Get it on Google Play
Download on the App Store

टेलीपथी विद्या

दूरची संवेदना किंवा परस्परांचा भाव ओळखणे याला आजकाल टेलीपथी म्हटले जाते. अर्थात कोणत्याही आधाराविना किंवा माध्यमाशिवाय आपले विचार दुसर्यापर्यंत पोचवणे आणि दुसर्याचे विचार ग्रहण करणे म्हणजेच टेलीपथी होय.
प्राचीन काळी ही विद्या ऋषीमुनी तसेच आदिवासी, बंजारा समाज याच्याकडे देखील असायची. ते आपला संदेश दूर अंतरावरच्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात पोचवू शकायचे. टेलीपथी विद्येचे दुसरे नाव आहे इंटियूशन पॉवर.
प्रत्यक्षात आपल्या सर्वांकडेच थोड्याफार प्रमाणात इंटियूशन पॉवर असतेच. पण काही लोकांमध्ये ती इतकी प्रबळ असते की त्यांना आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या घटना वेळेच्या आधीच माहिती होतात. अर्थात अजून वैज्ञानिकांना अशी कोणतीही ठोस उपलब्धी झालेली नाही ज्यावरून टेलीपथीचे रहस्य उलगडले जाईल.