Get it on Google Play
Download on the App Store

योग सिद्धी

असे म्हणतात की नियमित यम‍-नियम आणि योग अनुशासनाने जिथे उडण्याची शक्ती प्राप्त केली जाऊ शकते तिथेच दुसऱ्यांच्या मनातले देखील जाणून घेता येऊ शकते. आजही असे लोक आहेत जे परा आणि अपरा सिद्धींच्या बळावर अशी कामे करून दाखवतात ज्यांना पाहून आपल्याला देखील आश्चर्य वाटते.
सिद्धीचा अर्थ : सामान्यपणे सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे सफलता. सिद्धी म्हणजेच एखाद्या कार्यात विशेष रूपाने पारंगत होणे. सर्वसामान्य लोक सिद्धी या शब्दाचा अर्थ चमत्कार किंवा रहस्य असा घेतात, परंतु योगानुसार सिद्धीचा अर्थ आहे इंद्रियांवर नियंत्रण. म्हणजेच पाहणे, ऐकणे आणि समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास.