Get it on Google Play
Download on the App Store

मी जोकर, एक नोकर उभा सर्कशीत

सिद्धेश्वर विलास पाटणकर
 
मी जोकर, एक नोकर उभा सर्कशीत
मुखी नित्य हास्य पण दुःख कुशीत
कसा खेळ दावू ?
हा जीव टांगणीला
छकुली घरी एकली
कोण भरवेल तिजला ?
उगाच कधीही , कुठेही मी पडतो
हसवतो तुम्हांसी पण मला फसवतो
जसा भव्य सोहळा , तसा दिव्य त्याग
कसा पाळू तिजला नि पोटातली आग ?
घरी पाय ठेवता , ती येते कुशीत
मी नोकर , एक जोकर
म्हणून या सर्कशीत
एक बाप पाळतो पोट,
मुठी आवळीत, मुठी आवळीत
मी जोकर , एक नोकर उभा सर्कशीत
मुखी नित्य हास्य पण दुःख कुशीत