Android app on Google Play

 

संमोहन विद्या

 

संमोहनाला आपण इंग्रजीमध्ये हिप्नोटिज्म असे म्हणतो. हा प्रचीनकालच्या प्राण विद्येचा एक महत्वाचा हिस्सा आहे. संमोहनाच्या बाबतीत प्रत्येकालाच जाणून घेण्याची इच्छा असते, परंतु योग्य माहिती मिळू न शकल्यामुळे आपण ते समजून घेऊ शकत नाही.
संमोहन विद्येला प्राचीन काळापासून 'प्राण विद्या' किंवा 'त्रिकाल विद्या' अशीही नवे दिली गेली आहेत. संमोहनाचा अर्थ नेहमीच वशीकरण असा घेतला जातो. वशीकरण म्हणजेच एखाद्याला वश करण्याची विद्या, परंतु प्रत्यक्षात ही संमोहनाची प्रतिष्ठा कमी करणारी गोष्ट आहे. मनाचे अनेक स्तर असतात. त्यांच्यापैकीच एक आहे आदिम आत्म चेतन मन. आदिम आत्म चेतन मन ना विचार करत आणि ना निर्णय घेत. हे मन आपल्याला येऊ घातलेले संकट आणि त्या संकटापासून स्वतःचे रक्षण करण्याचा मार्ग सुचवत असते. हे मन सतत आपले संरक्षण करत असते. आपल्याला होणाऱ्या आजाराची कल्पना हे मन ६ महिने आधीच आपल्याला देते आणि जर आपण आजारी असू तर आपल्याला बरे करण्याचा प्रयत्न करते. त्या मनाला साधणे म्हणजेच संमोहन आहे. संमोहनाद्वारे आपण मनाची एकाग्रता, वाणीचा प्रभाव आणि दृष्टीनेच संकल्प पूर्ण करू शकतो. यामुळे विचारांचे आदान-प्रदान (टेलीपथिक), दुसऱ्याचे मनोव्यापार समजून घेणे, अदृश्य वस्तू किंवा आत्म्याला पाहणे आणि दूरची दृश्ये जाणून घेता येऊ शकतात.