Android app on Google Play

 

भारत माझा देश आहे

 

अरुण वि.देशपांडे, पुणे
9850177342
 
विविधतेने नटलेला
अनेकतेत एकवटलेला
तना-मनाने गुंफलेला
भारत माझा देश आहे ...!
 
मातेसम पुजनीय
आम्हा भारतमाता आहे
सकल विश्वात आदर्श
भारत माझा देश आहे ...!

संस्कृती -कला -संगीत
परंपरा अपरंपार साऱ्या
जपणारा  सुसंकृत हा
भारत माझा देश आहे ....!

नव-तंत्राची साथ घेउनी
नव युगाची स्वप्ने पाही
प्रगतीत अग्रेसर आहे
भारत माझा देश आहे ......!

भारत माझा देश आहे
मी भारतीय आहे
इथला हर एक माझा
भारतीय बांधव आहे .....!