टेस्ट ऑफ डार्कनेस, हैदराबाद
आपल्या अनोख्या आणि युनिक कॉन्सेप्ट साठी सुप्रसिद्ध हैदराबाद येथील 'टेस्ट ऑफ डार्कनेस' त्या ग्राहकांसाठी खास आहे, जे पाहू शकत नाहीत, म्हणजेच अंध आहेत. इथे पूर्ण वेळ अंधार असतो, जेणेकरून पाहू न शकणारे जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील. इथे अंध नसलेले देखील येतात्म परंतु त्यांच्यासाठी देखील अंधारच असतो. यामागील कारण स्पष्ट आहे : दृष्टी असलेल्यांना ही जाणीव करून देणे की ज्यांना दृष्टी नाही, ते कसे जगतात. इथे आपण हलणारा पूल आणि पार्क चा देखील अनुभव घेऊ शकतो.