झाड-फूंक (झाडू फुंकणे)
पूर्वीच्या काळी झाडू फुंकून लोकांवरचे भूत पळवणे किंवा कोणत्या आजाराचा उपचार करणे, दृष्ट काढणे किंवा सापाचे विष उतरवणे ही कामे ओझा लोक करत असत. हे कार्य सर्व धर्मांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आजही पहायला मिळते.
काही असे मानसिक आजार असतात जे डॉक्टरांनाही बरे करता येत नाहीत. अशा परिस्थितीत लोकं पूर्वी या ओझा लोकांचा सहारा घेत होती. ओझा लोकांच्या क्रियेद्वारे मनावर खोलवर परिणाम होत असे आणि व्यक्तीच्या मनात असा विश्वास उत्पन्न होत असे की आता माझा आजार आणि दुःख नाहीसे झाले. हा विश्वासच तय रोग्याला बरे करत असे.