Get it on Google Play
Download on the App Store

ज्योतिष

ज्योतिष विद्येचे अनेक किस्से आहेत जसे सामुद्रिक शास्त्र, हस्तरेषा विज्ञान, लाल पुस्तक, अंक शास्त्र, अंगठा शास्त्र, ताड पत्र विज्ञान, नंदी नाडी ज्योतिष, पंच पक्षी सिद्धांत, नक्षत्र ज्योतिष, वैदिक ज्योतिष, रमल शास्त्र, पांचा विज्ञान इत्यादी. भारतात जिथे एकीकडे या प्राचीन विद्येच्या माध्यमातून अंतराळ, ऋतू आणि भूगार्भाची माहिती मिळवता येते तिथेच याच्या माध्यमातून एखाद्या मनुष्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ देखील माहिती करून घेता येतो.
वेदांची सहा अंगे आहेत ज्यांना वेदांग म्हटले जाते. या सहा अंगांपैकी एक म्हणजे ज्योतिष. वेद आणि महाभारत इत्यादी ग्रंथांमध्ये नक्षत्र विज्ञान अधिक प्रचलित होते.
वैदिक ज्ञानाच्या बळावर भारतात एकापेक्षा एक खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिषी आणि भविष्यकार होऊन गेले आहेत. यामध्ये गर्ग, आर्यभट्ट, भृगु, बृहस्पति, कश्यप, पाराशर वराहमिहिर, पित्रायुस, बैद्धनाथ इत्यादी प्रम्मुख आहेत.
ज्योतिष शास्त्रात तीन प्रमुख भाग आहेत : सिद्धांत ज्योतिष, संहिता ज्योतिष आणि होरा शास्त्र.