ये एका अध्यात्मिक महागुरुची भूमिका करण्यासाठी अमितजींना केंटकडून डायरेक्ट ऑफर आली होती आणि त्यांनी ती स्वीकारली होती.

तसेच अभिजितसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन त्या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या भारतात घडणाऱ्या भागासाठी लेखन करण्याची संधी राजेशला मिळावी अशी विनंती ते केंटला करणार होते!!!

समाधानी मनाने राजेश समीरणकडे जायला निघाला. आजचा दिवस त्याचेसाठी आणि त्याच्या एकूणच करियरसाठी खूपच मोलाचा आणि महत्वाचा ठरला होता पण सुनंदाचा विचार मात्र त्याला अधूनमधून अस्वस्थ करत होता.

yyyy

 

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत
सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना
वलय - प्रकरण १
वलय - प्रकरण २
वलय - प्रकरण ३
वलय - प्रकरण ४
वलय - प्रकरण ५
वलय - प्रकरण ६
वलय - प्रकरण ७
वलय - प्रकरण ८
वलय - प्रकरण ९
वलय - प्रकरण १०
वलय - प्रकरण ११
वलय - प्रकरण १२
वलय - प्रकरण १३
वलय - प्रकरण १४
वलय - प्रकरण १५
वलय - प्रकरण १६
वलय - प्रकरण १७
वलय - प्रकरण १८
वलय - प्रकरण १९
वलय - प्रकरण २०
वलय - प्रकरण २१
वलय - प्रकरण २२/२३
वलय - प्रकरण २४
वलय - प्रकरण २५
वलय - प्रकरण २६
वलय - प्रकरण २७
वलय - प्रकरण २८
वलय - प्रकरण २९
वलय - प्रकरण ३०
वलय - प्रकरण ३१
वलय - प्रकरण ३२
वलय - प्रकरण ३३
वलय - प्रकरण ३४
वलय - प्रकरण ३५
वलय - प्रकरण ३६
वलय - प्रकरण ३७
वलय - प्रकरण ३८
वलय - प्रकरण ३९
वलय - प्रकरण ४०
वलय - प्रकरण ४१
वलय - प्रकरण ४२
वलय - प्रकरण ४३
वलय - प्रकरण ४४
वलय - प्रकरण ४५
वलय - प्रकरण ४६
वलय - प्रकरण ४७
वलय - प्रकरण ४८
वलय - प्रकरण ४९
वलय - प्रकरण ५०
वलय - प्रकरण ५१
वलय - प्रकरण शेवटचे (५२)
लेखकाची साहित्यिक ओळख