वास्तु शास्त्र
वस्तू शास्त्राला गृह निर्मिती, महाल निर्मिती, पूल, तलाव इत्यादींची बांधणी आणि शहराच्या निर्मितीचे शास्त्र मानले गेले आहे. प्राचीन भारतातील प्रमुख वास्तुशास्त्री महर्षी विश्वकर्मा आणि मयदानव हे होते.
भारतीय वास्तुशास्त्रात घर बांधण्याशी संबंधित अनेक प्रकारच्या रहस्यांना शोधण्यात आलेले आहे. घर बांधण्याची जमीन कशी असावी, घराच्या बहेर्चक़ आणि आतला भाग कसा असावा, यासोबतच घर बांधताना येणाऱ्या अडचणींचे संकेत काय आहेत. भारतीय वास्तुशास्त्र ही एक चमत्कारिक विद्या आहे. इंद्रप्रस्थ आणि द्वारका नगरीच्या निर्मितीवरून हे सिद्ध होते. कोणत्याही यंत्रांचा वापर न करता वास्तुशास्त्राच्या माध्यमातून पाणी डोंगरावर चढवले जायचे. याशिवाय महालात केवळ एका ठिकाणी बसून ताली वाजवल्यास ती ताली महालाच्या शेवटच्या कक्षापर्यंत आणि बाहेरच्या दरवाज्यापर्यंत ऐकू जायची. असे म्हणतात की कोणतेही भवन निर्माण करत असताना जर एखादा कामगार वेडा झाला तर गृहपती आणि घराचा विनाश होतो त्यामुळे त्या घरात राहायला येण्याचा विचार रद्दच केला पाहिजे. याव्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार जमिनीखालील पाणी आणि उर्जेची स्थिती यांचे देखील आकलन केले जाऊ शकते.