Android app on Google Play

 

मंत्र, तंत्र आणि यंत्र

 

तंत्र शास्त्र ही भारतातील एक प्राचीन विद्या आहे. मंत्र शक्तीने अनेक प्रकारची कार्ये संपन्न केली जाऊ शकतात आणि त्याच प्रकारे यंत्रांनी मनातील इच्छेची पूर्तता होते. मंत्रांमध्ये तांत्रिक आणि साबर मंत्राला सर्वांत लाभदायक मानले जाते, तर यंत्र अनेक प्रकारची आणि अनेक कार्यांसाठी असतात उदा. धनाच्या प्राप्तीसाठी लक्ष्मी यंत्र तर युद्धात विजय मिळावा यासाठी बगळामुखी यंत्र.
अनेक लोक आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी आणि जीवनात धन, संपत्ती, यश, नोकरी, स्त्री आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी यंत्र, मंत्र आणि तंत्राचा सहारा घेतात. अर्थात हे किती प्रमाणात बरोबर आणि योग्य आहे हे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही, परंतु लोकांचा यावर विश्वास आहे एवढे नक्की.