Get it on Google Play
Download on the App Store

पाककृती: भाजणीच्या बाट्या

मंजुषा सोनार


साहित्य:
ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे सगळे एक वाटी;
हरबऱ्याची डाळ, मूगडाळ, उडीद डाळ या सगळ्या अर्ध्या वाट्या;
लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, तिखट, हळद, ओवा, तेल इत्यादी

कृती:
•    सर्व धान्यांची (वरील दिलेल्या डाळींची) भाजणी करावी व ती दळून आणावी.
•    मग लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे मिक्सर मधून काढून घ्यावे.
•    नंतर भाजणीचे पीठ एका बाऊल मध्ये घेऊन त्यात चवीनुसार हळद, तिखट, ओवा, थोडे तेल, मीठ आणि तयार केलेला ठेचा टाकून पीठ कणकेसरखे मळून घ्यावे.
•    नंतर गॅसवर पॅन ठेऊन मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून पॅनवर थोडे तेल टाकून शालो फ्राय करून घ्यावे.
•    दोन्ही बाजूंनी शेकून झाल्यावर चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे.